Ladki Bahin Yojana News : लाडक्या बहिणींनो KYC करा, नाहीतर…, अजित पवारांची वॉर्निंग.., केवायसी न केल्यास काय होणार? आदिती तटकरेंनी स्पष्टचं सांगितलं..,

लाडकीच्या खात्यात सप्टेंबरचा हप्ता जमा झाला असला तरी ज्या लाडकीची ई-केवायसी झालीय… त्याचं लाडकीची दिवाळी गोड होणार आहे… पुढच्या 2 महिन्यात लाडक्या बहिणींनी E-KYC ची प्रक्रिया पूर्ण करावीच लागणार आहे..मात्र प्रत्याक्षात ई-केवायसी करताना लाडकीला अनेक अडचणींना सामोरे जावं लागतयं…,

Railway Jobs
लाडक्या बहिणींना केवायसी करावीच लागेल

गावखेड्यात मोबाईल नेटवर्क नसल्यानं लाडक्या बहिणींना रात्री 2 वाजेपर्यंत जागं रहावं लागतयं…तर दिवसा नेटवर्कअभावी वेबसाईट चालत नसल्यानं लाडकीची डोकेदुखी वाढतेय… एवढचं नव्हे तर नंदूरबारसारख्या आदिवासी पट्ट्यात मोबाईलला नेटवर्क नसल्यानं महिलांना गाव सोडून नर्मदा काठावरील उंच टेकडीवर जाऊन बसावं लागतयं…

तांत्रिक अडचणीमुळे पोर्टल बंद झाल्याच्या अनेक तक्रारी लाडक्या बहिणीकडून केल्या जात आहेत. या तांत्रिक अडचणींनी लाडक्या बहिणी पुरत्या बेजारयेत. आधीच या योजनेचा आर्थिक भार राज्य सरकारला पेलवत नाहीय. बोगस लाडकींनी सरकारला लुटल्यानंतर सरकारला ई-केवायईचं शहानपण सुचलं. पणं या ई-केवायसीनं पुन्हा गरजू लाडक्या बहिणींची होणारी फरफट सरकार कसं थांबवणार आणि सन्मान निधीच्या प्रतिक्षेत असणाऱ्या लाडकीची दिवाळी गोड होणार का ते पाहणं महत्वाचंय.

🔥 ही योजना वाचा :- लाडक्या बहिणींनो, e-KYC केलीत? तरीही तुमचा हफ्ता थांबणार, योजनेतील सरकारचा नवीन नियम वाचलात का? ही 7 कारणे तुमचे पैसे बंद करणार..,

लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी

लाडक्या बहिणींना केवायसी अनिवार्य

केवायसी न केल्यास लाभ बंद

केवायसी न केल्यास काय होणार? (What Happens if Ladki Bahin Yojane ekyc Not Done)

जर तुम्ही केवायसी करणे अनिवार्य असल्याचे स्वतः आदिती तटकरेंनी सांगितलं आहे. लाडकी बहीण योजनेत सर्व लाभार्थ्यांना केवायसी करणे बंधनकारक केले आहे. जर तुम्ही केवायसी केली नाही तर तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार आहे. केवायसीची प्रक्रिया तुम्हाला पारदर्शक पद्धतीने लाभ मिळावा यासाठी आहे. कोणतीही पात्र महिला योजनेच्या लाभापासून वंचित राहू नये, यासाठी केवायसी केली जात आहे, असंही आदिती तटकरेंनी सांगितलं होतं.

🔥 ही योजना वाचा :- Ladki Bahin Yojana E-KYC : वेबसाइट झाली सुरू; लाडक्या बहिणींनो २ महिन्यांची मुदत, कशी करायची E-KYC? कोणती कागदपत्रं लागणार? जाणून घ्या नेमकी प्रक्रिया..,

लाडक्या बहि‍णींना केवायसीशिवाय पर्याय नाही (Ajit Pawar on Ladki Bahin Yojana)

अजित पवारांनीही लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना केवायसी करणे अनिवार्य असल्याचे सांगितले होते.लाडक्या बहि‍णींनी लवकरात लवकर केवायसी पूर्ण करावी. केवायसीची मूदत वाढवून दिली जाईल परंतु केवायसी करावीच लागणार आहे, असं त्यांनी म्हटलं होतं. त्यामुळे आता केवायसीशिवाय लाडक्या बहि‍णींकडे पर्याय नाही.

के-वायसी करताना अडचणी

Ladki Bahin Yojana News – लाडकी बहीण योजनेत केवायसी करताना महिलांना अनेक अडचणी येत आहेत. कधी वेबसाइट चालत नाहीये तर कधी ओटीपी येत नाहीये. त्यामुळे महिलांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. दरम्यान, वेबसाइटवर लोड येत असल्याने ही समस्या येत आहे. याचसोबत नेटवर्कचा प्रॉब्लेम असल्याने ओटीपी येत नाहीये, असं सांगितलं जात आहे. त्यामुळे तुम्ही रात्रीच्या वेळी केवायसी केली तर तुम्हाला अडचण येणार नाही. या कालावधीत अनेक महिला एकाचवेळी केवायसी करत नसतील. त्यामुळे साइटवर लोड येणार नाही आणि तुम्ही सहज केवायसीची प्रोसेस पूर्ण करु शकतात.

Leave a Comment