SSC 10th Result 2026 Maharashtra Board Declared – महाराष्ट्र बोर्ड चा दहावीचा निकाल 2026 कसा चेक करायचा. तसेच दहावी बोर्डाचा निकाल लागल्यानंतर तो कोणत्या वेबसाईट वरून चेक करायचा. अशी संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत. तसेच 10 वी निकाल 2026 कोणत्या तारखेला लागेल. या प्रश्नाचे उत्तर सुद्धा तुम्हाला येथे मिळणार आहे. दहावी निकाल बद्दल ची संपूर्ण माहिती खाली देण्यात आली आहे.
10 वी चा निकाल कोणत्या तारखेला लागेल? | 10th Result 2026 Maharashtra Board Date
आता पर्यंतच्या मिळालेल्या माहितीनुसार दहावीचा निकाल 8 मे 2026 रोजी लागेल दुपारी 11:30 वाजता लागेल. तरी याबाबत बोर्डाकडून अधिकृत माहिती मिळाल्यावर माहिती अपडेट करण्यात येईल व तारीख देण्यात येईल.
तर तुम्हाला 10 वी निकाल चेक करण्याच्या अधिकृत वेबसाईट खाली देण्यात आल्या आहेत. ज्याचा वापर करून तुम्ही 10th SSC रिझल्ट 2026 मोबाईल मधून चेक करू शकता.
महाराष्ट्र स्टेट बोर्ड ने स्वतः या वेबसाईट परिपत्रकाद्वारे अधिकृतपणे जाहीर केले आहेत :
- https://results.digilocker.gov.in
- https://mahahsscboard.in
- https://sscresult.mkcl.org
- https://results.targetpublications.org
- https://results.navneet.com
- https://www.tv9marathi.com
- https://education.indianexpress.com/boards-exam/maharashtra-ssc-10-results
दहावी निकाल मोबाईल मध्ये कसा चेक करायचा याबद्दल ची पद्धत खाली देण्यात आले आहे.
1) mahresult.nic.in या वेबसाईट वरती क्लिक करा.
2) येथे SSC Examination March – 2026 Result या पर्यायावर क्लिक करा.
3) आता तुमचा Seat No. व आईचे नाव टाका.
4) View Result बटनावर क्लिक करा.
5) तुम्ही टाकलेली माहिती अचूक असल्यास निकाल दाखवला जाईल.
जर का 10 वी चा निकाल चेक करण्याची वेबसाईट Down किंवा Crash झाली तर तुम्ही एसएमएस पाठवून offline पद्धतीने SSC Result 2026 Maharashtra चेक करू शकता. मेसेज पाठवून निकाल चेक करण्याची सोपी पद्धत.
1) तुमच्या मोबाईल मधील Massaging App उघडा
2) नवीन Massage तयार करा.
3) त्याच्यात MHSSC<Space> Seat No. उदा. MHSSC D111511
4) असा मेसेज लिहून 57766 या नंबर वरती पाठवा.
5 ) तुम्ही जर माहिती बरोबर टाकली असेल तर तुमचा निकालाचा मेसेज तुम्हाला येईल.
6) अशा पध्दतीने तुम्ही SMS द्वारे 10 वी निकाल 2025 चेक करू शकता.

