Ladki Bahin Yojana News : लाडकी बहीण योजनेचा कोट्यवधी महिला लाभ घेत आहेत. दरम्यान, आता लवकरच ऑक्टोबरचा हप्तादेखील महिलांना दिला जाणार आहे. दरम्यान, लाखो महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत. या महिलांनी निकषाबाहेर जाऊन योजनेचा लाभ घेतला आहेत. आता या महिलांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. कोणत्या महिलांना योजनेचा लाभ मिळणार नाही ते जाणून घ्या.
या महिलांना मिळणार नाही लाडकी बहीण योजनेचा लाभ (These Women Will not Get Ladki Bahin Yojana Benefit)
लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी काही निकष ठरवून देण्यात आले आहे. या निकषांचे पालन करणाऱ्यांनाच योजनेचा लाभ मिळणार आहे. महिलांचे वय २१ ते ६५ वयोगटातील असावे. महिलांच्या कुटुंबाचे उत्पन्न २.५ लाखांपेक्षा जास्त नसावे. महिलांकडे चारचाकी वाहन नसावे. या निकषांमध्ये बसणाऱ्या महिलांनाच योजनेचा लाभ मिळणार आहे.
ई केवायसी न करणाऱ्या महिलांचा लाभ कायमचा बंद (Ladki Bahin Yojana KYC Mandatory)
या निकषांसोबतच आता महिलांना ई केवायसी करण्यास सांगितले आहे. ज्या महिला केवायसी करणार नाही त्यांचा लाभ बंद होणार आहे. केवायसी करण्यासाठी दोन महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. या कालावधीत तुम्हाला केवायसी पूर्ण करायचे आहे. जर तुम्ही केवायसी केले नाही तर तुम्हाला १५०० रुपये मिळणार नाहीत. फक्त पात्र महिलांनाच योजनेचा लाभ मिळावा, या उद्देशातून केवायसी करण्याचा निर्णय घेतला आहे.

हे तर नक्की वाचा :- Ladki Bahin Yojana E-KYC : वेबसाइट झाली सुरू; लाडक्या बहिणींनो २ महिन्यांची मुदत, कशी करायची E-KYC? कोणती कागदपत्रं लागणार? जाणून घ्या नेमकी प्रक्रिया..,
लाडकी बहीण योजनेत महिलांच्या अर्जांची पडताळणी केली जात आहे. अंगणवाडी सेविका महिलांच्या घरोघरी जाऊन ही पडताळणी करत आहेत. दरम्यान, यातून जवळपास ४० लाख महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत. यामुळे लाखो महिलांचे लाभ याआधीच बंद झाले आहे. यानंतर केवायसीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अनेक महिलांचे लाभ बंद होण्याची शक्यता आहे.
