aai Karj yojana which has interest free loans :- सर्वांना नमस्कार, आई कर्ज योजना २०२५ अंतर्गत महिलांनी घेतलेल्या कर्जाचे व्याज शासनाच्या वतीने संबंधित महिलेच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येते. याचा अर्थ महिलेला केवळ कर्जाची मुद्दल रक्कम भरावी लागणार आहे. पर्यटन विभागाकडून आई कर्ज योजना सुरु करण्यात आली आहे. या संदर्भात दिनांक १९ जून २०२३ रोजी शासनाने जी आर देखील काढलेला आहे. हि योजना महिला केंद्रित असल्याने या जी आरमध्ये दिलेल्या निर्देशानुसार केवळ महिलांनाच आई कर्ज योजनेचा लाभ दिला जाणार आहे.
विविध उद्योग व्यवसाय सुरु करण्यासाठी पर्यटन विभागाकडून पात्र महिलांना १५ लाख रुपये वैयक्तिक कर्ज उपलब्ध करून दिले जाते.महिलांना स्वावलंबी बनविणे हा या योजनेमागील शासनाचा उद्देश आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी व्यवसायाची नोंदणी करावी लागते.
योजनेचे नाव. | आई (व्याज परतावा धोरण) |
पात्र लाभार्थी. | व्यावसायिक महिला. |
योजेनेचे स्वरूप. | महिलांना उद्योगासाठी १५ लाख रुपयांवरील व्याज परतावा शासन भरते. |
कोणत्या विभागाकडून योजना राबविली जाते. | पर्यटन विभाग. |
जास्तीत जास्त किती व्याज शासन भरू शकते. | ४.५० लाख. |
अर्ज कसा करावा. | ऑनलाईन आणि ऑफलाईन |
15 लाख रुपयांचं बिनव्याजी कर्ज कस घ्यायचं हे पाहण्यासाठी :- येथे क्लिक करा
१५ लाख रुपये कर्ज मिळविण्यासाठी अटी
महिलांचा पर्यटन व्यवसाय पर्यटन संचालनालयाकडे नोंदणीकृत असला पाहिजे.
पर्यटन व्यवसाय महिलांच्या मालकीचा व त्यांनी चालवलेला असला पाहिजे.
या हॉटेलमध्ये किंवा रेस्टॉरंटमध्ये 50% व्यवस्थापकीय व इतर कर्मचारी महिला असणे आवश्यक आहे.
महिलांच्या मालकीच्या टूर आणि ट्रॅव्हल्स एजन्सीमध्ये देखील 50% महिला कर्मचारी असणे आवश्यक आहे.
पर्यटन व्यवसायासाठी ज्या परवानग्या आवश्यक असतात त्या सर्व त्या सर्व असणे बंधनकारक आहे.
सगळ्यात महत्वाचे म्हणजे कर्जाचे हफ्ते वेळेत भरलेले असावेत.
पर्यटन संचालनालयाकडे नोंदणीकृत पर्यटन व्यवसायामध्ये कार्यरत असलेल्या महिला सहल मार्गदर्शक, महिला सहल संचालक म्हणजेच टूर ऑपरेटर व इतर महिला कर्मचारी यांना केंद्र किंवा राज्य शासनाच्या विमा योजनेमध्ये सहभागी करून त्यांचा वार्षिक विमा हप्ता पहिली पाच वर्षे शासनाच्या वतीने देण्यात येतो.
15 लाख रुपयांचं बिनव्याजी कर्ज कस घ्यायचं हे पाहण्यासाठी :- येथे क्लिक करा
महिलांना कोणते व्यवसाय करता येतात?
आई कर्ज योजनेचा लाभ पर्यटन व्यवसायाशी संबंधित महिलांना मिळतो. यामध्ये खालील व्यवसायांचा समावेश आहे:
- होम स्टे / लॉज / रिसॉर्ट / निवास व न्याहारी सुविधा.
- हॉटेल, उपहारगृह, फास्ट फूड, बेकरी, महिला कॉमन किचन.
- टूर अँड ट्रॅव्हल एजन्सी, ट्रान्सपोर्ट, गाईडिंग, क्रूझ सेवा.
- साहसी पर्यटन (जल, थरार, गिरिभ्रमण).
- आदिवासी, निसर्ग, कृषी पर्यटन प्रकल्प.
- आयुर्वेद व योगा आधारित वेलनेस सेंटर.
- हस्तकला विक्री केंद्र, स्मरणिका शॉप्स.
- कॅरव्हॅन, हाऊस बोट, टेंट, ट्री हाऊस, पॉड्स.
- महिलांनी चालवलेले कॅफे, पर्यटन माहिती केंद्रे, टुरिस्ट हेल्प डेस्क इत्यादी.
15 लाख रुपयांचं बिनव्याजी कर्ज कस घ्यायचं हे पाहण्यासाठी :- येथे क्लिक करा
आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड/पासपोर्ट/मतदार ओळखपत्र.
- व्यवसाय नोंदणी वीज बिल/ दूरध्वनी बिल / महाराष्ट्र दुकाने आस्थापना नोंदणी प्रमाणपत्र.
- व्यवसाय मालकीचे प्रतिज्ञापत्र (₹१०० स्टॅम्पवर)
- पॅन कार्ड.
- जीएसटी क्रमांक (गरजेनुसार)
- अन्न व औषध परवाना (खाद्य व्यवसायासाठी)
- रद्द केलेला धनादेश.
- प्रकल्प संकल्पना (५०० शब्दांमध्ये)
- ₹५० चलन https://gras.mahakosh.gov.in/ वर भरून त्याची प्रिंट सोबत जोडावी.
https://nidhi.tourism.gov.in/ या पोर्टलवर नोंदणीचे पुरावे (जर उपलब्ध असतील)
LOI पत्र घेवून बँकेत कर्ज मिळविणे अर्जदाराची जबाबदारी
आई योजनेअंतर्गत महिलांना 15 लाख रुपये कर्ज मिळू शकतं. कर्ज मिळविण्यासाठी जर काही अडचण आली तर संबंधित पर्यटन विभागाचे अधिकारी आहेत ते तुम्हाला मदत करतील.
पर्यटन विभागाकडून LOI मिळाल्यानंतर तुम्हाला बँकेत जायचंय आहे. या LOI पत्रामुळे तुम्हाला कर्ज मिळणे सोपे होणार आहे.
बँकेत कर्ज मिळवीन देण्यासाठी काही दलाल सक्रीय असतात अशा दलालांपासून महिलांनी सावध राहावे. आम्ही कर्ज मिळवून देते असे सांगून ते तुमची फसवणूक करण्याची शक्यता नाकारता येत नाही.
15 लाख रुपयांचं बिनव्याजी कर्ज कस घ्यायचं हे पाहण्यासाठी :- येथे क्लिक करा
योजनेचा सारांश
निष्कर्ष.
‘आई योजना कर्ज 2025 म्हणजे महिलांसाठी पर्यटन व्यवसायात उभारी घेण्याची एक ऐतिहासिक संधी आहे. बिनव्याजी कर्ज, विमा सुविधा आणि सरकारी पाठबळ यामुळे महिलांना आपला व्यवसाय मजबूत करता येईल.
तुम्ही जर पर्यटनाशी संबंधित काही व्यवसाय सुरू करू इच्छित असाल, तर आजच अर्ज भरा.