Ladki Bahin Yojana Takrar 2026 :– राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याची “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजना सुरु करण्यास महाराष्ट्र शासनाने २८ जून २०२४ रोजी मान्यता दिली. या योजनेमार्फत महाराष्ट्र राज्यातील २१ ते ६५ वयोगटातील पात्र महिलांना दर महिना रु. १,५००/- असा आर्थिक लाभ DBT द्वारे देण्यात येतात हे तर आपल्याला माहिती आहे; परंतु आत्ता अनेक लाडक्या बहीणींचे पैसे सरकारने बंद केले आहेत.

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचा हप्ता जमा न झाल्यास लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटवर तक्रार नोंदवण्यासाठी अधिकृत माझी लाडकी बहीण योजना पोर्टलला भेट द्या. ‘अर्जदार लॉग इन’ (Applicant Login) मध्ये तुमचा मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकून लॉग इन करा. डॅशबोर्डवरील ‘तक्रार/अपील’ (Grievance/Appeal) पर्यायाची निवड करून, तुमची समस्या निवडा आणि सविस्तर माहिती भरून तक्रार सबमिट करा.
लाडकी बहीण योजनेअंतर्गत तक्रार नोंदवण्याची संपूर्ण प्रक्रिया
जर तुमचा हप्ता जमा झाला नसेल किंवा फॉर्ममध्ये काही त्रुटी असतील, तर तुम्ही खालील पद्धतींचा वापर करून तुमची तक्रार नोंदवू शकता:
१. ऑनलाइन तक्रार प्रक्रिया (पोर्टलवरून) –
१. अधिकृत वेबसाइट: शासनाच्या माझी लाडकी बहीण योजना ( https://ladakibahin.maharashtra.gov.in/ )या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.
२. लॉगिन करा: मुख्यपृष्ठावर दिलेल्या अर्जदार लॉगिन (Applicant Login) वर क्लिक करा. तुमचा नोंदणीकृत मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकून खात्यात प्रवेश करा.
३. तक्रार विभाग: मुख्य मेनूमध्ये Grievance / Add Grievance तक्रार हा पर्याय निवडा.
४. माहिती भरा: तुमच्या समस्येचा प्रकार (उदा. पैसे न येणे, केवायसी, किंवा पेंडिंग अर्ज) निवडा.
तक्रार प्रकारात (Complaint Type) ‘My Application’ निवडा.
तक्रार श्रेणीत (Complaint Category) ‘Other’ निवडा.
तुमचा आधार क्रमांक आणि अर्ज क्रमांक योग्यरित्या टाका.
५. समस्येचे वर्णन: ‘Description/वर्णन’ बॉक्समध्ये पैसे न येण्याची समस्या सविस्तर लिहा (उदा. e-KYC पूर्ण असूनही हप्ता जमा झाला नाही).
६.तक्रार सबमिट करा: तुमची समस्या सविस्तर लिहून Submit बटणावर क्लिक करा. तक्रार नोंदवल्यानंतर तुम्हाला एक संदर्भ क्रमांक (Reference/Grievance ID) मिळेल
तुम्हाला मिळालेला संदर्भ क्रमांक (Reference ID) जपून ठेवा, जेणेकरून तुम्ही नंतर तुमची तक्रार ट्रॅक (Track) करू शकता.
२. थेट हेल्पलाइन नंबरवर संपर्क साधा
जर तुम्हाला पोर्टलवर तक्रार करणे कठीण वाटत असेल, तर तुम्ही थेट शासनाच्या हेल्पलाइन नंबरवर कॉल करून मदत मिळवू शकता:
- महिला हेल्पलाइन नंबर: १८१ (181) वर कॉल करा.
- इतर संपर्क क्रमांक: 1800 120 8040 या टोल-फ्री नंबरवर संपर्क साधून तुमची अडचण सांगू शकता.
स्थानिक मदत: जवळील अंगणवाडी सेविका किंवा बालविकास प्रकल्प अधिकारी (CDPO) कार्यालयात जाऊन ऑफलाईन अर्ज देऊनही तक्रार नोंदवता येते.