फ्री टॅबलेट योजना 2026 : महाज्योती अंतर्गत 10 वी पास विद्यार्थ्यांना फ्री टॅबलेट व रोज 6 GB इंटरनेट मिळणार, ही कागदपत्रे तयार ठेवा..,

Free Tablet Yojana Maharashtra 2026 – नमस्कार मित्रांनो, चालू वर्षात 10 वी पास झालेल्या विद्यार्थ्यांना फ्री मोफत टॅबलेट देते महाराष्ट्र सरकार महाज्योती मार्फत, या योजनेचे अधिकृत नाव आहे “JEE/NEET/MHT-CET – 2026 परीक्षा पूर्व ऑनलाईन प्रशिक्षण योजना” हे टॅबलेट JEE/NEET/MHT-CET चा अभ्यास करण्यासाठी.

तर महाज्योती फ्री टॅबलेट योजना साठी फॉर्म कुठे कसा भरायचा, पात्रता, आवश्यक कागदपत्रे, निवड प्रक्रिया, नियम व अटी, टॅबलेट कधी दिले जाते, फ्री टॅबलेट योजना फॉर्म कधी सुरू होतात, फॉर्म भरण्याची शेवटची तारीख, अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिली आहे.

 योजनेचे नाव – Mahajyoti Free Tablet Yojana 2026 Maharashtra | फ्री टॅबलेट योजना 2026

महाज्योती फ्री टॅबलेट योजना फॉर्म भरल्यानंतर, ज्या विद्यार्थ्यांची निवड मेरिट लिस्ट मध्ये होते, त्यांना मोफत फ्री मध्ये टॅबलेट देईल जाते. तसेच मोफत इंटरनेट दररोज 6GB/Day डेटा आणि पुस्तके सुद्धा दिले जातात. JEE, NEET, and MHT-CET चे मोफत प्रशिक्षण 18 महिन्याचे असते.

Benifits Breakdown | फ्री टॅबलेट योजना 2026 लाभ कसा मिळतो

तर ज्या पात्र 10 वी पास विद्यार्थ्यांना “फ्री टॅबलेट योजना” साठी फॉर्म भरला असतो. त्यांची टक्केवारी नुसार मेरिट लिस्ट लावली जाते, ज्यांचे नाव मेरिट लिस्ट मध्ये असते त्यांना जिल्हा स्तरीय समाजकल्याण विभागात SMS तसेच Call करून बोलावले जाते. मोफत टॅबलेट दिले जाते.

  • विद्यार्थ्यांना मोफत फ्री Tablet
  • रिचार्ज साठी दर महा 500 रु (आधार लिंक बँक खात्यात जमा होतात)
  • मोफत प्रशिक्षण कालावधी 18 महिने असतो

Eligibility Criteria | फ्री टॅबलेट योजना 2026 पात्रता कोण अर्ज करू शकतो

  • विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा
  • मूल मुली दोघेही अर्ज करू शकता
  • विद्यार्थी हा OBC, VJ-A, NT, SBC या प्रवर्गाचा असावा.
  • चालू वर्षात 10 वी पास असावा. जसे की 2026
  • विद्यार्थ्याने 10 वी पास झाल्यावर Science ला Admission घेतलेले असावे.
  • विद्यार्थ्यांची निवड, ही त्यांना इयत्ता 10 वी च्या परीक्षेत मिळालेल्या टक्केवारी नुसार तसेच प्रवर्ग व समांतर आरक्षणानुसार करण्यात येते.
  • उमेदवाराने 10 वी पर्यंत शिक्षण पूर्ण केलेले असावे, शहरी भागातील विद्यार्थ्यांना किमान 70% गुण असावेत, तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना किमान 60% गुण असावेत.

सूचना – अजून फॉर्म सुरू झाले नाहीत, पण कागदपत्रे काढून तयार राहा. 

  1. आधार कार्ड (पुढील व मागील बाजू सहित)
  2. रहिवासी दाखला (Domicile Certificate)
  3. जातीचा दाखला (Caste Certificate)
  4. वैद्य नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र (Valid Non-Creamy Layer Certificate)
  5. 10 वी मार्कशीट
  6. 11 वी Science ला Admission घेतल्याची ऍडमिशन पावती किंवा बोनाफाईड सर्टिफिकेट
  7. दिव्यांग असल्यास सर्टिफिकेट
  8. अनाथ असल्यास सर्टिफिकेट

कॅटेगरी नुसार आरक्षण | Category Wise

सामाजिक प्रवर्गटक्केवारी
OBC59%
VJ-A10%
NT-B8%
NT-C11%
NT-D6%
SBC6%
एकुण 100%

समांतर आरक्षण पुढील प्रमाणे

  1. प्रवर्गनिहाय महिलांसाठी 30% जागा आरक्षित आहे.
  2. दिव्यांगाकरिता 4% जागा आरक्षित आहे
  3. अनाथांसाठी 1% जागा आरक्षित आहे.

या वर्षी 2026 चे फॉर्म अजून सुरू झालेले नाही, लवकरच फॉर्म सुरू होतील तेव्हा माहिती अपडेट करण्यात येईल.

अर्ज सुरू होण्याची तारीखमे 2026
अर्जाची शेवटची तारीख

फ्री टॅबलेट योजना अटी व शर्ती | Terms and Conditions

  • फॉर्म पोस्टाने किंवा ईमेल ने स्वीकारला जाणार नाही
  • जाहिरात रद्द करणे, मुदतवाढ करणे, अर्ज स्वीकारणे, नाकारणे निवड पद्धतीत बदल करणे याबाबत सर्व अधिकारी संचालक महाज्योती याचे राहतील.
  • फॉर्म भरतांना चुकीची माहिती, दिली तर विद्यार्थ्याचा निवड रद्द करण्यात येईल.
  • अर्ज करतांना कोणत्याही प्रकारच्या अडचणी असल्या केवळ महाज्योतीच्या Call Center वर संपर्क करा – 0712- 870120/21

Mahajyoti Free Tablet Yojana 2026 Apply Online | अर्ज करण्याची वेबसाईट

अर्ज करण्याची वेबसाईटApply Link
अधिकृत वेबसाईटयेथे पहा

अर्ज भरताना कोणत्याही प्रकारच्या अडचणी असल्यास केवळ महाज्योतीच्या Call Centre वर संपर्क करावा : संपर्क क्र – 0712-2870120/21
E-mail ID : mahajyotimpsc21@gmail.com

Leave a Comment