कलेक्टर ऑफिस भरती 2025 : जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकारी पदाची भरती; पगार 45,000 मिळेल, इथे आत्ता करा अर्ज..,
Jilhadhikari Karyalay Bharti 2025 : महाराष्ट्र शासन, महसूल व वन विभाग, मंत्रालय, मुंबई यांचेकडील, शासन निर्णय अन्वये जिल्हाधिकारी कार्यालय अंतर्गत रिक्त जागा भरणेकामी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तरी पात्र इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. जिल्हाधिकारी कार्यालय अंतर्गत नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी उपलब्ध झालेली आहे. भरतीची जाहिरात जिल्हा निवड समिती, तथा जिल्हाधिकारी द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. Pdf जाहिरात व अर्ज खाली पहा.
Jilhadhikari Karyalay Dhule Bharti 2025: Collector’s OfficeDhule has published a new recruitment notification for the vacant post of “Legal Officer”. There is a 01 vacant post available. The job location for this recruitment is Dhule. Interested and eligible candidates can submit their applications to the given mentioned address before the last date. The last date for submission of application is the 17th of October 2025.
जेथे शासनाच्या विरोधात न्यायालयाने निकाल दिलेला आहे अशा प्रकरणामध्ये न्यायालयाच्या निर्णयाचा अभ्यास करून तनुषंगाने अपील दाखल करण्याच्या संदर्भात उचित कार्यवाही करणे.
प्रलंबित न्यायालयीन प्रकरणे तत्परतेने निकाली काढण्यासाठी सरकारी वकिलांकडे पाठपुरावा करणे, जेथे शासन प्रतिवादी आहे अशा प्रकरणी सादर करावयाची प्रतिज्ञापत्र संबधित अधिका-यांच्या मदतीने तयार करणे.
शपथपत्राचा मसुदा तयार करणे व त्यास सक्षम प्राधिका-याची मान्यता घेऊन न्यायालयात विहीत मुदतीत सादर होईल हे पाहणे.
कार्यालयाकडे प्राप्त होणा-या सर्व प्रकारच्या कायदेविषयक बाबींबाबत / न्यायालयीन प्रकरणी सल्ला देणे व न्यायालयीन प्रकरणे हाताळणे. महसूल विषयक / परिच्छेदनिहाय अभिप्राय (parawise comments) तयार करणे / सेवाविषयक / प्रशासकीय बाबी / विभागीय चौकशी इत्यादी तथा समकालीन कायद्याची प्रस्थापित स्थिती याबाबत सर्व प्रकरणी सल्ला देणे व ती प्रकरणे हाताळणे.
अपील करणे योग्य असल्यास व तसा निर्णय झाल्यास अपीलाचा मसुदा तयार करून तो संबधित सरकारी वकिलांकडे पाठविणे व अपिलाचा अंतिम निर्णय लागेपर्यंत पाठपुरावा करणे.
मा. जिल्हाधिकारी धुळे यांनी विधिविषयक कामकाजाबाबत वेळोवेळी नेमून दिलेले कार्य विहीत मुदतीत पार पाडणे.
मा. सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय, महसूल न्यायाधिकरण व अन्य न्यायाधिकरणे यांचेकडे दाखल प्रकरणांची यादी अद्ययावत ठेवणेव वेळोवेळी सुनावणी दिनांकाबाबत अवगत करणे.
जिल्हाधिकारी कार्यालय व त्यांचे अधिनस्त कार्यालये जसे उपविभागीय अधिकारी कार्यालय, तहसिल कार्यालय यांचे न्यायविषयक संबंधित विषय हाताळणे.