Gay Gotha Scheme : गायी-म्हशींसाठी गोठा बांधण्यास २.३१ लाखांपर्यंत अनुदान; जनावरांच्या संरक्षणासाठी सरकारची योजना; असा करा अर्ज..,

Apply for cow shed construction grant in maharashtra :- सर्वांना नमस्कार, गायी-म्हशींसाठी योग्य व सुरक्षित गोठा उभारण्यासाठी राज्य सरकारची ‘गाय गोठा योजना’ शेतकऱ्यांना मोठी आर्थिक मदत देते. या योजनेमुळे दुग्धव्यवसायाला चालना मिळून ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट होत आहे.

Gay Gotha Scheme
गायी-म्हशींसाठी गोठा बांधण्यास २.३१ लाखांपर्यंत अनुदान

राज्य सरकारकडून राबविण्यात येणाऱ्या ‘गाय गोठा योजना’ अंतर्गत शेतकऱ्यांना त्यांच्या गायी-म्हशींसाठी सुरक्षित आणि योग्य गोठा बांधण्यासाठी आर्थिक मदत दिली जाते. शेतकऱ्यांकडे असलेल्या जनावरांच्या संख्येनुसार हे अनुदान थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केले जाते. या योजनेअंतर्गत किमान २ आणि जास्तीत जास्त १८ जनावरांसाठी ७७ हजार रुपये ते २ लाख ३१ हजार ५६४ रुपयांपर्यंत अनुदान मिळते. ही योजना शरद पवार ग्राम समृद्धी योजनेचा एक भाग असून २०२१ पासून सुरू आहे. अनुदानाचे वितरण तीन टप्प्यांत केले जाते. या योजनेमुळे शेतकऱ्यांचा दुग्धव्यवसाय अधिक सक्षम होतो, त्यांना स्थिर उत्पन्न मिळते, ग्रामीण बेरोजगारी कमी होते आणि दुग्धव्यवसायाला चालना मिळते.

योजनेचा उद्देश

या योजनेचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांना त्यांच्या गायी-म्हशींसाठी आवश्यक आणि योग्य सुविधा उपलब्ध करून देणे हा आहे. सुयोग्य गोठ्यामुळे जनावरांना पाऊस, थंडी, उष्णता आणि इतर प्रतिकूल हवामानापासून संरक्षण मिळते, ज्यामुळे त्यांचे आरोग्य चांगले राहते. निरोगी जनावरे अधिक दूध देतात, त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पादन वाढते आणि त्यातून उत्पन्नातही वाढ होते.

AH-MAHABMS हे अ‍ॅप डाउनलोड करून गायी-म्हशींसाठी गोठा अनुदान योजनेचा अर्ज करण्यासाठी :- येथे क्लिक करा

गायी-म्हशींच्या संख्येनुसार अनुदानाचा लाभ

२ ते ६ गायी/म्हशींसाठी – ७७ हजार १८८ रुपये

६ ते १८ गायी/म्हशींसाठी – १ लाख ५४ हजार ३७३ रुपये

१८ पेक्षा जास्त गायी/म्हशींसाठी – २ लाख ३१ हजार ५६४ रुपये

AH-MAHABMS हे अ‍ॅप डाउनलोड करून गायी-म्हशींसाठी गोठा अनुदान योजनेचा अर्ज करण्यासाठी :- येथे क्लिक करा

Gay Gotha Scheme योजनेच्या अटी

  • अर्जदार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी शेतकरी असावा.
  • अर्जदाराला पशुपालनाचे संपूर्ण ज्ञान असणे बंधनकारक.
  • अर्जदाराचे राष्ट्रीयकृत बँकेत खाते असणे आवश्यक.
  • गोठा निर्मितीसाठी जागेचा ७/१२ उतारा आणि ८-अ जोडावा लागेल.
  • अर्जदाराचा सरपंच किंवा पोलिसपाटलाचा रहिवासी दाखला आवश्यक.
  • योजनेचा लाभ घेण्यासाठी किमान २ जनावरे असणे बंधनकारक.
  • पशुधन अधिकाऱ्याचा दाखला आवश्यक की अर्जदार पशुपालन करत आहे.
  • रोजगार हमीचे प्रमाणपत्र असणे आवश्यक.
  • अर्जदाराला ग्रामपंचायतीकडून शिफारसपत्र मिळणे आवश्यक.

AH-MAHABMS हे अ‍ॅप डाउनलोड करून गायी-म्हशींसाठी गोठा अनुदान योजनेचा अर्ज करण्यासाठी :- येथे क्लिक करा

आवश्यक कागदपत्रे

  • आधारकार्ड
  • रहिवासी दाखला
  • ७/१२ उतारा
  • बँक खातेबुक
  • जातीचा दाखला
  • जनावरांचे टॅगिंग प्रमाणपत्र
  • मनरेगा जॉब कार्ड
  • ग्रामपंचायतीची शिफारसपत्र
  • स्थळ पाहणी अहवाल
  • मोबाईल नंबर
  • मेल आयडी
  • फोटो
  • स्वयंघोषणापत्र

AH-MAHABMS हे अ‍ॅप डाउनलोड करून गायी-म्हशींसाठी गोठा अनुदान योजनेचा अर्ज करण्यासाठी :- येथे क्लिक करा

अर्ज कुठे करावा

अर्ज करण्यासाठी गावातील ग्रामपंचायत कार्यालय किंवा पंचायत समिती कार्यालयात अर्ज सादर करावा लागेल. तुम्ही तालुका कृषी अधिकारी कार्यालय किंवा जिल्हा पशुसंवर्धन विभागाशीही संपर्क साधू शकता.

Gay Gotha Scheme अर्ज प्रक्रिया

  • अर्ज करण्यासाठी Google Play Store वरून AH-MAHABMS हे अ‍ॅप डाउनलोड करा.
  • तसेच तालुका पशुसंवर्धन कार्यालयातूनही अर्ज मिळतो.
  • सर्व आवश्यक कागदपत्रांसह अर्ज जमा करा.
  • अर्जाची तपासणी व निवडीनंतर अनुदान मंजूर केले जाते.

संपर्क

  • तालुका पशुसंवर्धन अधिकारी कार्यालय
  • जिल्हा पशुसंवर्धन उपसंचालक कार्यालय
  • संकेतस्थळ: https://dahd.maharashtra.gov.in/

Leave a Comment