तुमच रेशन कार्ड होऊ शकत बंद 😨 | अपात्र शिधापत्रिका तपासणी मोहीम सुरु; हि कागदपत्रे सादर करा नाहीतर होणार राशन बंद..,

Ration Card Big News Update 2025 : सर्वांना नमस्कार, शिधा व्यवस्थापन प्रणालीमध्ये ७००.१६ लक्ष राशनकार्ड धारक क्षमता आहे. हि क्षमता पूर्ण झाल्यावर या प्रणालीमध्ये नवीन लाभार्थी समाविष्ट शक्य होणार नसल्याने अपात्र, दुबार स्थलांतरित आणि मयत लाभार्थी शोधून त्यांना प्रामुख्याने वगळण्यासाठी हि अपात्र शिधापत्रिका तपासणी मोहीम सुरु करण्यात आली आहे.

शिधापत्रिका तपासणी करणे हि निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. सादर मोहिमेत अंत्योदय व प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांच्या शिधापत्रिकांची तपासणी केली जाणार आहे. या तपासणी मोहिमेसाठी सर्व आवश्यक असणारी माहिती एका अर्जामध्ये सादर केली जाणार आहे. या अर्जासोबत काही कागदपत्रे जोडावी लागणार आहेत.

ही योजना पण वाचा :- बांधकाम कामगार ऑनलाईन नोंदणी कशी करायची? घरबसल्या मोबाईलवरून असा करा अर्ज..,

रेशन अर्जासोबत जोडावी लागणारी कागदपत्रे खालीलप्रमाणे

अपात्र शिधापत्रिका तपासणी मोहीम अंतर्गत अर्जासोबत खालील कागदपत्रे जोडावी लागणार आहेत. निवासासंबधीचा पुरावा म्हणून खालीलपैकी कोणतेही एक कागदपत्र जोडावे.

  • भाडेपावती.
  • निवासस्थानकाच्या मालकी बद्दलचा पुरावा.
  • LPG जोडणी क्रमांक.
  • वीज बिल.
  • टेलीफोन किंवा मोबाईलबिल.
  • बँक पासबुक.
  • वाहनचालक परवाना.
  • मतदार ओळखपत्र.
  • आधार कार्ड.

वरीलप्रकारची कागदपत्रे शिधापत्रिका तपासणी अर्जासोबत जोडावी लागणार आहेत.

शिधापत्रिका धारकांना तपसणी करण्यासाठी कोणतेही शुल्क नाही

गावोगावी अपात्र शिधा पत्रिका तपसणी मोहीम सुरु करण्यात आली आहे. यासाठी ज्या त्या गावातील राशन दुकानदार किंवा संबधित कर्मचारी यांनी यांनी घरोघरी जावून संबधित अर्जामध्ये माहिती भरून घ्यायची आहे.

यासाठी अर्जदाराला कोणतेही शुल्क आकारले जाणार नसल्याची माहिती शासन निर्णयामध्ये म्हणजेच जी आर मध्ये देण्यात आली आहे. या संदर्भातील जीआर पाहण्यासाठी :-  येथे क्लिक करा.

शिधापत्रिका तपासणी अर्ज भरून घेण्यासाठी कोणी पैसे मागणी करत असेल तर त्यांची तक्रार अर्जदार करू शकतो.

अपात्र शिधापत्रिका तपासणी मोहीम संदर्भात ऑनलाईन तक्रार करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

शिधा पत्रिका तपासणी अर्ज नमुना पहा

शिधा पत्रिका तपासणीचा नमुना जीआर सोबत जोडलेला आहे. या जी आरची प्रत pdf मध्ये डाउनलोड करायची असल्यास खालील बटनावर क्लिक करा.

वरील बटनावर क्लिक करून शिधापत्रिका तपासणी अर्ज नमुना तुमच्या मोबाईल किंवा कॉम्पुटरमध्ये डाउनलोड करून घ्या. यामध्ये अर्ज सादर करतांना कोणकोणते कागदपत्रे लागतात या संदर्भात सविस्तर माहिती दिलेली आहे.

शीधापात्रिका तपासणीमध्ये माहिती देतांना १२ अंकी राशन कार्ड नंबर टाकावा लागतो. हा नंबर तुम्हाला जर माहित नसेल तर खालील लिंकवर क्लिक करून माहिती पहा.

अपात्र शिधापत्रिका तपासणी मोहीम अंतर्गत कागदपत्रे संदर्भात काही अडचण येत असेल तर गावातील राशन धान्य दुकानदारास संपर्क करा.

ही योजना तर नक्की वाचा :- बांधकाम कामगारांना मोफत घरगुती वस्तूंचा संच योजनेसाठी अर्ज सुरू; इथे लगेच ऑनलाईन अर्ज करा..!

शिधापत्रिका तपासणी अर्ज कसा सादर करावा?

शासनाकडून शिधापत्रिका तपासणी नमुना देण्यात आलेला आहे हा नमुना घेवून गावातील राशन दुकानदार किंवा संबधित कर्मचारी तुमच्याकडून माहिती घेतील. प्रत्यक्ष राशनकार्ड धारकास कोणतीही माहिती भरायची नाही.

शिधापत्रिका अर्ज pdf मध्ये डाउनलोड कसा करावा?

या लेखामध्ये शिधापत्रिका तपासणी अर्ज नमुना मोफत उपलब्ध करून देण्यात आलेला आहे डाउनलोड करून घ्या..!

Leave a Comment