PM Kisan Mandhana Yojana 3000 rupees pension 2025 :- सर्वांना नमस्कार, प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेद्वारे केंद्र सरकार पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात तीन हप्त्यांमध्ये सहा हजार रुपये पाठवतं. आतापर्यंत 17 हप्त्यांची रक्कम म्हणजेच 34 हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पाठवण्यात आले आहेत. पीएम किसान सन्मान योजनेप्रमाणं प्रधानमंत्री किसान मानधन योजना देखील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची आहे. पीएम किसान मानधन योजनेद्वारे शेतकऱ्यांना वयाच्या 60 वर्षांनंतर दरमहा 3 हजार रुपये पेन्शन मिळणार आहे. म्हणजेच वर्षभरात 36000 रुपये मिळतील. ही पेन्शन उर्वरित आयुष्यासाठी मिळणार आहे. पेन्शनसाठी अर्ज केल्यानंतर तुम्हाला एक विशेष पेन्शन आयडी नंबर मिळेल जो तुम्हाला भविष्यातील कामासाठी उपयोगी ठरेल. ही योजना नेमकी काय? या योजनेच्या अटी कोणत्या, योजनेचा लाभ घेण्यासाठी काय करावं लागते हे जाणून घेणार आहोत.
शेतकाऱ्यांनो, दरमहा 3,000 रुपये पेन्शन मिळवण्यासाठी व नोंदणी करण्यासाठी :- येथे क्लिक करा
पीएम किसान मानधन योजना नेमकी काय?
पीएम किसान मानधन योजनेद्वारे शेतकऱ्यांना वयाच्या 60 वर्षांनंतर दरमहा तीन हजार रुपये पेन्शनच्या स्वरुपात दिले जातात. ही योजना ऐच्छिक असून यामध्ये शेतकऱ्यांना 55 ते 200 रुपये जमा करावे लागतात. वयाची 60 वर्ष पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्यांना दरमहा 3 हजार रुपये मिळतात.
नागरी सुविधा केंद्रातून किंवा राज्य नोडल ऑफिसर यांच्याकडून या योजनेसाठी मोफत नोंदणी करता येते. 18 ते 40 वर्षांच्या दरम्यान वय असणाऱ्या शेतकऱ्यांना 60 वर्ष पूर्ण होईपर्यंत 55 ते 200 रुपयांचा प्रिमियम भरावा लागेल. केंद्र सरकार देखील या योजनेत शेतकऱ्यांच्या सोबत पैसे जमा करेल.
या योजनेसाठी अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांकडे 2 हेक्टर पेक्षा कमी शेती असणं आवश्यक आहे. शासकीय आकडेवारीनुसार या योजनेसाठी 20 लाखांहून अधिक शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे.
शेतकाऱ्यांनो, दरमहा 3,000 रुपये पेन्शन मिळवण्यासाठी व नोंदणी करण्यासाठी :- येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइट :- https://pmkmy.gov.in/
या योजनेसाठी नोंदणी कशी करायची?
Pradhan Mantri Kisan Maandhan Yojana – पीएम किसान मानधन पेन्शन योजनेसाठी नोंदणी करण्यासाठी तुम्हाला जवळच्या सार्वजनिक सेवा केंद्रात (CSC) जावे लागेल. केंद्रात जाताना आधार कार्ड, बँक पासबुक, जमिनीशी संबंधित कागदपत्रे आणि पासपोर्ट आकाराचा फोटो सोबत न्या. CSC ऑपरेटर तुमच्या कागदपत्रांच्या मदतीने ऑनलाइन फॉर्म भरेल. तसेच ऑटो-डेबिट फॉर्म देखील भरला जाईल. यामुळे या योजनेसाठी लागणारे मासिक योगदान थेट बँक खात्यातून कापले जाईल. तुम्ही पीएम किसान योजनेचे लाभार्थी असाल, तर ही रक्कम सहाय्याने आपोआप कापली जाईल.
शेतकाऱ्यांनो, दरमहा 3,000 रुपये पेन्शन मिळवण्यासाठी व नोंदणी करण्यासाठी :- येथे क्लिक करा
पायरी १:
या योजनेत सामील होऊ इच्छिणाऱ्या पात्र एसएमएफनी जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटर (सीएससी) ला भेट द्यावी.
पायरी २:
नावनोंदणी प्रक्रियेसाठी खालील पूर्वअटी आहेत:
आधार कार्ड
बचत बँक खाते क्रमांक आयएफएससी कोडसह (बँक पासबुक किंवा चेक लीव्ह/बुक किंवा बँक स्टेटमेंटची प्रत बँक खात्याचा पुरावा म्हणून).
पायरी ३:
प्रारंभिक योगदान रक्कम रोख स्वरूपात ग्रामस्तरीय उद्योजक (व्हीएलई) ला दिली जाईल.
पायरी ४:
व्हीएलई प्रमाणीकरणासाठी आधार क्रमांक, ग्राहकाचे नाव आणि जन्मतारीख आधार कार्डवर छापलेली की-इन करेल.
पायरी ५:
व्हीएलई बँक खात्याचे तपशील, मोबाइल नंबर, ईमेल पत्ता, जोडीदार (जर असेल तर) आणि नामांकित व्यक्तीचे तपशील भरून ऑनलाइन नोंदणी पूर्ण करेल.
पायरी ६:
सदस्याच्या वयानुसार देय मासिक योगदानाची प्रणाली स्वयंचलितपणे गणना करेल.
पायरी ७:
सदस्य पहिली सबस्क्रिप्शन रक्कम VLE ला रोख स्वरूपात देईल.
पायरी ८:
नोंदणीसह ऑटो डेबिट मॅन्डेट फॉर्म प्रिंट केला जाईल आणि त्यावर सबस्क्राइबरची स्वाक्षरी असेल. VLE तो स्कॅन करेल आणि सिस्टममध्ये अपलोड करेल.
पायरी ९:
एक अद्वितीय किसान पेन्शन खाते क्रमांक (KPAN) तयार केला जाईल आणि किसान कार्ड प्रिंट केले जाईल.