Online Gas Booking 2026 : मित्रांनो गॅस सिलेंडर हे आपल्या दैनंदिन जीवनातील एक महत्त्वाचा भाग बनले आहे घरगुती गॅस सिलेंडर असो की व्यावसायिक गॅस सिलेंडर सगळ्यांना स्वयंपाक करण्यासाठी याचा वापर करावाच लागतो पण सरकारने गेल्या काही दिवसापासून घरगुती गॅस सिलेंडरच्या बुकिंग मध्ये बरेच बदल केले आहे आणि या सोबतच नवीन नियमांचा समावेश देखील केला आहे.
जसं की तुम्हाला माहिती आहे पश्चिम एशियातील तणावामुळे गॅस सिलेंडरच्या पुरवठ्यावर खूप मोठा परिणाम झाला आहे यामुळे बरेच लोक एक पेक्षा जास्त सिलेंडर घरामध्ये किंवा त्यांच्या हॉटेलमध्ये साठवून ठेवत आहेत आणि हेच अवैद्य साठे पाहिजे रोखण्याकरिता केंद्र सरकारने गॅस सिलेंडरच्या बुकिंग कालावधीमध्ये देखील बदल केला आहे.
आता शहरी भागातील लोकांना 25 दिवसाच्या अंतरामध्ये गॅस सिलेंडर बुक करता येईल तसेच ग्रामीण भागातील लोकांना 45 दिवसाच्या अंतरामध्ये गॅस सिलेंडर बुक करता येणार आहे. मित्रांनो अशा परिस्थितीमध्ये गॅस एजन्सी बाहेर लांब रांगा लावण्यापेक्षा तुम्ही घरी बसून तुमच्या मोबाईल वरती हे गॅस सिलेंडर बुक करू शकता.
आणि मित्रांनो तुमची ही गॅस सिलेंडरची बुकिंग प्रक्रिया अगदी सोपे करण्यासाठी मी तुम्हाला 2026 मधील सर्वात सोपे पाच मार्ग सांगणार आहे ज्याचा वापर तुम्ही गॅस सिलेंडर बुक करण्यासाठी करू शकता.
Online Gas Booking 2026 Quick Information
| माहिती वर्णन | तपशील |
|---|---|
| योजनेचे नाव | ऑनलाइन एलपीजी गॅस बुकिंग (LPG Online Booking) |
| संबंधित विभाग | पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय, भारत सरकार |
| प्रमुख गॅस कंपन्या | इंडेन (Indane), भारत गॅस (Bharat Gas), एचपी गॅस (HP Gas) |
| लाभार्थी | सर्व गॅस जोडणीधारक भारतीय नागरिक |
| नवीन अपडेट २०२६ | शहरी भागात २५ दिवस आणि ग्रामीण भागात ४५ दिवसांचे बंधन (Inter-booking gap) |
| अधिकृत वेबसाइट | my.ebharatgas.com cx.indianoil.in myhpgas.in |
गॅस बुकिंगचे नवीन नियम 2026
- सरकारने सर्वात महत्त्वाचे बदल हे बुकिंगच्या अंतरामध्ये केले आहेत Panic Booking रोखण्याकरिता आता शहरी भागातील ग्राहकांना एका बुकिंग नंतर थेट 25 दिवसांनी नवीन गॅस सिलेंडर बुक करता येणार आहेत या सोबतच ग्रामीण भागातील ग्राहकांना 45 दिवसांनी दुसरे गॅस सिलेंडर बुक करता येणार आहे.
- सर्वात महत्त्वाचा बदल हा ekyc प्रक्रियेमध्ये केला आहे सर्व ग्राहकांसाठी आदर ekyc हे सरकारने अनिवार्य केली आहे जर ekyc केली नाही तर तुम्हाला गॅस सबसिडी मिळण्यात अडचणी येऊ शकतात.
- आणि 2026 मधील सर्वात ॲडव्हान्स आणि महत्त्वाचा बदल म्हणजे AI चॅटबोट म्हणजेच मित्रांनो 2024 मध्ये कंपन्यांनी अधिक प्रगत AI आधारित बुकिंग प्रणाली सुरू केली आहे ज्यामुळे ग्राहकाला बुकिंगचे रिअल टाईम स्टेटस समजेल.
1. WhatsApp द्वारे बुकिंग
मित्रांनो तुम्ही आता गॅस सिलेंडर तुमच्या व्हाट्सअप च्या माध्यमातून बुक करू शकता आणि हा सर्वात सोपा मार्ग आहे फक्त तुम्हाला तुमच्या गॅस कंपनीच्या अधिकृत नंबर वरती एक मेसेज पाठवायचा आहे ज्याची प्रोसेस तुम्हाला तुमच्या कंपनीनुसार खाली दिलेल्या पॉईंट मध्ये मिळेल.
- Indane Gas: तुमच्या रजिस्टर नंबरवरून 7588888824 या नंबरवर ‘REFILL’ लिहून मेसेज करा.
- HP Gas: 9222201122 या नंबरवर ‘Hi’ किंवा ‘Book’ असा मेसेज करा.
- Bharat Gas: 1800224344 या नंबरवर ‘Hi’ किंवा ‘Book’ लिहून पाठवा.
2. Missed Call सुविधा
मित्रांनो आपल्या भारतामध्ये बरेच असे गॅस सिलेंडरचे ग्राहक आहेत की त्यांच्याकडे आणखी स्मार्टफोन नाही अशा ग्राहकांसाठी सरकारने सर्वात उत्तम उपाय शोधला आहे तो म्हणजे तुम्ही एका मिस कॉल वरती तुमचे गॅस सिलेंडर बुक करू शकता आता खाली दिलेल्या नंबर वरती कॉल करून तुमच्या कंपनीनुसार तुम्हाला गॅस सिलेंडर बुक करायचे आहे.
- Indane : 8454955555 वर मिस्ड कॉल द्या.
- Bharat Gas: 7710955555 वर मिस्ड कॉल द्या.
- HP Gas: 9493602222 वर मिस्ड कॉल द्या.
3. UMANG ॲपद्वारे बुकिंग
मित्रांनो गॅस सिलेंडर बुक करण्यासाठी भारत सरकारने त्यांचे अधिकृत UMANG ॲप देखील लॉन्च केले आहे ज्याचा वापर करून तुम्ही सर्व कंपन्यांचे सिलेंडर अगदी काही क्षणांमध्ये बुक करू शकता.
- स्टेप 1: उमंग ॲप डाउनलोड करा आणि रजिस्टर करा.
- स्टेप 2: सर्च बारमध्ये ‘LPG’ सर्च करा.
- स्टेप 3: तुमची गॅस कंपनी (उदा. HP, Indane, Bharat) निवडा.
- स्टेप 4: ‘Refill Order’ वर क्लिक करा आणि ग्राहक आयडी टाका.
- स्टेप 5: ऑनलाइन पेमेंट करा किंवा COD (रोख पैसे) निवडा.
5. पेमेंट ॲप्स PhonePe, Google Pay, Amazon Pay
तुम्ही वापरत असलेले PhonePe, Google Pay, Amazon Pay या पेमेंट ॲपचा वापर करून देखील तुम्ही तुमचे गॅस सिलेंडर बुक करू शकता आणि या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून गॅस सिलेंडर बुक करणे हे अत्यंत सोपे आहे.
- ॲपमधील ‘Bill Payments’ किंवा ‘Recharge’ सेक्शनमध्ये जा.
- ‘Book Gas Cylinder’ पर्याय निवडा.
- तुमचा गॅस ऑपरेटर निवडा आणि रजिस्टर मोबाईल नंबर किंवा LPG ID टाका.
- पेमेंट पूर्ण केल्यावर तुमचे बुकिंग आपोआप नोंदवले जाते.
5. अधिकृत वेबसाइट आणि मोबाईल ॲप
मित्रांनो गॅस सिलेंडर बुक करण्याचा पाचवा उपाय म्हणजे तुम्ही वापरत असलेल्या अधिकृत कंपनीचे स्वतःची वेबसाईट तसेच त्यांचे स्वतःचे ऍप देखील आहे त्यामुळे कंपनीच्या अधिकृत पोर्टल किंवा APP च्या माध्यमातून देखील तुम्ही तुमचे गॅस सिलेंडर बुक करू शकता.
- HP Pay (HP Gas), IndianOil One (Indane), Hello BPCL (Bharat Gas).
- या ॲप्सवर तुम्ही सबसिडीची माहिती, रिफिल हिस्ट्री आणि तक्रार नोंदवू शकता.
Eligibility & Documents
मित्रांनो मी तुम्हाला गॅस सिलेंडर बुक करण्याचे पाच उपाय तर सांगितलेच पण आता तुम्हाला काही गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहेत जसे की ज्याच्याकडे अधिकृत गॅस कनेक्शन आहे ते सर्व नागरिक या पाच पद्धतीचा वापर करून त्यांचे गॅस सिलेंडर बुक करू शकतात आणि महत्त्वाचं म्हणजे गॅस सिलेंडर बुक करताना तुम्हाला गॅस एजन्सीला दिलेला नोंदणीकृत मोबाईल नंबर वापरायचा आहे किंवा तुम्ही 17 अंकी एलपीजी LPG सुद्धा वापरू शकता.
सामान्य चुका टाळा
मित्रांनो बरेच ग्राहक एलपीजी गॅस सिलेंडर बुक करताना काही सामान्य चुका करतात यामुळे त्यांचे गॅस सिलेंडर बुक होत नाही आणि त्यांना बऱ्याच समस्यांना सामोरे देखील जावं लागतं त्यामुळे गॅस सिलेंडर बुक करताना नेहमी तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबर वरूनच बुकिंग करा आणि महत्त्वाचं म्हणजे जर तुमची ई केवायसी अपूर्ण असेल तर बुकिंग मध्ये तुम्हाला तांत्रिक अडचणी येऊ शकतात आणि मित्रांनो नवीन नियमानुसार ठराविक दिवसांच्या आधी दुसरे गॅस सिलेंडर बुक करण्याचा प्रयत्न करू नका अन्यथा ते रिजेक्ट होईल.
Helpline Details
| सेवा / कंपनी | टोल-फ्री क्रमांक |
|---|---|
| इंडेन (Indane) | 1800-2333-555 |
| भारत गॅस (Bharat Gas) | 1800-22-4344 |
| एचपी गॅस (HP Gas) | 1800-2333-555 |
| गॅस गळती तक्रार (Emergency) | 1906 |
महत्वाचे प्रश्न (FAQs)
नवीन नियमानुसार दोन सिलिंडरमध्ये किती दिवसांचे अंतर असावे?
2026 मधील नवीन नियमानुसार शहरी भागातील ग्राहकांकरिता गॅस सिलेंडरच्या बुकिंग मध्ये 25 दिवसाचे अंतर असावे तसेच ग्रामीण भागातील ग्राहकांकरिता 45 दिवसाचे अंतर असणे अनिवार्य ठेवण्यात आले आहे.
ऑनलाइन पेमेंट केल्यावर पावती कोठे मिळते?
गॅस सिलेंडर बुकिंग केल्यावर लगेचच तुम्हाला रजिस्टर मोबाईल नंबर द्वारे एक एसएमएस पाठवला जातो आणि त्या एसएमएस मध्ये लिंक असते आणि त्या लिंक मध्येच डिजिटल पावती असते.
व्हॉट्सॲपवरून गॅस बुक करणे सुरक्षित आहे का?
हो मित्रांनो व्हाट्सअप वरून गॅस सिलेंडर बुक करणे हे पूर्णपणे सुरक्षित आहे आणि गॅस कंपन्यांनी स्वतः अधिकृत पणे ही सुविधा सुरू केली आहे.
निष्कर्ष
मित्रांनो डिजिटल इंडिया च्या मोहिमेमुळे आता गॅस सिलेंडर साठी तुम्हाला गॅस एजन्सीच्या लांब रांगांमध्ये उभ राहण्याची गरज नाही कारण आता तुम्ही व्हाट्सअप आणि मिस कॉल हे सर्वात वेगवान मार्ग वापरून तुमचे गॅस सिलेंडर बुक करू शकता आणि जर तुम्हाला गॅसची सबसिडी वेळेवर पाहिजे असेल तर तुमचे आधार EKYC त्वरित पूर्ण करून घ्या आणि कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत मार्गानेच गॅस सिलेंडर बुकिंग करा.
