PM Kisan Big Update : अखेर प्रतीक्षा संपली! 22nd Installment चे पैसे जमा, तुम्हाला Message आला नसेल तर हे करा…,

PM Kisan Update: शेतकऱ्यांना शेती करताना येणाऱ्या अनेक अडचणी वर मात करण्यासाठी एका खात्रीशीर आधाराची गरज असते शेतीमधील पिकाच्या पेरणी पासून ते पिकाच्या कापणी पर्यंत पैशांची जुळवाजुळव करताना शेतकऱ्याची होणारी दुर्दशा लक्षात घेऊनच केंद्र सरकारने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना म्हणजेच PM Kisan yojana योजना सुरू केली आहे आता ही योजना केवळ एक सरकारी योजना नसून आपल्या भारत देशातील प्रत्येक शेतकऱ्या प्रती व्यक्त केलेला एक सन्मानच आहे.

तर या केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये 6000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते हा निधी शेतकऱ्यांना बियाणे खते खरेदी करणे तसेच शेतीची लहान-मोठी कामे करणे किंवा त्यांच्या इतर कौटुंबिक गरजा पूर्ण करण्यासाठी मोठा हातभार लावतो. आणि महत्त्वाचं म्हणजे हा संबंधित शेतकऱ्यांवरील कर्जाचा बोजा काही प्रमाणात कमी देखील करतो जेणेकरूनशेतकरी आर्थिक दृष्ट्या सक्षम बनेल.

पण या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी कोणते शेतकरी अर्ज करू शकतात तसेच कोणते शेतकरी या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी पात्र ठरणार आहेत तसेच या योजनेअंतर्गत इतर कोणते फायदे मिळतात या सर्व प्रश्नांची उत्तरे आज आपण या लेखाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत आणि या योजनेचा पुरेपूर फायदा कसा घ्यायचा हे देखील समजून घेणार आहोत म्हणून लेख शेवटपर्यंत नक्की वाचा.

Pradhan Mantri Kisan Samman Nidhi Yojana Overview

वैशिष्ट्यतपशील
योजनेचे नावप्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM-KISAN)
कोणी सुरू केलीभारत सरकार (पंतप्रधान नरेंद्र मोदी)
उद्देशशेतकऱ्यांना निश्चित आर्थिक सहाय्य देणे, शेती खर्चात मदत करणे आणि आर्थिक स्थैर्य देणे.
लाभार्थीठराविक मर्यादेपर्यंत शेतजमीन असलेले पात्र शेतकरी कुटुंब (पती, पत्नी आणि अल्पवयीन मुले).
मिळणारा लाभदरवर्षी 6000 रुपये (प्रत्येकी 2000 रुपयांच्या तीन समान हप्त्यांमध्ये).
अधिकृत वेबसाईटhttps://pmkisan.gov.in/homenew.aspx

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना

What is PM Kisan Yojana?

तर बघा शेतकरी मित्रांनो प्रधानमंत्री किसान सन्मान योजना ही एक केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी सुरू केलेली थेट आर्थिक मदत देणारी योजना आहे ही योजना अधिकृतपणे 24 फेब्रुवारी 2019 रोजी सुरू करण्यात आली पण महत्त्वाचं म्हणजे ती एक डिसेंबर 2018 पासूनच लागू करण्यात आली होती आता या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे भारत देशातील शेतकरी कुटुंबांना एक निश्चित उत्पन्न मिळवून देणे आणि शेतीसाठी लागणाऱ्या खर्चात जसे की बियाणे खते खरेदी करणे किंवा शेतीशी इतर निगडित कामे याच्यासाठी त्यांना हातभार लावणे असा आहे.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना अंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबांना केंद्र सरकार मार्फत दरवर्षी सहा हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात येते आता ही मदत एकाच वेळी न देता प्रत्येकी दोन हजार रुपयांच्या तीन समान हप्त्यांमध्ये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाते आणि महत्त्वाचं म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर च्या माध्यमातून ही मदत शेतकऱ्यांच्या बँक अकाउंट मध्ये जमा करण्यात येते. यामुळे कोणत्याही मधल्या व्यक्तीचा हस्तक्षेप यामध्ये राहत नाही म्हणूनच संपूर्ण पैसा थेट लाभार्थ्यापर्यंत पोहोचतो ज्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य मिळण्यास मदत होते.

PM Kisan Yojana Objectives

  • प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत देशातील सर्व पात्र शेतकरी कुटुंबांना दरवर्षी सहा हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात येते.
  • या मदतीचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे शेतकऱ्यांना पेरणीपूर्वी किंवा शेतीच्या हंगामात लागणाऱ्या आवश्यक गोष्टी जसे की बियाणे खते औषधी खरेदी करण्यासाठी आर्थिक हातभार लावणे.
  • शेतकऱ्यांना छोट्या छोट्या गरजांसाठी सावकाराकडून किंवा इतर मार्गांनी कर्ज घ्यायची गरज भासू नये साठी सरकारमार्फत त्यांना रोख रक्कम उपलब्ध करून देण्यात येते आणि त्यांना कर्जमुक्त ठेवण्यासाठी सरकारमार्फत प्रयत्न केले जातात.
  • आणि महत्त्वाचं म्हणजे कोणत्याही दलाला शिवाय किंवा कोणताही व्यक्ती मध्यस्थी न ठेवता या योजनेचा संपूर्ण पैसा थेट पारदर्शकपणे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केला जातो.

Pradhan Mantri Kisan Samman Nidhi Yojana Eligibility Criteria

  • ज्या शेतकऱ्यांच्या नावावरती शेत जमीन आहे असे सर्व शेतकरी कुटुंब या योजनेसाठी पात्र आहेत.
  • या योजनेचा अर्ज करण्यासाठी शेतकऱ्याचे वय 18 वर्षापेक्षा जास्त असणे आवश्यक आहे.
  • भारतातील सर्व शेतकरी या योजनेसाठी अर्ज करू शकतात शेतकऱ्याकडे पाच हेक्टर किंवा त्यापेक्षा जास्त जमीन असेल असे शेतकरी देखील या योजनेसाठी अर्ज करू शकतात.

PM Kisan योजनेसाठी अपात्र शेतकरी

  • ज्यांच्याकडे शेती आहे पण त्यांची जमीन कोणत्याही संस्था ट्रस्ट किंवा कंपनीच्या नावावर आहे असे सर्व शेतकरी या योजनेसाठी अपात्र ठरणार आहेत.
  • जर शेतकरी सरकारी कर्मचारी असेल किंवा राज्य सरकार तसेच केंद्र सरकारच्या कोणत्याही महत्त्वाच्या पदावर असेल असा शेतकरी या योजनेसाठी अपात्र ठरतो (मात्र, ‘गट ड’ / ‘वर्ग ४’ / ‘मल्टी-टास्किंग स्टाफ’ कर्मचारी पात्र आहेत).
  • शेतकरी सरकारी नोकरी करून निवृत्त झाला असेल तसेच त्याला दरमहा दहा हजार रुपये पेन्शन मिळत असेल तर असे शेतकरी या योजनेसाठी अपात्र ठरणार आहेत.
  • शेतकरी इन्कम टॅक्स भरत असेल असा कोणताही व्यक्ती या योजनेसाठी अपात्र ठरणार आहे.
  • ज्या शेतकऱ्याच्या घरी स्वतःचा व्यवसाय आहे जसे की तो डॉक्टर इंजिनियर वकील चार्ट अकाउंटंट किंवा आर्किटेक्चर यांसारखे नोंदणीकृत व्यवसाय करत असेल असे शेतकरी या योजनेसाठी अपात्र ठरणार आहेत.
  • जर शेतकरी कोणत्याही घटनात्मक पदावर काम करत असेल किंवा कार्यरत असेल असा व्यक्ती या योजनेसाठी अपात्र ठरणार आहे (उदाहरणार्थ :खासदार आमदार महापौर जिल्हा परिषद अध्यक्ष इत्यादी).

Financial benefits available under PM Kisan Yojana

प्रधानमंत्री किसान सन्मान योजने अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी एकूण सहा हजार रुपये पर्यंतचा आर्थिक लाभ दिला जातो आणि ही रक्कम शेतकऱ्यांना एकाच वेळी मिळत नाही तर तीन समान हप्त्यांमध्ये वर्षातून तीन वेळा दिली जाते म्हणजेच प्रत्येक हप्ता हा दोन हजार रुपयांचा असतो आता साधारणपणे हे हप्ते दर चार महिन्यांच्या अंतराने शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वितरित केले जातात आणि या योजनेचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे ही मदत थेट डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर च्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाते याच्यामुळे शेतकऱ्यांना थेट दोन हजार रुपयांचा हप्ता प्राप्त होतो आता ज्या शेतकऱ्यांनी त्यांचे बँक खाते आधार कार्ड सोबत लिंक केले आहे अशा शेतकऱ्यांना ही मदत अगदी सहजरीत्या मिळते यामुळे शेतकऱ्यांना संपूर्ण पैसा पारदर्शकपणे आणि वेळेवर मिळत असतो तर शेतकरी मित्रांनो तुम्ही देखील तुमचे बँक खाते किंवा मोबाईल नंबर आधार कार्ड सोबत लिंक केला आहे का? हे एकदा नक्की तपासा.

Required documents

  • आधार कार्ड: अर्जदाराची ओळख पटवण्यासाठी हे सर्वात महत्त्वाचे.
  • बँक खाते पासबुक: लाभार्थ्याच्या खात्यामध्ये थेट पैसे जमा करण्यासाठी पासबुकची प्रत म्हणजेच त्याची झेरॉक्स अत्यंत महत्त्वाची आहे ज्यामध्ये खातेदाराचा खाते क्रमांक आयएफसी कोड आणि खातेदाराचे नाव स्पष्ट दिसेल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचे बँक खाते हे आधार कार्डाची लिंक असणे आवश्यक आहे.
  • ७/१२ उतारा आणि ८-अ (जमिनीची कागदपत्रे): शेतकऱ्याच्या नावावर किती शेत जमीन आहे याचा पुरावा म्हणून सातबारा उतारा आणि ८-अ ही महत्त्वाची कागदपत्रे आहेत.
  • मोबाईल क्रमांक: अर्जदाराचा चालू मोबाईल नंबर असणे आवश्यक आहे आणि हा नंबर आधार कार्ड सोबत लिंक असल्यास अतिउत्तम.
  • रेशन कार्ड: कुटुंबप्रमुखाची माहिती आणि कुटुंबातील सदस्यांच्या तपशीलासाठी तुम्हाला रेशन कार्ड म्हणजेच शिधापत्रिका देखील मागितली जाऊ शकते.
  • पासपोर्ट साईज आकाराचा फोटो: अर्जदाराचा अलीकडील पासपोर्ट साईट्स आकाराचा फोटो हा फोटो ऑनलाईन अर्ज करताना अपलोड करण्यासाठी महत्त्वाचा असतो.

PM Kisan Yojana Application process

नवीन शेतकरी नोंदणी (New Farmer Registration) प्रक्रिया

  • सर्वात आधी तुम्हाला प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यायची आहे.
  • आता वेबसाईटच्या मुख्य पेजवर खाली कॉल केल्यानंतर तुम्हाला फार्मर कॉर्नर या नावाचा विभाग दिसेल.
  • या फार्मर कॉर्नर मध्ये न्यू फार्मर रजिस्ट्रेशन या पर्यायावर क्लिक करा.
  • यानंतर नवीन पेज उघडेल तेथे तुम्हाला तुमची प्राथमिक माहिती ही व्यवस्थित रित्या भरायची आहे जसे की तुम्ही ग्रामीण भागातील (Rural) शेतकरी आहात की शहरी (Urban), ते निवडा. तुमचा आधार क्रमांक टाका. तुमचा मोबाईल क्रमांक (जो आधारशी लिंक असेल) टाका. तुमचे राज्य (State) निवडा. दिलेला कॅप्चा कोड (Captcha Code) अचूक भरा. ‘Get OTP’ बटणावर क्लिक करा.
  • आता तुमच्या मोबाईल वरती आलेला चार अंकी ओटीपी टाकून सबमिट या बटणावर क्लिक करा यानंतर तुमच्या आधार लिंक असलेल्या मोबाईल नंबर वरती पुन्हा एक सहा अंकी ओटीपी येईल तो टाकून वेरिफाय आधार ओटीपी ऑप्शन वर क्लिक करा.
  • एकदा तुमची व्हेरिफिकेशन झाल्यावर तुमच्यासमोर मुख्य अर्ज उघडेल तुमच्या आधार कार्ड वरूनतुमचे नाव पत्ता जन्मतारीख इत्यादी माहिती आपोआप भरली जाईल तुम्हाला फक्त उर्वरित माहिती हे काळजीपूर्वक भरावी लागेल जसे की जिल्हा, तालुका आणि गाव निवडा. तुमचा प्रवर्ग (Category – SC/ST/General) निवडा. शेतकरी प्रकार (Farmer Type – Small/Marginal) निवडा. जमिनीचा तपशील (Land Details): तुमच्या ७/१२ उताऱ्यावरील सर्वे/गट क्रमांक, खाते क्रमांक (८-अ) आणि जमिनीचे एकूण क्षेत्रफळ (हेक्टरमध्ये) अचूकपणे भरा. (ही माहिती ‘Land Registration ID’ मध्ये भरावी लागते). रेशन कार्ड क्रमांक टाका.
  • तुम्हाला आता तुमच्या जमिनीचा पुरावा म्हणून सातबारा उतारा आणि ८-अ उतारा याचे पीडीएफ फाईल बनवून अपलोड करायला सांगण्यात येईल आता काही राज्यांमध्ये ही तपासणी ऑनलाईन पद्धतीने होते पण काही कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक असू शकते.
  • अर्जामध्ये सर्व माहिती व्यवस्थित भरून झाल्यानंतर आणि सर्व कागदपत्रे व्यवस्थित अपलोड केल्यानंतर सेव किंवा सबमिट बटणावर क्लिक करा आता तुमचा अर्ज यशस्वीरित्या नोंदवला जाईल आणि तुम्हाला एक फार्मर आयडी किंवा एप्लीकेशन आयडी मिळेल जो तुम्हाला पुढील संदर्भासाठी व्यवस्थित रित्या जपून ठेवायचा आहे.

e-KYC करण्याची प्रक्रिया

या योजनेची ई केवायसी करणे अत्यंत आवश्यक आहे आणि सरकारने ते अनिवार्य देखील केली आहे जर तुम्ही केवायसी प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केले तर तुम्हाला या योजनेचा लाभ दिला जातो.

  • आता ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी पुन्हा http://pmkisan.gov.in/ च्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या यानंतर फार्मर कॉर्नर्स या ऑप्शनवर क्लिक करा.
  • आता E-KYC या बटनवर क्लिक करा.
  • त्यानंतर तुमचा आधार कार्ड क्रमांक टाका आणि सर्च या बटनवर क्लिक करा.
  • आता तुमच्या आधार कार्ड सोबत लिंक असलेला मोबाईल नंबर तुम्हाला इथे टाकायचा आहे आणि गेट मोबाईल ओटीपी यावरती क्लिक करायचा आहे.
  • आता तुमच्या आधार कार्डची लिंक असलेल्या मोबाईल नंबर वरती एक ओटीपी येईल तो ओटीपी व्यवस्थित रित्या भरा आणि सबमिट ओटीपी या पर्यायावर क्लिक करा.
  • e-KYC has been done successfully’ असा मेसेज दिसेल. तुमचे e-KYC पूर्ण होईल.

बायोमेट्रिक द्वारे (CSC सेंटर)

जर तुमचा आधार कार्ड क्रमांक तुमच्या मोबाईल नंबर सोबत लिंक नसेल तर तुम्ही बायोमेट्रिक पद्धतीने सीएससी सेंटर वरती जाऊन या योजनेची ही केवायसी करू शकता.

  • तर केवायसी करण्यासाठी तुमच्या गावातील जवळील आपले सरकार सेवा केंद्र म्हणजेच सीएससी सेंटरला भेट द्या.
  • तेथे ऑपरेटरला सांगा की मला पी एम किसान योजनेची केवायसी करायची आहे.
  • आता ऑपरेटर त्याचा सीएससी आयडी लॉगिन करून ई केवायसी करून देतील.
  • आता ऑपरेटरला तुम्हाला तुमचा आधार कार्ड क्रमांक द्यायचा आहे दिल्यानंतर ते बायोमेट्रिक मशीन वर तुमचा ठसा घेतील.
  • तुमचा ठसा व्हेरिफाय होताच तुमची ई केवायसी यशस्वीरित्या पूर्ण होईल.

PM-KISAN 22st installment: Latest Update

शेतकऱ्यांच्या मनात सर्वात मोठा प्रश्न आहे तो पुढील हप्त्याची तारीख. पंतप्रधान किसान योजनेचा २२ वा हप्ता फेब्रुवारी २०२६ मध्ये जारी होण्याची अपेक्षा आहे. तथापि, सरकारने अद्याप अधिकृतपणे तारीख जाहीर केलेली नाही. या योजनेअंतर्गत हप्ते दर चार महिन्यांनी जारी केले जातात, म्हणून फेब्रुवारी हा संभाव्य काळ मानला जात आहे. म्हणूनच तुम्ही अद्याप देखील केवायसी पूर्ण केली नसेल तर लवकरात लवकर करून घ्या जेणेकरून 22 वा हप्ता तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होईल.

FAQ (Frequently Asked Questions)

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM-KISAN) योजना नक्की काय आहे?

तर बघा प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही भारत सरकारची शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आलेली एक आर्थिक मदत देणारी योजना आहे या योजनेद्वारे ज्या शेतकऱ्यांच्या नावावरती शेत जमीन आहे अशा पात्र शेतकऱ्यांच्या कुटुंबांना दरवर्षी सहा हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात येते आता ही रक्कम दोन हजार रुपयांच्या तीन समान हफ्त्यांमध्ये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाते.

या योजनेचा लाभ कुटुंबातील पती-पत्नी दोघांना स्वतंत्रपणे मिळू शकतो का?

नाही ही योजना प्रति शेतकरी नसून ही योजना प्रती शेतकरी कुटुंब आहे असं समजा या योजनेसाठी कुटुंब म्हणजेच पती-पत्नी आणि त्याची अल्पवयीन मुले 18 वर्षाखालील असा एक घटक मानला जातो त्यामुळे संपूर्ण कुटुंबाला मिळून वर्षाला सहा हजार रुपये म्हणजेच दोन हजार रुपयांचे तीन हप्ते मिळत असतात पती-पत्नी दोघांना वेगळे पैसे मिळत नाहीत.

e-KYC करणे बंधनकारक आहे का? ते का करावे?

होय या योजनेमध्ये ई केवायसी करणे अत्यंत आवश्यक आहे आणि सरकारने अनिवार्य देखील केले आहे सरकारने हा नियम बऱ्याच काळापासून लागू केला आहे कारण यामुळे योग्य लाभार्थ्याची ओळख पडते आणि फसवणूक होणे टाळते जर तुम्ही तुमचे इकेवायसी म्हणजेच आधार वेरिफिकेशन पूर्ण केले नाही तर तुम्हाला या योजनेचा पुढील हप्ता मिळणार नाही.

मी अर्ज केला आहे, पण माझ्या खात्यात पैसे (हप्ता) आले नाहीत. मी काय करू?

जर तुम्हाला हप्ता मिळाला नसेल तर सर्वात आधी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या अधिकृत वेबसाईट वरती भेट द्या तेथे जाऊन बेनिफिशियरी स्टेटस तपासा तेथे तुम्हाला हप्ता न येण्याचे योग्य कारण मिळेल जसे की तुमची ई केवायसी अद्याप अपूर्ण आहे किंवा बँक खाते आधार कार्डशी लिंक नाही असे तुम्हाला तेथे कारणे दिसतील ते कारण समजून घेऊन तुम्ही अर्जामधील त्रुटी दुरुस्त करू शकता.

Leave a Comment