Post-Matric Scholarship 2026 : विद्यार्थी मित्रांनो, ओबीसी कॅटेगिरी मधील आर्थिक दृष्ट्या मागासवर्गीय गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या शालेय शिक्षण नंतर पोस्ट मॅट्रिक म्हणजेच उच्च शिक्षण घेणे आर्थिक परिस्थितीमुळे कठीण होते. अशा गुणवंत विद्यार्थ्यांना शैक्षणिक सन्मान मिळावा तसेच, ते शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्रातील ओबीसी विद्यार्थ्यांसाठी Post Matric Scholarship to OBC Students योजना सुरू केली आहे. महत्त्वाचे म्हणजे या योजनेअंतर्गत ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना विद्यालयीन शिक्षण तसेच व्यावसायिक अभ्यासक्रम या सोबतच डिप्लोमा आणि इतर उच्च शिक्षणासाठी स्कॉलरशिपच्या स्वरूपात आर्थिक मदत दिली जाते.
Post-Matric Scholarship to OBC Students ही स्कॉलरशिप महाराष्ट्रातील गुणवंत विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त आहे आतापर्यंत लाखो विद्यार्थ्यांनी या स्कॉलरशिपचा लाभ मिळवलेला आहे. आता सुरू असलेल्या 2025-26 शैक्षणिक वर्षासाठी या स्कॉलरशिपची अर्ज प्रक्रिया MahaDBT या पोर्टल मार्फत सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे या योजनेबद्दलची पात्रता, लाभ, आवश्यक कागदपत्रे, तसेच अर्ज प्रक्रिया याची सविस्तर माहिती आज आपण या लेखाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.
OBC पोस्ट मैट्रिक स्कॉलरशिप योजना
| योजना | Post-Matric Scholarship to OBC Students, Maharashtra 2025-26 |
| उद्देश | OBC विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी आर्थिक मदत उपलब्ध करून देणे |
| मदत | ट्युशन फी, परीक्षा फी, होस्टेल/मेस फी, देखभाल भत्ता |
| लाभ | ₹90 ते ₹425 प्रति महिना (Day Scholar/Hosteller प्रमाणे) + फी माफी |
| सुरुवात | महाराष्ट्र शासन (MahaDBT पोर्टलमार्फत अर्ज) |
| अर्ज प्रक्रिया | https://mahadbt.maharashtra.gov.in/ |

🎓 425 रु. दरमहा स्कॉलरशिप तसेच मोफत शिक्षण योजनेचा अर्ज करण्यासाठी :- येथे क्लिक करा
📲 अर्ज करण्यासाठी कागदपत्रांची यादी पाहण्यासाठी :- येथे क्लिक करा
OBC पोस्ट मैट्रिक स्कॉलरशिप योजना काय आहे
महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्रातील OBC प्रवर्गातील गुणवंत आणि आर्थिक दृष्ट्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी Post-Matric Scholarship to OBC Students ही योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत इतर मागासवर्गीय OBC प्रवर्गातील जे विद्यार्थी दहावीनंतर Post-Matric चे शिक्षण घेतात अशा विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणासाठी लागणारा खर्च हा महाराष्ट्र सरकारमार्फत देण्यात येतो.
महत्त्वाची बाब म्हणजे जे विद्यार्थी व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी म्हणजेच B.Ed., D.Ed., Diploma, Professional Courses शिक्षण घेतात अशा विद्यार्थ्यांना अतिरिक्त शुल्क माफी मिळते. तसेच दिवसाने शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना 90 ते 190 रुपये प्रति महिना तर वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना 150 ते 425 रुपये प्रति महिन्यापर्यंत आर्थिक मदत मिळते.

🎓 425 रु. दरमहा स्कॉलरशिप तसेच मोफत शिक्षण योजनेचा अर्ज करण्यासाठी :- येथे क्लिक करा
📲 अर्ज करण्यासाठी कागदपत्रांची यादी पाहण्यासाठी :- येथे क्लिक करा
हे नक्की वाचा: अंगणवाडी सेविका भरती : १२ वी पास महिलांसाठी “अंगणवाडी मदतनीस” पदांची भरती; इथे जाहिरात वाचून अर्ज करा..,
OBC पोस्ट मैट्रिक स्कॉलरशिप योजनेची पात्रता
- अर्जदार विद्यार्थी हा कायमचा महाराष्ट्रातील रहिवासी असावा.
- अर्जदार विद्यार्थी इतर मागासवर्गीय OBC प्रवर्गातील असावा.
- अर्जदार विद्यार्थ्याने दहावीचे शिक्षण पूर्ण केलेले असावे.
- शिष्यवृत्ती चा लाभ घेण्यासाठी महाविद्यालयीन, व्यावसायि तसेच डिप्लोमा किंवा तांत्रिक शिक्षणासाठी प्रवेश घेतलेला असावा.
- अर्जदार विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ₹1,50,000 पेक्षा कमी असावे.
- अर्जदार विद्यार्थ्यांची किमान 75 टक्के हजेरी असणे आवश्यक आहे.
- महत्त्वाचे म्हणजे या शिष्यवृत्तीचा लाभ एकाच वेळी दुसऱ्या शिष्यवृत्ती किंवा स्टायपेंडसोबत घेता येणार नाही.
- विद्यार्थी नियमित शिक्षणक्रमात शिकणारा असावा (Part-time किंवा correspondence course चालणार नाही).
- जर एखादा अर्जदार विद्यार्थी एखाद्या वर्षात नापास झाला असेल तर त्या वर्षाचा लाभ त्याला मिळेल पण पुढील वर्षी पुन्हा शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी त्याला समोरील वर्गात प्रवेश मिळणे आवश्यक आहे.

🎓 425 रु. दरमहा स्कॉलरशिप तसेच मोफत शिक्षण योजनेचा अर्ज करण्यासाठी :- येथे क्लिक करा
📲 अर्ज करण्यासाठी कागदपत्रांची यादी पाहण्यासाठी :- येथे क्लिक करा
OBC पोस्ट मैट्रिक स्कॉलरशिप योजनेतून मिळणारे लाभ
| अभ्यासक्रम प्रकार | मासिक शिष्यवृत्ती | इतर लाभ |
|---|---|---|
| होस्टेलमध्ये राहणारे विद्यार्थी | ₹425 ते ₹820 | मेस फी, राहण्याचा खर्च |
| घरी राहणारे विद्यार्थी | ₹190 ते ₹330 | शैक्षणिक साहित्य खर्च |
| विशेष अभ्यासक्रम | वेगवेगळ्या दराने | पुस्तके, ट्युशन फी |
Post-Matric Scholarship to OBC Students
