Lek Ladki Yojana Maharashtra 2025 In Marathi :- नमस्कार! आता महाराष्ट्रातील मुलींना महाराष्ट्र सरकारकडून ₹75,000 मिळणार आहेत. मित्रांनो, राज्य सरकारने आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील जन्मलेल्या मुलींच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत देण्यासाठी एक नवीन योजना सुरू केली आहे. या योजनेचे नाव “लेक लाडकी योजना” आहे.
माझी कन्या भाग्यश्री योजना अधिक्रमित करून त्याएैवजी मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी योजना महिला व बाल विकास विभाग,शासन निर्णय क्र.एबावि-2022/प्र.क्र.251/का.6दि30/10/2023 नुसार सुरू करणेत आली आहे.
मुलींचा जन्मदर वाढविणे,मुलींच्या शिक्षणाबाबत प्रोत्साहन तथा खात्री देणे यासाठी दिनांक 01 आगष्ट 2017 पासून माझी कन्या भाग्यश्री(सुधारित)नविन योजना करण्यात आली होती.सदर योजनेस अपुरा प्रतिसाद विचारात घेता सदर योजना अधिक्रमित करून दिनांक 1 एप्रील 2023 पासून मुलींच्या जन्मानंतर तिच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी ही नविन योजना सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे.


🎓 लेक लाडकी योजना 1 लाख 1000 रुपये मिळवण्यासाठी :- येथे क्लिक करा
📲 लेक लाडकी योजना महाराष्ट्र कागदपत्रे यादी पाहण्यासाठी :- येथे क्लिक करा
| फॉर्म PDF Download करा | येथे क्लिक करा |
| शासन निर्णय GR Download | Download PDF |
योजनेची उद्दिष्टे
1.मुलीच्या जन्मास प्रोत्साहन देवून मुलींचा जन्मदर वाढविणे.
2.मुलींच्या शिक्षणास चालना देणे.
3.मुलींचा मृत्यूदर कमी करणे व बालविवाह रोखणे.
4.कुपोषण कमी करणे.
5.शाळाबाह्यय मुलींचे प्रमाण 0(शून्य)वर आणण्यासाठी प्रोत्साहीत करणे.
सदर योजनेअंतर्गत लाभ द्यावयाचा लाभ खालील अटी व शर्ती नुसार
लेक लाडकी योजनाअंतर्गत पिवळ्या व केशरी शिधापत्रिकाधारक कुटुंबात मुलीच्या जन्मानंतर व शिक्षण घेत असताना काही रक्कम व लाभार्थी मुलीचे वय 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर अशी पाच हप्त्यात मुलीला रक्कम देण्यात येणार आहे.

🎓 लेक लाडकी योजना 1 लाख 1000 रुपये मिळवण्यासाठी :- येथे क्लिक करा
📲 लेक लाडकी योजना महाराष्ट्र कागदपत्रे यादी पाहण्यासाठी :- येथे क्लिक करा
| फॉर्म PDF Download करा | येथे क्लिक करा |
| शासन निर्णय GR Download | Download PDF |
कोणाला मिळणार लाभ याबाबत
लेक लाडकी योजनाअंतर्गत पिवळ्या व केशरी शिधापत्रिकाधारक कुटुंबात दिनांक 1 एप्रिल 2023 वा तदनंतर मुलीच्या जन्मानंतर 5 हजार रूपये,इयत्ता पहिलीत 6 हजार रूपये.सहावीत 7 हजार रूपये,अकरावीत 8 हजार रूपये तर मुलीचे वय 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर तिला 75 हजार रूपये याप्रमाणे एकूण रूपये 1,01,000/-एवढी रक्कम पाच हप्त्यात देण्यात येईल.
अटी व शर्ती
1.ही योजना पिवळ्या व केशरी शिधापत्रिकाधारक कुटूंबामध्ये दिनांक 1 एप्रिल 2023 रोजी वा त्यांनतर जन्माला येणा-या एक अथवा दोन मुलींना लागू राहील.तसेच एक मुलगा व एक मुलगी असल्यास मुलीला लागु राहील.
- पहिल्या अपत्याच्या तिस-या हप्त्यासाठी व दुस-या अपत्याच्या दुस-या हप्त्यासाठी अर्ज सादर करतेवेळी माता-पित्याने कुटुंब नियोजन प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य राहील.
3.तसेच दुस-या प्रसूतीच्या वेळी जुळी अपत्ये जन्माला आल्यास एक मुलगी किंवा दोन्ही मुलींना या योजनेचा लाभ अनुज्ञेय राहील.मात्र त्यांनतर माता /पित्याने कुटूंब नियोजन शस्त्रक्रिया करणे आवश्यक राहील.
4.दिनांक 1 एप्रिल 2023 पूर्वी एक मुलगी/मुलगा आहे व त्यांनतर जन्माला आलेल्या दुस-या मुलीस किंवा जुळ्या मुलींना (स्वतंत्र)ही योजना अनुज्ञेय राहील.मात्र पाता /पित्याने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे आवश्यक राहील.
5.लाभार्थींचे कुटुंब महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असणे आवश्यक लाहील.
- लाभार्थी बॅंक खाते महाराष्ट्र राज्यात असणे आवश्यक आहे.
7.लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम रू.1.00 लक्ष पेक्षा जास्त नसावे.

🎓 लेक लाडकी योजना 1 लाख 1000 रुपये मिळवण्यासाठी :- येथे क्लिक करा
📲 लेक लाडकी योजना महाराष्ट्र कागदपत्रे यादी पाहण्यासाठी :- येथे क्लिक करा
| फॉर्म PDF Download करा | येथे क्लिक करा |
| शासन निर्णय GR Download | Download PDF |
लाभ कसा व किती मिळणार आहे
| अ.क्र. | तपशिल | हप्ता | रक्कम रूपये |
| 1 | मुलीच्या जन्मा नंतर | पहिला हप्ता | 5000/- |
| 2 | इयत्ता पहिलीत | दुसरा हप्ता | 6000/- |
| 3 | इयत्ता सहावीत | तिसरा हप्ता | 7000/- |
| 4 | इयत्ता अकरा वीत | चौथा हप्ता | 8000/- |
| 5 | मुलीचे वय 18 वर्ष पूर्ण झाल्या नंतर | पाचवा हप्ता | 75000/- |
| एकुण | 101000/- |
अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रेः–
1) लाभार्थीचा जन्माचा दाखला
2) कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न १ लाखपेक्षा जास्त नसल्याबाबत तहसिलदार / सक्षम अधिकारी संलग्न
3) लाभार्थीचे आधार कार्डची छायांकित प्रत (प्रथम लाभावेळी ही अट शिथील राहील)
4)पालकाचे आधार कार्डची छायांकित प्रत
5) बँकेच्या पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत
6) रेशनकार्ड (पिवळे अथवा केशरी रेशन कार्ड साक्षांकित प्रत)
7)लाभार्थीचे कुटुंब महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असलेबाबतचा दाखला
8)लाभार्थीचा व आईचा संयुक्त फोटो
9) मतदान ओळखपत्र छायांकित प्रत (शेवटच्या लाभाकरिता १८ वर्ष पूर्ण झाल्यांनतर मुलीव नाव असल्याचा दाखला)
10) संबधित टप्प्यावरील लाभाकरिता शिक्षण घेत असल्याबाबतचा संबंधित शाळेचा दाखला (Bonafied)
11)कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया प्रमाणपत्र (पहिल्या अपत्यासाठी तिस-या हप्त्यासाठी व दुस-या अपत्यासाठी दुस-या हप्त्यासाठी अर्ज करीत असल्यास कुटुंब नियोजन प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे )
12) अंतिम लाभाकरिता मुलीचा विवाह झालेला नसणे आवश्यक राहील.(अविवाहीत असल्याबाबत लाभार्थींचे स्वयं घोषणापत्र)

🎓 लेक लाडकी योजना 1 लाख 1000 रुपये मिळवण्यासाठी :- येथे क्लिक करा
📲 लेक लाडकी योजना महाराष्ट्र कागदपत्रे यादी पाहण्यासाठी :- येथे क्लिक करा
| फॉर्म PDF Download करा | येथे क्लिक करा |
| शासन निर्णय GR Download | Download PDF |
