गाय म्हैस अर्ज सुरु; सरकार देतय 50 ते 75 टक्के अनुदानावर गाय-म्हैस सोबत मिळणार कडबाकुट्टी यंत्र व मुरघास – येथे लगेच फॉर्म भरा..,

कोण अर्ज करू शकतो?

या योजनांचा लाभ घेण्यासाठी अर्जदार हा संबंधित जिल्ह्यातील म्हणजेच विदर्भ किंवा मराठवाड्यातील दिलेल्या १९ जिल्ह्यातील पशुपालक असणे आवश्यक आहे.

त्याच्याकडे किमान १ तरी दुधाळ जनावर असणे आवश्यक आहे, जनावरांची काळजी घेण्याची क्षमता आणि दुग्धव्यवसाय करण्याची तयारी असावी.

त्यामुळे तुम्ही किंवा तुमच्या मित्र परीवरील कोणी या योजनेसाठी पात्र असतील तर गाय म्हैस अर्ज सुरु झाले आहे तुमचा अर्ज सादर करून द्या.

image 11

योजनेसाठी लागणारी कागदपत्रे

गाय म्हैस अर्ज सुरु झाले असून या योजनेचा लाभ घेण्यासाठी पशुपालकाकडे खालील कागदपत्रे असणे आवश्यक आहे.

  • अर्जदाराचे आधार कार्ड स्कॅन करून ठेवावे.
  • राशन कार्ड.
  • राशन कार्डवरील सर्व सदस्यांचे आधार नंबर.
  • फार्मर पोअरर कोड.
  • दुध खरेदी प्रमाणपत्र.
  • सातबारा.
  • पशुआधार कार्ड. (त्यावरील tag number)
  • बँक पासबुक.

नोंदणीसाठी ऑनलाईन अर्ज लिंक –  https://vmddp.com/register

अर्ज करताना सर्व माहिती अचूक भरावी, अन्यथा अर्ज अपात्र ठरू शकतो.

योजनेचा सारांश

विदर्भ–मराठवाडा दुग्धविकास प्रकल्प टप्पा दोन हा पशुपालकांसाठी मोठी संधी आहे. योग्य वेळी अर्ज करून या योजनांचा लाभ घेतल्यास दुग्धव्यवसायातून चांगले उत्पन्न मिळू शकते. त्यामुळे पात्र पशुपालकांनी विलंब न करता ऑनलाईन अर्ज करावा, असे आवाहन करण्यात येत आहे.

गाय म्हैस योजनेसाठी कोण अर्ज करू शकतो?

या योजनेसाठी विदर्भ व मराठवाड्यातील १९ जिल्ह्यातील पशुपालक अर्ज सादर करू शकतात.

अर्ज प्रोसेस कशी आहे?

योजनेचा लाभ घेण्यासाठी पशुपालकांना ऑनलाईन अर्ज सादर करणे आवश्यक आहे. –  https://vmddp.com या संकेतस्थळावर इच्छुक अर्जदार नोंदणी करू शकतात.

कागदपत्रे कोणकोणती लागतात?

अर्जदाराचे आधार कार्ड
ऑनलाईन किंवा ऑफलाईन राशन कार्ड.
राशन कार्डवरील सर्व सदस्यांचे आधार नंबर.
शेतकऱ्यांचा फार्मर पोअरर कोड.
देत देत असल्याबाबत दुध खरेदी प्रमाणपत्र.
जमिनीचा सातबारा.
जनावरांचे पशुआधार कार्ड. (त्यावरील tag number)
बँकेचे पासबुक.

किती अनुदान मिळते?

दुधाळ गाय म्हैस साठी ५० टक्के तर कालवडीसाठी ७५ टक्के अनुदान आहे. कडबा कुट्टी मशीनसाठी देखील ५० टक्के अनुदान मिळते.