मित्रांनो पॅन कार्ड आधार कार्ड सोबत लिंक करणे हे एक सरकारी प्रक्रिया आहे ज्याद्वारे तुमचा एक कायमचा खाते नंबर तुमच्या आधार कार्डशी जोडला जातो. म्हणूनच भारत सरकारच्या आयकर विभागाने हा नियम सर्व भारतीयांसाठी अनिवार्य केला आहे तसेच हा नियम लागू करण्यात मागचा मुख्य उद्देश म्हणजे देशातील इन्कम टॅक्स सिस्टीम अधिक पारदर्शक करणे असा आहे कारण यापूर्वी अनेक लोक कर चुकवण्यासाठी किंवा आर्थिक घोटाळे करण्यासाठी एकापेक्षा जास्त पॅन कार्ड बनवत होते आता पॅन कार्ड घे आधार कार्ड सोबत लिंक केल्यामुळे एका व्यक्तीला एकच पॅन कार्ड मिळाला आहे हे सुनिश्चित करता येईल यामुळे सरकारला TAX EVASION थांबवता येईल आणि प्रत्येक भारतीय व्यक्तीच्या आर्थिक व्यवहारावर अचूक लक्ष ठेवता येईल ज्यामुळे त्या व्यक्तीचे संपूर्ण आर्थिक व्यवहार हे पारदर्शक आणि सुरक्षित बनतील.
Aadhaar-PAN Link Application Process & Status Check
मित्रांनो आता पॅन आणि आधार कार्ड लिंक करणे अत्यंत सोपे झाले आहे जरी तुम्हाला त्यासाठी शंभर रुपये विलंब शुल्क भरावे लागत असेल तरी आपण ऑनलाईन पद्धतीने किंवा SMS च्या माध्यमातून हे पॅन कार्ड आधार कार्ड सोबत लिंक कसं करायचं याची स्टेप बाय स्टेप प्रोसेस आता पाहूया:
इन्कम टॅक्स पोर्टलवरून ऑनलाइन (Online) पद्धत
- मित्रांनो आधार कार्ड हे पॅन कार्ड सोबत लिंक करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला इन्कम टॅक्सच्या अधिकृत वेबसाईट ला भेट द्यायची आहे
- आता वेबसाईटच्या होम पेज वरती तुम्हाला क्विक लिंक नावाचा विभाग शोधायचा आहे.
- Quick Links मध्ये e-Pay Tax या पर्यायावर क्लिक करा.
- येथे तुम्हाला तुमची माहिती व्यवस्थित रित्या भरायची आहे जसे की तुमचा पॅन कार्ड नंबर यानंतर परत तुम्हाला पॅन कार्ड नंबर कन्फर्म करायचा आहेतुमचा कोणताही एक मोबाईल नंबर टाका मोबाईल नंबर आधार कार्ड सोबत लिंक नसेल तरी चालेल त्यानंतर कंटिन्यू या बटन वरती क्लिक करा आता तुम्ही टाकलेल्या मोबाईल नंबर वरती एक सहा अंकी ओटीपी येईल तो टाकून कंटिन्यू करा.
- ओटीपी टाकल्यानंतर तुम्हाला तुमचे नाव दिसेल आता इन्कम टॅक्स या पर्यायासमोरील प्रोसेस या बटन वरती क्लिक करा.
- पुढील पानावर, ‘Assessment Year’ (AY) निवडा. (उदा. तुम्ही २०२५ मध्ये पेमेंट करत असाल, तर ‘2026-27’ हे वर्ष निवडा.
- त्याखालील ‘Type of Payment (Minor Head)’ मध्ये ‘Other Receipts (500)’ हा पर्याय निवडा आणि ‘Continue’ करा.
- पुढील पेज वरती तुम्हाला Others या बॉक्समध्ये तुम्हाला एक हजार रुपये आपोआप दिसतील आता फक्त तुम्हाला कंटिन्यूचे बटन दाबायचे आहे.
- आता तुमच्यासमोर वेगवेगळी पेमेंट करण्याचे पर्याय येतील जसं की नेट बँकिंग, डेबिट कार्ड, पेमेंट गेटवे आता तुमच्या सोयीनुसार तुम्हाला पर्याय निवडायचा आहे आणि हजार रुपयांचे पेमेंट पूर्ण करायचे आहेत.
- झाल्यानंतर त्याची पावती डाऊनलोड करून ठेवा भविष्यामध्ये कामात येईल.
आधार-पॅन लिंक करणे (पेमेंटनंतर ४-५ दिवसांनी)
NOTE: मित्रांनो तुम्ही भरलेले शुल्क इन्कम टॅक्स पोर्टलवर अपडेट होण्याकरिता किमान 48 तास ते चार ते पाच दिवसापर्यंत एवढा कालावधी देखील लागू शकतो त्यामुळे पेमेंट केल्यावर लगेचच लिंक करण्याचा प्रयत्न करू नका.
- आता परत चार-पाच दिवसांनी थोडी वाट बघून इन्कम टॅक्सच्या ऑफिशियल वेबसाईट वरती लॉगिन करायचा आहे.
- आता यानंतर क्विक लिंक यामधून आधार लिंक या पर्यायावर क्लिक करा.
- येथे तुम्हाला तुमचा पॅन कार्ड नंबर आणि आधार कार्ड नंबर टाकायचा आहे.
- त्यानंतर Validate या बटन वरती क्लिक करा.
- जर तुमच्या प्रोफाईल मध्ये हजार रुपयाचे पेमेंट अपडेट झाले असेल तर तुम्हाला Your payment details are verified असा मेसेज येईल.
- आता LINK करण्यासाठी कंटिन्यू या बटन वरती क्लिक करा.
- यानंतर तुमचे आधार कार्ड मधील नाव आणि मोबाईल नंबर टाका त्यानंतर आधार लिंक या बटनवर क्लिक करा.
- आता तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबर वरती एक ओटीपी पाठवण्यात येईल.
- तो ओटीपी टाकून यानंतर तुमची आधार पॅन लिंक विनंती यशस्वीरित्या सबमिट होईल.
SMS द्वारे लिंकिंग
NOTE: मित्रांनो ही पद्धत तेव्हाच काम करते जेव्हा तुम्ही हजार रुपये शुल्क ऑनलाईन आधीच भरलेले असते आणि ते पोर्टल वरती यशस्वीरित्या अपडेट झालेली असते.
- आता तुमचा आधार कार्ड क्रमांक पॅन कार्ड सोबत लिंक करण्यासाठी तुमच्या मोबाईल नंबर वरून मेसेज बॉक्स उघडा.
- यानंतर खाली दिलेल्या मेसेज फॉरवर्ड अगदी व्यवस्थित रित्या टाईप करा UIDPAN<space>[12-अंकी आधार क्रमांक]<space>[10-अंकी पॅन क्रमांक] उदाहरणार्थ: UIDPAN 123456789012 ABCDE1234F
- पहा मेसेज
567678किंवा56161या अधिकृत नंबर वरती सेंड करा. - तुम्ही ही लिंकिंग प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर तुम्हाला लिंकिंग प्रक्रिया यशस्वी झाली तसा कन्फर्मेशन चा मेसेज येईल.
तुमचे आधार-पॅन लिंक Status कसे तपासावे?
मित्रांनो जर तुम्हाला प्रश्न पडला असेल की ही सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर आपले पॅन कार्ड आधार कार्ड सोबत लिंक आहे की नाही किंवा तुमची विनंती यशस्वी झाली आहे का हे तपासण्यासाठी खालील स्टेप फॉलो करा:
- यासाठी तुम्हाला पुन्हा incometax.gov.in वेबसाइटवर जायचे आहे.
- या नंतर ‘Quick Links’ विभागात ‘Link Aadhaar Status’ या पर्यायावर क्लिक करा.
- आता तुमचा पॅन कार्ड क्रमांक आणि आधार कार्ड क्रमांक व्यवस्थित रित्या भरा.
- आता ‘View Link Aadhaar Status’ या बटणावर क्लिक करा.
- जर तुमचे पॅन-आधार लिंक असेल, तर “Your PAN is already linked to given Aadhaar” असा हिरव्या रंगात मेसेज दिसेल. जर लिंक नसेल, तर तसे तिथे दिसून येईल.
Helpline
| Department | Contact Details |
| Official Portal | https://www.incometax.gov.in/ |
| e-Filing Helpline | 1800 103 0025 1800 419 0025 |
| For e-Pay Tax Issues | epay.helpdesk@incometax.gov.in |
| Grievance | पोर्टलवर ‘Grievances’ (तक्रारी) विभागात तुमची तक्रार नोंदवा. |
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
फी भरल्यानंतर लिंक व्हायला एकूण किती वेळ लागतो?
मित्रांनो तुम्ही जर हजार रुपये फी भरल्यानंतर ते पेमेंट इन्कम टॅक्स पोर्टलमध्ये अपडेट होण्याकरिता चार ते पाच दिवसाचा कालावधी लागतो पेमेंट अपडेट झाल्यानंतर तुम्ही लगेचच आधार कार्ड पॅन कार्ड लिंकिंग साठी फायनल रिक्वेस्ट सबमिट करू शकता यामुळे पेमेंट केल्यावर चार ते पाच दिवस नक्की थांबा मगच आधार कार्ड लिंक पर्यायचा वापर करा
मी NRI आहे / माझे वय ८० वर्षांपेक्षा जास्त आहे. मलाही हे बंधनकारक आहे का?
नाही. आयकर कायद्यानुसार, अनिवासी भारतीयांना (NRIs), ८० वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या अति-ज्येष्ठ नागरिकांना (Super Senior Citizens), आणि आसाम, मेघालय व जम्मू-काश्मीरमधील रहिवाशांना या लिंकिंग प्रक्रियेतून सूट (Exemption) देण्यात आली आहे.
