बांधकाम कामगार मोफत भांडे योजना : असा करा घरबसल्या मोबाईलद्वारे मोफत भांडे योजनेसाठी अर्ज..,

Bandhkam Kamgar Safety Essential kit Yojana 2025 :- बांधकाम क्षेत्र हे अनेक अनौपचारिक कामगारांच्या उपजिविकेचे मुख्य साधन आहे. या क्षेत्रातील कामगारांचे संरक्षण, आरोग्य, आणि सामाजिक सुरक्षा ही शासनाची जबाबदारी आहे. महाराष्ट्र शासनाने “महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळा”च्या माध्यमातून बांधकाम कामगारांसाठी विविध कल्याणकारी योजना राबविल्या आहेत. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडील नोंदीत पात्र बांधकाम कामगारांना सुरक्षा व अत्यावश्यक संच वाटप (Bandhkam Kamgar Safety Essential kit Yojana) करण्यासाठी सुधारित योजना जाहीर केली आहे.

बांधकाम कामगारांना वेगवेगळ्या साईटवर काम करण्यासाठी स्थलांतर करावे लागते. अशावेळी त्यांना भोजना तयार करण्यासाठी शासनाकडून गृहपयोगी संच योजना अंतर्गत मोफत भांडे दिले जातात.

बांधकाम कामगारांना भांडे योजनेसाठी आता ऑनलाईन अर्ज सादर करता येणार आहे. शासनाच्या २०२१ च्या जीआर नुसार नोंदीत बांधकाम कामगारांना भांडे योजनेचा लाभ दिला जातो.

गृहपयोगी संच असे या योजनेचे नाव असून यामध्ये विविध प्रकारे भांडे बांधकाम कामगारांना देण्यात येतात.

हे देखील वाचा :- Bandhkam Kamgar Nondani : बांधकाम कामगार ऑनलाईन नोंदणी कशी करायची? घरबसल्या मोबाईलवरून असा करा अर्ज..,

बांधकाम कामगार भांडे योजना संक्षिप्त माहिती

बांधकाम कामगार भांडे योजनेचा लाभ घेण्यासाठी घेण्यासाठी पात्रता आणि थोडक्या माहिती खालीलप्रमाणे आहे.

  • बांधकाम कामगार म्हणून नोंदणी करणे आवश्यक.
  • गृहपयोगी संच योजनेचा लाभ घेण्यासाठी अगोदर नोंदणी ऑनलाईन पद्धतीने करता येते.
  • नोंदणी करण्यासाठी केवळ १ रुपया खर्च येतो.
  • कामगारांनी नोंदणी केल्यानंतर विविध योजनेसाठी अर्ज करता येतो. गृहपयोगी संचासाठी वेगळा अर्ज सादर करावा लगतो. ऑनलाईन अर्ज सादर करणे आवश्यक.
  • बांधकाम कामगारास ३० भांड्यांचा संच मिळतो.

अजूनही बरेच कामगार योजनेपासून वंचित

राज्यातील बऱ्याच बांधकाम कामगारांनी त्यांची ऑनलाईन नोंदणी न केल्याने अशा बांधकाम कामगारांना या योजनेपासून वंचित राहावे लागत आहे.

बांधकाम कामगार गृहपयोगी संच मिळविण्यासाठी अनेक बोगस कामगारांनी नोंदणी करून योजनेचा लाभ घेतला असल्याच्या तक्रारी बांधकाम कामगार मंडळास प्राप्त झालेल्या आहेत्त. त्यामुळे अशा बोगस बांधकाम कामगारांची नोदंनी तपासण्यासाठी बांधकाम कामगार मंडळाकडून दक्षता पथके तैनात करण्यात आलेले आहे.

प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक दक्षता पथक तपासणी करणार असल्याने बोगस बांधकाम कामगारांना या या योजनेतून वगळले जाणार असल्याने आता खरोखरच्या बांधकाम कामगारांना अधिक लाभ मिळणार आहे.

ज्या महिला बांधकाम कामगार आहेत त्या या भांडे योजनेचा लाभ घेण्यास इच्छुक असून आता त्यांच्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे अधिक सोपे होणार आहे.

बांधकाम कामगार ऑनलाईन भांडे अर्ज प्रोसेस

बांधकाम कामगार योजनेतील भांडे योजना हि सर्वात लोकप्रिय योजना असल्याने अनेक बांधकाम कामगार या योजनेसाठी लाभ घेवू इच्छित असतात. योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने केल्या जाणाऱ्या अर्जामध्ये खालील माहिती सादर करावी लागते.

नोंदणी क्रमांक.

दिनांक.

नूतनीकरण दिनांक.

मोबाईल नंबर.

आधार नंबर.

अर्जदाराचे नाव वडिलांचे नाव आडनाव.

camp निवडा.

इत्यादी माहिती बांधकाम कामगार योजनेतील ऑनलाईन अर्जामध्ये सादर करावी लागते. भांडे योजना ऑनलाईन अर्ज संबधित माहितीसाठी खालील व्हिडीओ पहा.

बांधकाम कामगार भांडे योजना :- जी आर लिंक

बांधकाम कामगार भांडे योजना संक्षिप्त

योजनेचे नाव.गृहपयोगी संच योजना.
लाभार्थी पात्रता.बांधकाम कामगार.
अर्ज पक्रिया.ऑनलाईन
किती मिळणार भांडे३० नग
गृहपयोगी संच जी आरजी आर लिंक
ऑनलाईन अर्ज लिंकलिंक

बांधकाम कामगार भांडे योजनेचा अर्ज कसा करावा?

नोंदणीकृत बांधकाम कामगारांना भांडे योजनेचा लाभ घेण्यासाठी आता ऑनलाईन अर्ज सादर करता येईल.

बांधकाम कामगार भांडे योजना ऑनलाईन अर्ज कोणत्या वेबसाईटवर करता येईल?

गृहपयोगी संच अर्थात भांडे योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा आणि कोणत्या वेबसाईटवर करावा लगतो या संदर्भातील सविस्तर माहिती या लेखामध्ये देण्यात आली आहे.

हे वाचले का तुम्ही :-  बांधकाम कामगारांना मोफत घरगुती वस्तूंचा संच योजनेसाठी अर्ज सुरू; इथे लगेच ऑनलाईन अर्ज करा..!

या लेखात, आम्ही बांधकाम कामगारांना सुरक्षा व अत्यावश्यक संच वाटप सुधारित योजना (Bandhkam Kamgar Safety Essential kit Yojana) विषयीची संपूर्ण माहिती दिली आहे. मला आशा आहे की तुम्हाला हा लेख आवडला असेल. तुम्हाला हा लेख आवडला तर नक्की शेअर करा. तुम्हाला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया टिप्पणी द्या.

Leave a Comment