Savitribai Phule Aadhaar Yojana: मिळवा ₹60,000! पात्रता, कागदपत्रे, Online Application Process

Detailed application process for Dnyanjyoti Savitribai Phule Aadhaar Yojana

  • या योजनेचा अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम महाडीबीटी पोर्टल वर रजिस्ट्रेशन करा
  •  रजिस्ट्रेशन करण्यासाठी महाडीबीटी पोर्टलच्या https://mahadbt.maharashtra.gov.in  या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
  •  वेबसाईट वरती तुम्हाला New Applicant Registration  हा पर्याय दिसेल  त्यावर क्लिक करा.
  •  आता आधार कार्ड क्रमांक व मोबाईल नंबर टाकून तुमचे नवीन प्रोफाइल तयार करा.
  •  आता तुमच्या मोबाईल नंबर वरती एक ओटीपी येईल तो येथे व्यवस्थितरित्या भरा आणि नोंदणी पूर्ण करा.
  •  नोंदणी यशस्वीरित्या पूर्ण झाल्यानंतर तुमच्या युजरनेम आणि पासवर्ड ने  पोर्टल वरती लोगिन करा.
  •  आता कम्प्लीट प्रोफाइल या पर्यायावर ती क्लिक करा आणि तुमची वैयक्तिक माहिती भरा यामध्ये तुम्हाला तुमचे नाव पत्ता जात कौटुंबिक उत्पन्न तसेच बँक खात्याची माहिती भरावी लागेल.
  •  महत्त्वाचे म्हणजे बँक खात्याची माहिती भरताना खाते क्रमांक आधार कार्डशी  लिंक असावा.  कारण योजनेची आर्थिक मदत थेट बँक खात्यामध्ये जमा  होत असते.
  •  आता प्रोफाइल पूर्ण झाल्यानंतर ‘Schemes’   मेन्यू मध्ये जा त्यानंतर Social Justice and Special Assistance Department हा पर्याय निवडा. 
  • या पर्यायांमध्ये तुम्हाला ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना दिसेल ती निवडा.
  •  आणि आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे योजनेचा अर्ज तुमच्यासमोर उघडेल अर्जामध्ये विचारलेली माहिती  योग्यरीत्या भरा.
  •  अर्ज मध्ये तुम्हाला तुमच्या महाविद्यालयाचे नाव अभ्यासक्रम तसेच इतर शैक्षणिक माहिती भरायची आहे तसेच अर्ज भरत असताना अर्जामध्ये विचारली जाणारी आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.  महत्त्वाचे म्हणजे ही कागदपत्रे तुम्हाला स्कॅन करून ठेवावी लागतील.
  • सर्व माहिती आणि कागदपत्रे व्यवस्थित अपलोड झाल्यावर एकदा भरलेला अर्ज व्यवस्थित रित्या तपासा त्यानंतर सबमिट पर्यायावर ती क्लिक करून अर्ज सादर करा.
  • अर्ज सादर केल्यानंतर तुम्हाला एक अर्जाचा क्रमांक मिळेल तो तुमच्याकडे नोंदवून ठेवा या क्रमांकाचा वापर करून तुम्ही अर्जाची स्थिती तपासू शकता.

Required documents

  • आधार कार्ड
  • जातीचा दाखला
  • उत्पन्नाचा दाखला
  • बँक पासबुक
  • बोनाफाईड प्रमाणपत्र (तुमच्या कॉलेजकडून मिळते)
  • मागील वर्षाच्या परीक्षेची गुणपत्रक
  • रहिवासी पुरावा (Domicile Certificate)
  • शाळा सोडल्याचा दाखला (TC)

Dnyanjyoti Savitribai Phule Aadhaar Yojana Last Date 2025

विद्यार्थी मित्रांनो आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की सर्वात अचूक आणि अधिकृत माहिती जर तुम्हाला मिळवायची असेल तर तुम्ही महाडीबी पोर्टलवर किंवा महाराष्ट्र सरकारच्या सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाच्या अधिकृत वेबसाईट वरती जाऊन तपासा. कारण अशा योजनांची अर्जाची मुदत अनेकदा वाढवली जाते म्हणूनच तुम्ही अधिकृत वेबसाईट वरती भेट देऊन वारंवार माहिती तपासायला हवी

contacts and helplines

संपर्काचा प्रकारमाहिती
अधिकृत वेबसाइटमहाडीबीटी पोर्टल
हेल्पलाइन नंबर022-49150800
ईमेल आयडीinfo.mahait@mahait.org
मुख्यमंत्री हेल्पलाइन1800 120 8040 (टोल फ्री)

Frequently Asked Questions (FAQ)

या योजनेसाठी अर्ज कुठे करायचा?

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेचा अर्ज फक्त महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने स्वीकारल्या जातो.

अर्जाची स्थिती (Status) कशी तपासायची?

अर्जाची स्थिती तपासण्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर तुमचा लॉगिन आयडी आणि पासवर्ड टाकून लॉगिन करा आणि एप्लीकेशन स्टेटस पर्यायावर क्लिक करून अर्जाची स्थिती तपासा.

conclusion

विद्यार्थी मित्रांनो ही योजना केवळ आर्थिक मदतीसाठी नाही तर विद्यार्थ्यांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी देखील आहे विद्यार्थ्यांना कोणत्याही अडचणी शिवाय त्यांचे शिक्षण पूर्ण करता यावे यासाठी ही योजना प्रोत्साहित करते तसेच योग्य पात्रता निकष आणि ऑनलाइन प्रक्रियेमुळे गरजू गरीब विद्यार्थी या योजनेचा अगदी सोप्या पद्धतीने लाभ घेऊ शकतो यामुळे महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थी आपल्या शैक्षणिक आणि व्यावसायिक जीवनाची सुरुवात अगदी सहज पद्धतीने करू शकतील म्हणून ही महत्त्वाची माहिती तुमच्या गरजू गरीब आणि गुणवंत मित्रांना नक्की शेअर करा