मुलींसाठी सिद्धीविनायक न्यासाचा पुढाकार; राबवणार ‘श्रीसिद्धिविनायक भाग्यलक्ष्मी योजना’, काय आहे ही योजना? 

केंद्र आणि राज्य सरकार सातत्यानं मुलींच्या भविष्याच्या दृष्टीनं उपयुक्त अशा योजना आणत असतं. केंद्रानंही मुलींसाठी सुकन्या समृद्धीसारखी लोकप्रिय योजना सुरू केली आहे. परंतु आता श्री सिद्धीविनायक गणपती मंदिर न्यासानं (Shri Siddhivinayak Ganpati Temple) एक नवी योजना सुरू करण्याचा प्रस्ताव ठेवलाय. याचं नाव ‘श्रीसिद्धिविनायक भाग्यलक्ष्मी योजना’ असं आहे.

ही योजना ८ मार्च, आंतरराष्ट्रीय महिला दिनी जन्मलेल्या मुलींसाठी लागू असेल. या योजनेंतर्गत न्यास मुलींच्या नावानं १० हजार रुपयांची एफडी करेल.

सदर अर्थसंकल्पात महाराष्ट्रातील शासकीय रूग्णालयात जागतिक महिला दिनी 8 मार्च रोजी जन्म झालेल्या नवजात बालिकांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी “श्रीसिध्दिविनायक भाग्यलक्ष्मी योजना” राबविण्याचा प्रस्ताव शासन मान्यतेस्तव सादर करण्याबाबत घोषणा न्यासाचे अध्यक्ष सदानंद सरवणकर यांच्या उपस्थितीत करण्यात आली.