Shri Siddhivinayak Bhagyalakshmi Yojana 2025 :- सर्वांना नमस्कार, राज्य सरकारच्यावतीने लागू करण्यात आलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना (Ladki bahin yojana) प्रचंड कौतुकाची ठरली असून राज्यात महायुतीचे सरकार स्थापन होण्यास ही योजना गेमचेंजर ठरली आहे. सरकारने यापूर्वीही अनेक योजना राबवल्या आहेत, पण या योजनेची लोकप्रियता घराघरात पोहोचली आहे.
सरकारच्यावतीने स्त्री जन्माचे स्वागत करण्यासाठी माझी कन्या भाग्यश्री योजना राबविण्यात येत असून पहिल्या मुलीवरच समाधान मानणाऱ्या पालकांना 50 हजार रुपयांचे अनुदान शासनातर्फे देण्यात येत आहे. तर, लेक लाडकी योजनाही सुरू करण्यात आली आहे. त्यामध्ये, मुलीला वयाच्या 18 वर्षापर्यंत 75,000 रुपयांचे मदत शासनातर्फे दिली जाते. त्यातच, आता श्री सिद्धिविनायक मंदिर (Siddhivinayak temple) ट्रस्टतर्फे श्री सिद्धिविनायक भाग्यलक्ष्मी योजना राबविण्यात येत आहे. न्यास व्यवस्थापन समितीने यास मान्यता दिली आहे.
या योजनेचा लाभ तुम्हाला मिळेल का हे पाहण्यासाठी :- येथे क्लिक करा
मुलींच्या जन्मास प्रोत्साहन देणे, त्यांच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत करणे, मुलींच्या सक्षमीकरणासाठी प्रयत्न करणे या उद्देशाने केंद्र व राज्य शासनाच्या स्तरावरून लेक वाचवा, लेकीला शिकवा या स्वरूपाचा धोरणाला श्रीसिध्दिविनायक गणपती मंदिर न्यासाचाही हातभार लागावा या हेतुने महाराष्ट्रातील शासकीय रूग्णालयात जन्मास आलेल्या बालिकांच्या नावाने 10,000 रुपयांचे फिक्स डिपॉझिट (Fixed Deposit) स्वरूपात त्यांच्या मातेच्या खात्यावर ठेवण्याबाबतची योजना प्रस्तावित करण्यात आली आहे. न्यास व्यवस्थापन समितीकडून अशा स्वरूपाची अभिनव योजना राबविण्यास मंजुरी देण्यात आली असून याबाबतचा प्रस्ताव शासनाच्या मान्यतेस्तव सादर करण्यात आलेला आहे. शासनाच्या मान्यतेनंतर या योजनेसाठीचे निकष लवकरच जाहीर करण्यात येतील, अशी माहिती सिद्धीविनायक ट्रस्टकडून देण्यात आली आहे.
तुम्हाला लाभ मिळेल का हे पाहण्यासाठी :- येथे क्लिक करा
दरम्यान, श्री सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टकडून सामाजिक उपक्रम राबविण्यात येत असून न्यासास प्राप्त होणाऱ्या उत्पन्नातून गरीब व गरजू रूग्णांना वैद्यकीय आर्थिक सहाय्य करणे, गरीब विद्यार्थ्यांना मोफत स्वरूपाची पुस्तके उपलब्ध करण्याबाबत पुस्तक पेढी योजना राबविणे, डायलेसिस सेंटरद्वारे रूग्णांना मदत करणे इत्यादि स्वरूपाचे समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येतात.
या योजनेचा लाभ तुम्हाला मिळेल का हे पाहण्यासाठी :- येथे क्लिक करा
या योजनेचा लाभ तुम्हाला मिळेल का हे पाहण्यासाठी :- येथे क्लिक करा
श्री सिद्धिविनायक भाग्यलक्ष्मी योजना ट्रस्टचे वार्षिक उत्पन्न 133 कोटी
श्रीसिध्दिविनायक गणपती मंदिर न्यासाच्या विश्वस्त समितीची बैठक 31 मार्च 2025 रोजी संस्थानचे अध्यक्ष सदानंद सरवणकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. श्रीसिध्दिविनायक गणपती मंदिर न्यासाचा सन 2024-25 चे वार्षिक विवरणपत्र तसेच सन 2025-26 चे अर्थसंकल्पिय अंदाजपत्रक 31 मार्च 2025 रोजी विश्वस्त समितीच्या बैठकीत सादर करण्यात आला होता. न्यासाचे सर्व विश्वस्त, प्रशासन यांची नियोजनबध्द कार्यपध्दती आणि भाविकांच्या भक्तीमय सहभागामुळे सन 2024-25 या वर्षात न्यासाचे उत्पन्न जे रू 114 कोटी इतके अपेक्षित होते ते विक्रमी रू 133 कोटींच्या घरात गेले आहे. मागील वर्षाच्या तुलनेत न्यासाच्या उत्पन्नात जवळपास 15% नी वाढ झालेली आहे. सन 2024-25 साठी न्यासाचे अपेक्षित उत्पन्न रू 114 कोटी इतके धरण्यात आले होते. आशिर्वचन पूजा देणगी, लाडू व नारळवडी यासंदर्भात विश्वस्त व प्रशासन यांच्या नियोजनामुळे उत्पन्न रू 114 कोटीवरून रू 133 कोटीच्या घरात गेले आहे, ही प्रशंसनीय बाब आहे. सन २०२५-२६ या पुढील वर्षासाठी न्यासाचे अपेक्षित उत्पन्न रू 154 कोटी इतके गृहीत धरण्यात येत आहे. सदर अर्थसंकल्पात महाराष्ट्रातील शासकीय रूग्णालयात जागतिक महिला दिनी 8 मार्च रोजी जन्म झालेल्या नवजात बालिकांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी “श्रीसिध्दिविनायक भाग्यलक्ष्मी योजना” राबविण्याचा प्रस्ताव शासन मान्यतेस्तव सादर करण्याबाबत घोषणा न्यासाचे अध्यक्ष सदानंद सरवणकर यांच्या उपस्थितीत करण्यात आली.