PMFME Subsidy Yojana : प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना अर्ज सुरू; शासन देतय 10 लाख कर्ज आणि 35% अनुदान..,

PMFME Subsidy Yojana 2025 : सर्वांना नमस्कार, आत्मनिर्भर भारत मोहिमेंतर्गत केंद्र शासन सहाय्यित प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना (PMFME) ही कृषि विभागाची महत्वाकांक्षी योजना आहे. सन २०२०-२१ ते २०२४-२५ या पाच वर्षांसाठी संपूर्ण राज्यभर लागू करण्यात आली आहे. यामध्ये एक जिल्हा एक उत्पादन (ODOP) अंतर्गत 37 जिल्ह्याचा पौष्टिक तृणधान्य उत्पादनांसाठी समावेश आहे. या योजनेची सविस्तर माहिती सांगणारा लेख…,

PMFME Subsidy Yojana
प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना

pmfme-micro-food-processing-enterprises-scheme-2025 :– भारत सरकारने ग्रामीण भागातील असंघटित अन्नप्रक्रिया उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी PMFME Yojana (प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजना) सुरू केली आहे. 2020-21 पासून राबवली जाणारी ही योजना शेतकरी, स्वयं-सहायता गट, FPOs आणि सूक्ष्म उद्योजकांसाठी मोठी संधी ठरते. या योजनेतून उद्योजकांना अनुदान, प्रशिक्षण आणि बाजारपेठेतील ब्रँडिंगसाठी मदत मिळते.  एकूण प्रकल्प किमतीच्या ३५ टक्के जास्तीत जास्त दहा लाखांपर्यंत अनुदान लाभ देय आहे.

सूक्ष्म अन्न प्रक्रिया गट उद्योगांना सामाईक पायाभूत सुविधांकरिता गट लाभार्थी, शेतकरी उत्पादक संस्था, शेतकरी उत्पादक कंपनी, सहकारी संस्था, स्वयंसाह्यता गट आणि त्यांचे फेडरेशन शासकीय संस्थांना प्रकल्प किमतीच्या ३५ टक्के, जास्तीत जास्त तीन कोटींपर्यंत अनुदान लाभ मिळणार आहे. मार्केटिंग आणि ब्रॅंडिंगकरिता पात्र प्रकल्प खर्चाच्या ५० टक्के, कमाल आर्थिक मर्यादा केंद्र शासनाकडून विहीत करण्यात येईल. तसेच सूक्ष्म अन्न प्रक्रिया गट उद्योगांना प्रकल्प किमतीच्या ३५ टक्के, जास्तीत जास्त तीन कोटी आहे.

PMFME Subsidy Yojana : प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना!

शेतकरी कष्टाने पिकवलेला माल विशेषतः नाशवंत शेतमाल बाजारात आल्यावर त्याला योग्य ते मूल्य मिळेलच असे नाही. त्यामुळे त्याच्या कष्टाचे चिज होत नाही. त्यामुळे अशा नाशवंत शेतमालावर प्रक्रिया करून त्यातून त्या शेतकऱ्याला उत्पन्नाचे साधन मिळावे, यासाठी केंद्र शासनाची प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग (PMFME Yojana) योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ जिल्ह्यातील जास्तीत जास्त तरुण, शेतकऱ्यांनी घ्यावा, यासाठी कृषी विभाग प्रयत्नशील आहे.

 PMFME योजनेचे उद्दिष्टे
ग्रामीण अन्नप्रक्रिया उद्योगांना औपचारिक रूप देणे
उत्पादनाची गुणवत्ता वाढवणे व मूल्यवर्धन करणे
अन्न सुरक्षा मानकांचे पालन सुनिश्चित करणे
ग्रामीण भागात रोजगार संधी निर्माण करणे
शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे

 आर्थिक सहाय्य (Subsidy & Benefits)
वैयक्तिक उद्योजक: प्रकल्प खर्चाच्या 35% पर्यंत अनुदान, जास्तीत जास्त ₹10 लाख
SHGs, FPOs, सहकारी संस्था: सामूहिक प्रकल्पांसाठी ₹3 कोटींपर्यंत अनुदान (प्रकल्प खर्च ₹10 कोटींपेक्षा कमी असावा)
ब्रँडिंग व मार्केटिंग: एकूण खर्चाच्या 50% पर्यंत अनुदान
पॅकेजिंग व गुणवत्ता प्रमाणपत्रासाठी मदत
प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी ₹5 लाखांपर्यंत मदत

 पात्रता (Eligibility)
सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योजक
स्वयं-सहायता गट (SHGs)
शेतकरी उत्पादक गट (FPOs)
सहकारी संस्था

 समाविष्ट उद्योग (Covered Industries)
फळे व भाजीपाला प्रक्रिया
धान्य व कडधान्य प्रक्रिया
दुग्ध प्रक्रिया
मांस व कुक्कुटपालन प्रक्रिया
मत्स्य प्रक्रिया
तेलबिया प्रक्रिया
मसाले व पेय उद्योग

अन्नप्रक्रिया उद्योग –
१) दूध प्रक्रिया : खवा, बर्फी, पेढे, श्रीखंड, आम्रखंड, पनीर, ताक, दही, तूप, लस्सी.
२) मसाले प्रक्रिया : चटणी मसाला, कांदा-लसूण मसाला, मालवणी मसाला, मटण-चिकन मसाला, गोडा मसाला, शेंगदाणा चटणी, खोबरे चटणी, कारले चटणी, जवसाची चटणी.
३) पालेभाज्या व फळे प्रक्रिया : आंबा, सीताफळ, पेरू, सफरचंद, आवळा, मोसंबी, लिंबू, चिंच, बोर, जांभूळ इत्यादींपासूनचा प्रक्रिया उद्योग. जाम, जेली, आइस्क्रीम, रबडी, काजू, बदाम, पिस्ता, बेदाणा, ड्रायफ्रूट इत्यादी. रेडी टू इट प्रक्रिया अंतर्गत येणारे सर्व खाद्यपदार्थ पॅकिंग, ब्रॅंडिंगसह सर्व प्रकारची फळे तसेच सर्व प्रकारच्या पालेभाज्या प्रक्रिया उद्योग.
४) तेलघाणा प्रक्रिया : शेंगदाणा, सोयाबीन, सूर्यफूल, तीळ, बदाम आणि सर्व प्रकारची तेल उत्पादने.
५) पावडर उत्पादन प्रक्रिया : काश्मिरी मिरची, लवंगी मिरची, स्पेशल मिक्स, ज्वारी, गहू, मिरची, धने, जिरे, गूळ, हळद.
६) पशुखाद्य निर्मिती : मक्का चुनी, गहू आटा, सरकी पेंड, गोळी पेंड, भरड धान्य इत्यादी.
७) कडधान्य प्रक्रिया : हरभरा व इतर डाळी (पॉलिश करणे), बेसन तयार करणे इत्यादी.
८) राइस मिल : चिरमुरे, तांदूळ, पोहा प्रक्रिया इत्यादी.
९) बेकरी उत्पादन प्रक्रिया : बिस्कीट, खपली गहू बिस्कीट, मैदा बिस्कीट, नानकटाई, क्रीमरोल, म्हैसूर पाक, केक, बर्फी, खारी, टोस्ट, ब्रेड, बनपाव, शेव, फरसाण, चिवडा, भडंग, केळी चिप्स, बटाटा चिप्स, फुटाणे, चिरमुरे.

 आवश्यक कागदपत्रे
आधार कार्ड
पॅन कार्ड
आठवी पास शैक्षणिक अहर्ता
जागेचा करार
इलेक्ट्रिक बिल
ना हरकत प्रमाणपत्र
कोटेशन
सहा महिन्याच्या बँक स्टेटमेंट
उद्योग आधार
प्रकल्प अहवाल
FSSAI प्रमाणपत्र
बँक पासबुक

 PMFME योजनेचे फायदे
ग्रामीण उद्योगांना प्रोत्साहन
महिलांसाठी रोजगार संधी
ब्रँडिंग व मार्केटिंगमध्ये मदत
प्रशिक्षण व कौशल्य विकास
शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढ

 प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना अर्ज प्रक्रिया (Online Apply)

  1. अधिकृत संकेतस्थळावर नोंदणी करा  pmfme.mofpi.gov.in
  2. जिल्हा संसाधन व्यक्तीमार्फत अर्जाची पडताळणी
  3. जिल्हा समिती मंजुरी
  4. बँकेकडून कर्ज मंजुरी
  5. पात्र प्रकल्पांना अनुदान वितरण

 SHG व शहरी गटांसाठी अर्ज

  • ग्रामीण SHG: MSRLM पोर्टलवर नोंदणी – NRLM 
  • शहरी SHG: DAY-NULM पोर्टलवर नोंदणी – NULM

वैयक्तिक लाभार्थी ऑनलाईन प्रक्रिया –

www.pmfme.mofpi.gov.in MIS Portal वर नोंदणी व अर्ज सादर, जिल्हा संसाधन व्यक्तिंमार्फत कार्यवाही, जिल्हास्तरीय समितीची कार्यवाही, बँक कर्ज मंजुरी प्रक्रिया, बँकेद्वारे कर्ज वितरण, पात्र प्रकल्पांना अनुदान वितरण

गट लाभार्थी ऑनलाईन प्रक्रिया –

www.pmfme.mofpl.gov.in MIS Portal वर नोंदणी करून अर्ज सादर केल्यानंतर त्यावर जिल्हा संसाधन व्यक्तिंमार्फत कार्यवाही केली जाते. तद्‌नंतर जिल्हास्तरीय समितीमार्फत पात्र प्रकल्पांची शिफारस केली जाते. प्रस्ताव राज्य नोडल एजन्सी मार्फत बँकेकडे सादर केला जातो. त्यानंतर बँकेकडून कर्ज मंजुरीची प्रक्रिया केली जाते. बँकेद्वारे कर्ज वितरण, पात्र प्रकल्पांना अनुदान वितरण केले जाते.

 वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ – PMFME Yojana)

प्रश्न 1: PMFME योजनेत किती अनुदान मिळते?
उत्तर: प्रकल्प खर्चाच्या 35% पर्यंत अनुदान मिळते, वैयक्तिकांसाठी कमाल ₹10 लाख.

प्रश्न 2: PMFME योजनेसाठी अर्ज कुठे करावा?
उत्तर: अर्ज pmfme.mofpi.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर करावा.

प्रश्न 3: कोण पात्र आहेत?
उत्तर: सूक्ष्म उद्योजक, SHGs, FPOs आणि सहकारी संस्था पात्र आहेत.

प्रश्न 4: कोणते उद्योग योजनेत समाविष्ट आहेत?
उत्तर: फळे, भाजीपाला, धान्य, दुग्ध, मांस, मासे, तेलबिया व मसाले प्रक्रिया.

प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग (PMFME Yojana) योजना ग्रामीण भागातील सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योगांना बळ देण्यासाठी सुवर्णसंधी आहे. अनुदान, प्रशिक्षण, ब्रँडिंग व बाजारपेठ यांचा संगम साधणारी ही योजना रोजगार निर्मिती आणि आत्मनिर्भर भारताच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल आहे. शेतकरी व उद्योजकांनी या योजनेचा लाभ घ्यावा.

प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना – या लेखात, आम्ही प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग (PMFME Yojana) योजना विषयीची संपूर्ण माहिती दिली आहे. मला आशा आहे की तुम्हाला हा लेख आवडला असेल. तुम्हाला हा लेख आवडला तर नक्की शेअर करा. तुम्हाला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया टिप्पणी द्या.

Leave a Comment