Ladki Bahin Yojana Scrutiny : लाडकी बहीण योजनेमध्ये सर्वाधिक बोगस लाभार्थी हे पुणे जिल्ह्यातील असून ती संख्या दोन लाख चार हजार इतकी आहे. या सर्व अपात्र लाभार्थ्यांवर कारवाई होणार आहे.
राज्यातील लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या 26 लाख महिला या अपात्र ठरल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या अपात्र लाभार्थ्यांची आता जिल्हास्तरीय सुक्ष्म छाननी सुरू असल्याची माहिती राज्याच्या महिला आणि बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी दिली. या छाननीतून अपात्र ठरलेल्या महिलांवर योग्य ती कारवाई होईल असंही त्या म्हणाल्या.
Ladki Bahin Yojana Scrutiny : काय म्हटलंय अदिती तटकरेंनी?
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत लाभ घेत असलेल्या लाभार्थींपैकी सुमारे 26 लक्ष लाभार्थी योजनेच्या निकषानुसार पात्र दिसून येत नसल्याबाबत माहिती व तंत्रज्ञान विभागाने प्राथमिक माहिती उपलब्ध करुन दिली होती. सदर सुमारे 26 लक्ष लाभार्थी राज्यातील सर्व जिल्ह्यांमधील आहेत.
त्यानुसार महिला व बालविकास विभागाने सदर लाभार्थ्यांची प्राथमिक माहिती संबंधित जिल्हा यंत्रणेला छाननीसाठी (Physical Verification) उपलब्ध करुन दिलेली आहे. त्यानुसार हे लाभार्थी योजनेच्या निकषानुसार पात्र ठरतात किंवा नाही याबाबतची सुक्ष्म छाननी क्षेत्रीय स्तरावर सुरु आहे. छाननीअंती या लाभार्थींची पात्रता/अपात्रता स्पष्ट होणार आहे.
छाननीअंती जे लाभार्थी अपात्र ठरतील त्यांच्याबाबत माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री श्री. अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनानुसार योग्य कारवाई करण्यात येईल, तसेच पात्र ठरणाऱ्या लाभार्थ्यांचा लाभ यापुढेही पूवर्वत सुरु राहील.
महिलांनो, आत्ता तुमच काय होणार – अदिती तटकरें काय म्हणाल्या हे पाहण्यासाठी :- येथे क्लिक करा
महिलांनो, आत्ता तुमच काय होणार – अदिती तटकरें काय म्हणाल्या हे पाहण्यासाठी :- येथे क्लिक करा
Ladki Bahin Yojana Corruption : योजनेत मोठा गैरव्यवहार
राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ या योजनेत मोठा गैरव्यवहार उघडकीस आला आहे. सरकारने राबविलेल्या शोधमोहिमेमध्ये तब्बल 26 लाख 34 हजार बोगस लाभार्थी आढळले आहेत. हे सर्व लाभार्थी प्रत्यक्षात पात्र नसतानाही दरमहा 1500 रुपयांचा निधी घेत होते. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर सरकारची फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यावर तोडगा म्हणून राज्यभरातील सर्व पात्र लाभार्थ्यांची पुन्हा एकदा ई-केवायसीद्वारे पडताळणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
महिलांनो, आत्ता तुमच काय होणार – अदिती तटकरें काय म्हणाल्या हे पाहण्यासाठी :- येथे क्लिक करा
या योजनेत एकूण 2 कोटी 63 लाख महिलांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 2 कोटी 41 लाख महिला पात्र ठरल्या. विधानसभा निवडणुकीनंतर शिल्लक राहिलेल्या 11 लाख अर्जांची तपासणी केल्यानंतर 7 लाख 76 हजार अर्ज अपात्र ठरले. जून महिन्यात सरकारने या योजनेचा सखोल आढावा घेण्याचे ठरवले. महिला व बालकल्याण विभागाने सर्व विभागांकडून माहिती मागविल्यानंतर फसवणुकीचा मोठा प्रकार समोर आला.
महिलांनो, आत्ता तुमच काय होणार – पात्र की अपात्र हे पाहण्यासाठी :- येथे क्लिक करा
Ladki Bahin Yojana Bogus Beneficiary : पुणे जिल्ह्यात सर्वाधिक बोगस लाभार्थी
राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर ही फसवणूक झाल्याचे दिसून आले आहे. पुणे जिल्ह्यात सर्वाधिक 2,04,000 बोगस लाभार्थी आढळले. ठाण्यात 1,25,300, अहिल्यानगरमध्ये 1,25,756, नाशिकमध्ये 1,86,800, छत्रपती संभाजीनगरमध्ये 1,04,700, कोल्हापूरमध्ये 1,01,400, मुंबई उपनगरात 1,13,000, नागपुरात 95,500, बीडमध्ये 71,000, लातूरमध्ये 69,000, सोलापूरमध्ये 1,04,000, साताऱ्यात 86,000, सांगलीत 90,000, पालघरमध्ये 72,000, नांदेडमध्ये 92,000, जालन्यात 73,000, धुळ्यात 75,000 तर अमरावतीत 61,000 बोगस लाभार्थी उघडकीस आले.
महिलांनो, आत्ता तुमच काय होणार – पात्र की अपात्र हे पाहण्यासाठी :- येथे क्लिक करा