Mukhyamantri Vayoshri Yojana : मुख्यमंत्री वयोश्री योजना अर्ज सुरू; 65 वर्षाच्या व्यक्तींना 3000 रुपये मिळणार, येथे आत्ताच करा अर्ज..,

Mukhyamantri Vayoshri Yojana Maharashtra 2025 :- सर्वांना नमस्कार, राज्यात समाजकल्याण विभागाने जेष्ठ नागरिकांसाठी वयोश्री योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत ६५ वर्षांवरील नागरिकांना दरमहा ३००० रुपयांची आर्थिक मदत देण्याची तरतूद करण्यात आली आहे. महाराष्ट्र सरकारने यंदाच्या बजेटमध्ये यासाठी ४८० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. तसेच, वृद्धावस्थेमुळे ज्यांना ऐकण्यात, दिसण्यात आणि चालण्यात अडचणी येतात, अशा ज्येष्ठ नागरिकांना चष्मा, श्रवणयंत्र आणि इतर आवश्यक उपकरणे देखील उपलब्ध करून दिली जातात.

५ फेब्रुवारी २०२४ रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वयोश्री योजनेची घोषणा केली. या योजनेअंतर्गत ६५ वर्षांवरील जेष्ठ नागरिकांना दरमहा ३००० रुपयांची आर्थिक मदत व आवश्यक उपकरणे दिली जातील. या योजनेसाठी पात्रता, आवश्यक कागदपत्रे, आणि अर्ज प्रक्रिया याबाबत संपूर्ण माहिती या लेखात जाणून घ्या.

राज्यातील वृद्ध नागरिकांना वयोमानानुसार येणाऱ्या शारीरिक व मानसिक समस्या हाताळण्यासाठी “मुख्यमंत्री वयोश्री योजना” (Mukhyamantri Vayoshri Yojana Maharashtra) राबविण्यात येत आहे. या योजनेचा उद्देश 65 वर्ष व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य परिस्थितीत जगण्यास मदत करणे हा आहे. वय वाढल्यानं अनेक ज्येष्ठ नागरिकांना दिसण्यात, ऐकण्यात आणि चालण्यात त्रास होऊ लागतो. परंतु, अशा समस्यांवर मात करण्यासाठी आवश्यक उपकरणं खरेदी करणे अनेकदा त्यांच्या आवाक्याबाहेर असतं.

🔥 वयोश्री योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना ३ हजार रुपये लाभासाठी अर्ज नमुना व स्वयंघोषणापत्र PDF फाईल डाउनलोड करण्यासाठी :- येथे क्लिक करा.

शासन निर्णय पाहण्यासाठी :- इथे क्लिक करा.

या योजनेतून ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या वयोमानानुसार येणाऱ्या अपंगत्व, अशक्तपणा, व इतर शारीरिक व मानसिक समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने/उपकरणे उपलब्ध करून दिली जातील. या उपकरणांमुळे त्यांना दैनंदिन कार्यक्षमता सुधारता येईल आणि त्यांचे जीवनमान उंचावता येईल.

शिवाय, योजनेत मानसिक स्वास्थ्य जपण्यासाठी मनःस्वास्थ्य केंद्रे, योगोपचार केंद्रे, व इतर उपचार सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. हे केंद्रं ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या मानसिक ताण-तणावावर मात करण्यात आणि जीवनाचा आनंद घेण्यात मदत करतील.

मुख्यमंत्री वयोश्री योजना अंतर्गत लाभार्थ्यांना दिली जाणारी उपकरणे, पात्रता निकष आणि आवश्यक कागदपत्रे याविषयीची माहिती पुढीलप्रमाणे आहे:

🔥 वयोश्री योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना ३ हजार रुपये लाभासाठी अर्ज नमुना व स्वयंघोषणापत्र PDF फाईल डाउनलोड करण्यासाठी :- येथे क्लिक करा.

शासन निर्णय पाहण्यासाठी :- इथे क्लिक करा.

देण्यात येणारी उपकरणे:

मुख्यमंत्री वयोश्री योजना अंतर्गत लाभार्थ्यांना 3,000 रुपये रोख आर्थिक मदत दिली जाते. तसेच, त्यांना काही आवश्यक उपकरणे देखील दिली जातात, ज्यामध्ये खालील उपकरणांचा समावेश आहे:

चष्मा, ट्रायपॉड, कमरेचा पट्टा, फोल्डिंग वॉकर, ग्रीवा कॉलर, स्टिक, व्हीलचेअर, कमोड खुर्ची, गुडघा ब्रेस, श्रवणयंत्र इत्यादी.

🔥 वयोश्री योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना ३ हजार रुपये लाभासाठी अर्ज नमुना व स्वयंघोषणापत्र PDF फाईल डाउनलोड करण्यासाठी :- येथे क्लिक करा.

शासन निर्णय पाहण्यासाठी :- इथे क्लिक करा.

पात्रता निकष:

मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराने खालील अटी पूर्ण करणे आवश्यक आहे:

महाराष्ट्रातील स्थायिक रहिवासी : अर्जदार हा मूळचा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.

वयोमर्यादा: अर्जदाराचे वय 65 वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक असावे.

आर्थिक स्थिती: अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2 लाख रुपयांपेक्षा कमी असावे.

शारीरिक किंवा मानसिक समस्या: उमेदवाराला शारीरिक किंवा मानसिक त्रास होत असावा.

बँक खाते: अर्जदाराचे बँक खाते आधार कार्डशी जोडलेले असणे आवश्यक आहे.

🔥 वयोश्री योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना ३ हजार रुपये लाभासाठी अर्ज नमुना व स्वयंघोषणापत्र PDF फाईल डाउनलोड करण्यासाठी :- येथे क्लिक करा.

शासन निर्णय पाहण्यासाठी :- इथे क्लिक करा.

आवश्यक कागदपत्रे

मुख्यमंत्री वयोश्री योजनेसाठी अर्ज करताना खालील कागदपत्रे आवश्यक आहेत:

आधार कार्ड, ओळखपत्र, उत्पन्न दाखला, जात प्रमाणपत्र, स्वघोषणा प्रमाणपत्र, समस्येचे (अपंगत्वाचे ) प्रमाणपत्र, बँक खाते पासबुक, मोबाईल नंबर, पासपोर्ट साईज फोटो. 

वरील कागदपत्रांसह, अर्जदाराने समाजकल्याण विभागाकडे अर्ज सादर करावा.

🔥 वयोश्री योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना ३ हजार रुपये लाभासाठी अर्ज नमुना व स्वयंघोषणापत्र PDF फाईल डाउनलोड करण्यासाठी :- येथे क्लिक करा.

शासन निर्णय पाहण्यासाठी :- इथे क्लिक करा.

अर्ज करण्यासाठी संपर्क :

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘मुख्यमंत्री-वयोश्री योजना’ सुरू करण्यात आली आहे. ज्येष्ठ नागरिकांनी या योजनेसाठी विभागातील जिल्ह्यांच्या सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सामाजिक न्‍याय व विशेष सहाय्य विभाग शासन निर्णय – CM Vayoshree Yojana GR:
  1. मुख्यमंत्री वयोश्री योजना (Mukhyamantri Vayoshri Yojana) या योजनेतील सुधारणांबाबत शासन निर्णय पाहण्यासाठी :- इथे क्लिक करा.
  2. राज्यातील ६5 वर्षे वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमानपरत्वे येणाऱ्या अपंगत्व, अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने/उपकरणे खरेदी करणेकरिता तसेच मनःस्वास्थ केंद्र, योगोपचार केंद्र इ. द्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ अबाधित ठेवण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री वयोश्री योजना (CM Vayoshree Yojana) राबविण्यास मान्यता देणे बाबत शासन निर्णय पाहण्यासाठी :- इथे क्लिक करा.

तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा. अजून कोणत्या विषयाची माहिती वाचायला तुम्हाला आवडेल कॉमेंट बॉक्समध्ये सांगा. 

Leave a Comment