वसंतराव नाईक कर्ज योजने अंतर्गत आवश्यक कागदपत्रे:
- आधार कार्ड संलग्न बँक खात्याचा तपशिल.
- उत्पन्नाचा दाखला (अर्जदाराचे एकत्रित कौटुंबिक वार्षिक उत्पन्न रू. १.०० लाखापेक्षा जास्त नसावे.)
- रहिवासी दाखला
- आधार कार्ड
- रेशन कार्ड
- पासपोर्ट साईज फोटो
- जातीचा दाखला
- शपथपत्र
Maharashtra government business loan scheme
वसंतराव नाईक वैयक्तिक/गट कर्ज व्याज परतावा योजनेअंतर्गत ऑनलाईन अर्ज (Apply Online) :
१ लाख रुपयांपर्यंत बिनव्याजी कर्ज, वसंतराव नाईक वैयक्तिक/गट कर्ज व्याज परतावा योजनेअंतर्गत ऑनलाईन अर्ज करण्यासाठी :- इथे क्लिक करा.
VJNT पोर्टल ओपन केल्यानंतर “नोंदणी” या पर्यायावर क्लिक करा.
पुढे अर्ज तपशीलासाठी आवश्यक सर्व माहिती भरा आणि त्यासोबत लागणारी आवश्यक कागदपत्रे अपलोड करून अर्ज सबमिट करून आपण ऑनलाईन अर्ज भरू शकता.
तसेच ऑफलाइन पद्धतीने या योजनेचा अर्ज करण्यासाठी आपल्या जिल्हा कार्यालयामध्ये इतर मागास बहुजन कल्याण विभागामध्ये जाऊन वसंतराव नाईक कर्ज (business loan scheme) योजनेचा अर्ज घ्यायचा आहे. अर्जामधील माहिती योग्य रित्या भरून त्यासोबत आवश्यक ती सर्व कागदपत्रे जोडावीत आणि तो अर्ज कार्यालयामध्ये जमा करावा.
वसंतराव नाईक वैयक्तिक/गट कर्ज व्याज परतावा योजनेच्या अटी व शर्ती :
- अर्जदाराचे वय १८ ते ५५ वर्षे असावे.
- अर्जदाराने आधार कार्ड संलग्न बँक खात्याचा तपशिल सादर करावा.
- एका वेळी कुटुंबातील एकाच व्यक्तीस सदर योजनेचा लाभ घेता येईल.
- अर्जदार महामंडळाच्या कोणत्याही (केंद्र व राज्य) योजनेचा थकबाकीदार नसावा.
- अर्जदाराचे एकत्रित कौटुंबिक वार्षिक उत्पन्न रू. १.०० लाखापेक्षा जास्त नसावे.
- महाराष्ट्राचा रहिवासी असावा, तसेच अर्जदार विमुक्त जाती/भटक्या जमाती/विशेष मागास प्रवर्गातील असल्यास प्राधान्य.
कर्ज वसुली कार्यपध्दती :
- कर्ज (business loan scheme) वितरित केल्यानंतर कर्जाची परतफेड ही कर्ज वितरीत केल्याच्या ९० दिवसांनंतर सुरू करण्यात येईल.
- कर्ज परताव्याचे मासिक हप्ते ठरवून द्यावेत व कर्ज वसुलीच्या दृष्टीने लाभार्थ्याकडून पुढील दिनांकांचे आगाऊ धनादेश घेऊन तसेच ECS (इलेक्टॉनिक क्लिअरन्स सिस्टम) पध्दतीने वसुली करण्यात यावी.
योजनेचे नाव: वसंतराव नाईक वैयक्तिक/गट कर्ज व्याज परतावा योजना.
संपर्क क्रमांक: 2620 2588 | 2620 2588.
अधिकृत वेबसाईट: अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी :- इथे क्लिक करा.
ज्या लाभार्थ्यांनी यापूर्वी घेतलेल्या कर्जाची (business loan scheme) परतफेड केलेली नाही अशा लाभार्थ्यांना संपूर्ण परतफेड करेपर्यंत नविन कर्जाचा (business loan scheme) लाभ घेता येणार नाही. तसेच, जे लाभार्थी परतफेडीच्या कालावधीच्या आत संपूर्ण कर्जाची परतफेड करतील असे लाभार्थी त्यांचा व्यवसाय वाढविण्यासाठी पुन्हा सदर योजनेचा लाभ घेण्यास पात्र राहतील.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग शासन निर्णय PDF फाईल: शासन निर्णय पाहण्यासाठी :- इथे क्लिक करा.