केवायसीतील ही चूक पडू शकते महागात (Ladki Bahin Yojana KYC Avoid These Mistakes)
लाडक्या बहिणींना केवायसी करतानाही विशेष काळजी घ्या.जर तुम्ही आधार कार्ड किंवा मोबाईल नंबर चुकीचा टाकला असेल तर ओटीपी दुसऱ्याच क्रमांकावर जाईल. त्यामुळे महिलांना अडचणी येऊ शकतात. याचसोबत ज्या महिलांचे पती आणि वडील हयात नाही त्या महिलांनी संबंधित कागदपत्रे ही महिला व बालविकास अधिकाऱ्यांकडे जमा करायचे आहेत. जर तुम्ही कागदपत्र जमा केले नाही तर तुमची केवायसी पूर्ण होणार नाही. परिणामी तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार नाही.
केवायसी प्रक्रिया पूर्ण केल्यानंतरही ज्या महिला पात्र आहेत त्यांनाच योजनेचा लाभ मिळणार आहे. केवायसी पडताळणीत अपात्र असूनही ज्या महिलांनी लाभ घेतला त्यांची नावे समोर येणार आहेत. त्यांचे अर्ज बाद केले जाणार आहेत.
