APY Atal Pension Yojana 5000 rs pension 2025 :- सर्वांना नमस्कार, आयुष्याच्या उत्तरार्धात उत्पन्नाचा ठोस स्त्रोत नसल्यामुळे काही लोकांची फार आबाळ होत असल्याचं तुम्ही पाहिलं असेल. तरुण असताना अनेकजण आपल्या मुलांचं भविष्य घडवण्यासाठी पैसे लावतात. पण म्हातारपण आल्यावर आर्थिक गरजा कशा भागवायच्या? याचा विचारच अनेकजण करत नाहीत. पण तुमच्यासोबतही असंच घडू नये म्हणून म्हणून योग्य वेळी योग्य काळजी घेणे गरजेचे आहेत. म्हातारपणी नियमतिपणे पैसे मिळावेत यासाठी तुम्ही आतापासूनच गुंतवणूक करणे गरजेचे आहे. याच पार्श्वभूमीवर तुमचे म्हातारपण सुरक्षित व्हावे. तुम्हाला पैशांची अडचण येऊ नये म्हणून सरकारच्या एका भन्नाट स्कीमबद्दल जाणून घेऊया…
केवळ २१० रुपयामध्ये ५ हजार रुपयाची अटल पेन्शन योजना. तुम्ही जर सर्वसमान्य नागरिक असाल किंवा शेतकरी असाल आणि तुम्ही या योजनेचा लाभ घेतला तर तुम्हाला २१० रुपयामध्ये ५ हजाराची पेन्शन मिळणार आहे. तरुणपणी माणसाच्या हातामध्ये पैसा उपलब्ध होऊ शकतो परंतु हाच पैसा उपलब्ध करण्यासाठी वृद्धपकाळामध्ये संघर्ष करावा लागू शकतो. २१० रुपयामध्ये ५ हजराची पेन्शन मिळणार असेल तर नक्कीच हि आनंदाची बाब आहे.
हि योजना ९ मे २०१५ रोजी भारतामध्ये सुरु करण्यात आलेली आहे. भारतामध्ये आता या योजनेचे सदस्य ४ कोटीपेक्षा अधिक झालेले आहे. हि योजना मुख्यत्वे गरीब जनतेसाठी सुरु करण्यात आलेली आहे.
अटल पेन्शन योजना अंतर्गत मिळेल १ ते ५००० हजार रुपयांपर्यंत पेन्शन
वयाच्या ६० वर्षा नंतर १ ते ५००० हजार रुपयांपर्यंत पेन्शन या योजना अंतर्गत मिळू शकते. अटल पेन्शन योजनेचा लाभ मिळविण्यासाठी वयाच्या १८ ते ४० या काळात गुंतवणूक करता येते.
सर्वसामान्य नागरिक तथा शेतकरी बांधवांसाठी अटल पेन्शन योजना Atal pension yojana सर्वात चांगली परतावा देणारी योजना आहे. या पेन्शन योजने संदर्भात जाऊन घेवूयात संपूर्ण माहिती जेणे करून तुम्हाला या योजनेतून चांगला परतावा मिळू शकेल.
अटल पेन्शन योजनेचा लाभ मिळविण्यासाठी वयानुसार हफ्ता भरावा लागतो. हा हफ्ता किती असतो हे जाणून घेण्यासाठी :- येथे क्लिक करा.
अशी आहे अटल पेन्शन योजना Atal pension yojana APY
ही योजना नेमकी कशी आहे या संदर्भात माहिती जाणून घेवूयात.
- अटल पेन्शन योजना अंतर्गत वयाच्या ६० वर्षानंतर प्रती महिना १, २, ३, ४ व ५ हजार रुपये मिळू शकतात.
- या योजनेमध्ये सामील होण्यासाठी भारतातील नागरिकांचे वय १८ ते ४० वर्षे इतके असणे गरजेचे आहे.
- बँकेत किंवा पोस्ट ऑफिस मध्ये अटल पेन्शन योजनेचा अर्ज ऑनलाईन किंवा ऑफलाईन सादर करणे गरजेचे आहे.
योजनेत सहभागी होऊन लाभ घ्या.
योजनेच्या अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या त्यासाठी :- येथे क्लिक करा.
अटल पेन्शन योजनेची संपूर्ण माहिती मराठी भाषेत हवी असेल तर :- येथे क्लिक करा.
1000 रुपयांचे पेन्शन हवे असेल तर किती गुंतवणूक करावी लागेल?
तुम्हाला या योजनअंतर्गत 1000 रुपयांपासून 5000 रुपयांपर्यंत पेन्शन मिळू शकतं. मुळात तुम्ही या योजनेत जेवढे जास्त रुपये गुंतवाल तुम्हाल तुमच्या 60 वर्षांनंतर तेवढेच जास्त पेन्शन मिळेल. तुम्हाला 1000 रुपयांपासून 5000 रुपयांपर्यंत पेन्शन मिळऊ शकते. तुम्हाला वयाच्या 18 व्या वर्षापासून गुंतवणूक चालू केली असेल आणि वयाच्या 60 वर्षांनंतर प्रत्येक महिन्याला तुम्हाला 1000 रुपयांचे पेन्शन हवे असेल आणि तुम्हाला प्रत्येक महिन्याला फक्त 42 रुपयांची गुंतवणूक करावी लागेल.
यासोबतच तुम्हाला वयाच्या 60 व्या वर्षी महिन्याला 5000 रुपयांचे पेन्शन हवे असेल तर 18 वर्षांचे असताना तुम्हाला महिन्याला 210 रुपयांची गुंतवणूक करावी लागेल.
https://www.npscra.nsdl.co.in/scheme-details.php
धकाधकीच्या जीवनामध्ये वृद्धापकाळाचा विसर पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. आयुष्याच्या संध्याकाळी जीवन जगण्यासाठी पैशांची आवश्यकता असते. अशावेळी जर पैसा नसेल तर जीवन जगताना अडचणी येवू शकतात.
त्यामुळे भविष्याची तजवीज म्हणून जागरूक नागरिकांनी अटल पेन्शन योजनेचा लाभ जरूर घ्यावा.