Amrut Typing Yojana 2026 : शासकीय संगणक टंकलेखन बेसिक कोर्स प्रमाणपत्र परीक्षा (Amrut Typing Yojana – GCC-TBC) व ऑनलाईन लघुलेखन परीक्षेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील खुल्या प्रवर्गातील अमृतच्या लक्षित गटातील जातीच्या आर्थिक दुर्बल घटकातील उमेदवारांना उद्योगाभिमुख स्वयंरोजगार व रोजगारक्षम बनविणे हा या योजनेचा उद्देश आहे.

संगणक टंकलेखन व लघुलेखन प्रशिक्षण योजना – Amrut Typing Yojana:
संगणक टंकलेखन व लघुलेखन प्रशिक्षण (Amrut Typing Yojana) योजनेअंतर्गत खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही स्वतंत्र शासकीय विभाग / संस्था / महामंडळा मार्फत समकक्ष योजनाचा लाभ मिळत नाही, अशा खुल्या प्रवर्गातील अमृतच्या लक्षीत गटातील जातींचा, आर्थिकदृष्टया दुर्बल घटकांतील विद्यार्थी, युवक, युवती जे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या शासकीय संगणक टंकलेखन बेसिक कोर्स प्रमाणपत्र परीक्षा (GCC-TBC) व ऑनलाईन लघुलेखन परीक्षा उत्तीर्ण झालेले आहेत अशा उमेदवारांना अर्थसहाय्य.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 एप्रिल 2026 ही आहे
संगणक टंकलेखन योजना (GCC_TBC) लाभाचे स्वरूप :
जे उमेदवार महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेची शासकीय संगणक टंकलेखन बेसिक कोर्स प्रमाणपत्र परीक्षा (GCC-TBC) (कॉम्पुटर टायपिंग मराठी / हिंदी, इंग्रजी ३०, ४०, ५० व ६० शब्द प्रति मिनिट) उत्तीर्ण होतील त्यांना एकरकमी रक्कम रु.६,५००/- (अक्षरी रुपये सहा हजार पाचशे फक्त) प्रोत्साहनात्मक अर्थसहाय्य अनुज्ञेय राहील.
प्रोत्साहनात्मक अर्थसहाय्य अमृत संस्थे मार्फत लाभार्थ्याच्या आधार संलग्न बँक खात्यात थेट जमा केले जाईल.
या व्यतिरिक्त कोणतेही शुल्क लाभासाठी अनुज्ञेय राहणार नाही.
Eligibility Criteria / पात्रता व निकष
Check if you meet the following requirements to apply for this scheme
- अर्जदाराने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या शासकीय संगणक टंकलेखन बेसिक कोर्स प्रमाणपत्र परीक्षा (GCC-TBC) व ऑनलाईन लघुलेखन परीक्षा उत्तीर्ण झालेल्या निकालाची प्रत सादर करणे बंधनकारक राहील.
- अमृत कडून आर्थिक लाभ घेण्यापूर्वी अर्जदाराने अर्जासोबत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेची संबंधित परीक्षा देणार असल्याचे स्वयंघोषणापत्र देणे आवश्यक राहील.
- शैक्षणिक पात्रता किमान १० वी पास.
- वयोगट १८ ते ४५ .
- अर्जदाराचे कुटंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न रु. आठ लाखाच्या आत असले बाबत लाभार्थ्याने सक्षम प्राधिकारी यांचे उत्पन्नाचे अद्ययावत वैध प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
- अर्जदाराने यापूर्वी व अर्ज करताना कधीही टंकलेखन परीक्षेसाठी कोणत्याही संस्थेकडून प्रोत्साहनपर अर्थसहाय्य घेतले नसल्याचे स्वयंघोषणापत्र व संस्था चालकांचे प्रमाणपत्र.
- उमेदवाराच्या आधार कार्डची स्वस्वाक्षांकित सत्य प्रत
- उमेदवाराच्या वैयक्तिक बँक खात्याचा तपशिल (बँकेचे नाव, शाखा, खाते क्रमांक, आयएफएस कोड)
Required Documents / कागदपत्रे
Prepare these documents before starting your application
- फोटो
- स्वाक्षरी
- उत्पन्न प्रमाणपत्र / ईडब्ल्यूएस (सध्याचे आर्थिक वर्ष)
- डोमिसाईल प्रमाणपत्र
- शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र / बदली प्रमाणपत्र
टायपिंग कोर्स केलेल्यांना ६,५०० रुपये अर्थसहाय्य मिळवण्यासाठी ऑनलाईन अर्ज करा – Apply Online for Amrut Typing Yojana:
Step-by-step guide to apply for this scheme
अर्ज करण्याची डायरेक्ट लिंक :- https://app.mahaamrut.org.in/amrut-new/login
अमृत टायपिंग योजना अधिकृत माहिती लिंक :- https://app.mahaamrut.org.in/amrut-new/scheme/168
अधिकृत वेबसाइट लिंक :- https://mahaamrut.org.in/
1 इंटरनेट कनेक्टिव्हिटी सुनिश्चित करा संपूर्ण अर्ज प्रक्रिया ही पूर्णपणे ऑनलाईन आहे. त्यामुळे अर्ज सुरू करण्यापूर्वी चांगले व स्थिर इंटरनेट कनेक्शन असणे आवश्यक आहे.
2 आवश्यक कागदपत्रे तयार ठेवा ऑनलाईन अर्जासाठी लागणारी सर्व कागदपत्रे आधीच PDF स्वरूपात तयार ठेवा.
3 ऑनलाईन अर्ज सुरू करा पोर्टलवर लॉगिन करून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू करा. कागदपत्रांनुसार सर्व माहिती काळजीपूर्वक व अचूक भरा.
4 कागदपत्रे अपलोड करा अर्जामध्ये दिलेल्या संबंधित पर्यायांमध्ये योग्य कागदपत्रे अपलोड करा. निवडलेल्या कागदपत्राच्या प्रकाराशी जुळणारेच दस्तऐवज अपलोड केल्याची खात्री करा.
5 अर्जाची तपासणी करा अर्ज सबमिट करण्यापूर्वी भरलेली माहिती व अपलोड केलेली कागदपत्रे पुन्हा एकदा नीट तपासून घ्या, जेणेकरून कोणतीही चूक राहणार नाही.
6 सूचना वाचून संमती द्या दिलेल्या सर्व सूचनांचा काळजीपूर्वक अभ्यास करून खालील घोषणेस संमती द्या: मी वरील सर्व सूचना काळजीपूर्वक वाचल्या असून त्या मला पूर्णपणे समजल्या आहेत.
7 अर्ज सादर करा सर्व माहिती योग्य असल्याची खात्री झाल्यानंतर अर्ज ऑनलाईन सादर करा. अर्ज सादर केल्यानंतर त्यामध्ये बदल करता येणार नाहीत.
Contact Information
Get help and support for your application
Address – अमृत कार्यालय पाचवा मजला, पीएमआरडीए इमारत, औंध, पुणे 411067
Phone – 9730151450
Email – info@mahaamrut.org.in
Scheme Timeline
Scheme Started:September 24, 2025
Application Deadline:April 30, 2026
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
