Kadba Kutti Machine Yojana : शेतकऱ्यांना मिळणार 20 हजार रुपयांची कडबा कुट्टी मशीन; सरकार देणार पैसे, येथून करा ऑनलाईन अर्ज..,

Kadba Kutti Machine Yojana : नमस्कार मित्रांनो, शासनाकडून शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबविल्या जातात, तसेच शैक्षणिक, कर्ज योजना अशा अनेक योजना शासन राज्यातील नागरिकांसाठी राबविते. ग्रामीण भागात पशुपालन व्यवसाय जास्त प्रमाणात आढळतो.

पशुपालन करणाऱ्या शेतकऱ्यांना कडबा कुटी मशीन ही अत्यावश्यक वस्तू आहे. जास्त जनावरे असल्यास शेतकऱ्याचे कष्ट कमी करण्यासाठी कडब्याचे बारीक बारीक तुकडे करून जनावरांना खाऊ घालने हे एक काम कष्टाचे काम होते. शेतकऱ्यांची परिस्थिती पाहता त्यांना कडबा कुट्टी मशीन विकत घेणे शक्य नसते.

ग्रामीण भागांमध्ये मोठ्या प्रमाणात गाई-म्हशी किंवा जनावरांचे प्रमाण असते शेतकरी जोडधंदा म्हणून जनावरे पाळतात. ज्या शेतकऱ्यांकडे गुरे आहेत, त्यांना त्यांच्या देखभालीसाठी त्यांचे चारा आणि पाण्याचे व्यवस्थापन करावे लागते. चारा कापण्यासाठी मुख्यतः शेतकऱ्यांना खूप कष्ट करावे लागते. ज्या वेळी जनावरे जास्त असतील, त्या वेळी ते कष्ट आणखी वाढते.

कडबा कुट्टी मशीन योजना 2024 (Kadba Kutti Machine Yojana)

ग्रामीण भागात शेतीला जोडधंदा म्हणून पशुपालन व्यवसाय केला जातो, त्यामध्ये दुग्ध व्यवसाय जास्त प्रमाणात आढळतो. कारण गाई, म्हैस, शेळी, मेंढी इ. पासून मिळणारे खत शेतीसाठी चांगले असते. तसेच या खतापासून पिकाची योग्य प्रकारे वाढ होते. आणि उत्पन्न पण जास्त प्रमाणात मिळते. यामुळे ग्रामीण भागात शेतकरी शेती सोबत दुग्ध व्यवसाय करतात.

दुग्ध व्यवसाय करताना पशूंची योग्य ती काळजी घेतली पाहिजे, कारण पशूंना जर योग्य प्रमाणात चारा (chaff cutter yojana) मिळाला नाही तर नुकसान देखील होऊ शकते. यामुळे पशूंना/जनावरांना योग्य चारा देणे गरजेचे आहे. पशूंच्या चाऱ्याचे योग्य नियोजन केले तर पशु पालकांना त्याचा नक्की फायदा होईल.

योजेनेचे नावकडबा कुट्टी मशीन योजना
अभियानकृषी यांत्रिकीकरण उप-अभियान
मिळणारा लाभकडबा कुट्टी मशीन खरेदीसाठी अनुदान
अर्ज करण्याची पद्धतऑनलाईन
अर्ज कुठे करायचाMahaDBT Farmer Portal
लाभार्थीशेतकरी

kadba kutti machine yojana maharashtra

शासन पशुपालकांसाठी अनेक योजना राबिविते, गाई, म्हैस, शेळी, मेंढी इ. खरेदी करण्यासाठी अनुदान देते. तसेच त्यासाठी लागणारी साहित्ये वस्तू यासाठी शासन अनुदान देते. सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी पशु पालकांना/शेतकऱ्यांना ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागतो. या लेखात आपण कडबा कुट्टी मशीन योजना बद्दलची संपूर्ण माहिती पाहणार आहोत.

कडबा “कुट्टी मशीन योजना” 2024, (Kadba Kutti Machine Yojana) योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज कुठे करायचा, योजनेची संपूर्ण माहिती, त्यासाठी लाभार्थ्याला कडबा कुट्टी मशीन खरेदी करण्यासाठी अनुदान किती मिळणार याबद्दलची सविस्तर माहिती येथे दिलेली आहे.

कडबा कुट्टी मशीन फायदे

  • कडबा कुट्टी मशीनला विद्युत मोटर जोडली असल्याने चारा कापण्यासाठी खूप कमी वेळ लागतो.
  • खूप मोठा चारा अगदी कमी वेळेत कापता येतो.
  • चारा बारीक केल्याने जनावरांना खाण्यास सोपा जातो.
  • चाऱ्याची कमी जागेत साठवणूक करता येते.
  • नासाडी कमी होते.
Kadba Kutti Machine Yojana 2024 Apply Online Maharashtra

कडबा कुट्टी मशीन घेण्यासाठी शासन, लाभार्थीला २० हजार रुपये पर्यंत अनुदान देते. योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांना ऑनलाईन फॉर्म भरावा लागतो. योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थीच्या नावे ७/१२, शेत जमीन असणे गरजेचे आहे. ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर लाभार्थीची निवड झाल्यास एसएमएस द्वारे कळविले जाते. किंवा महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टल वरती शेतकरी लॉग इन करून निवड झाली आहे का चेक करू शकतात.

कडबा कुट्टी मशीन योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे?
  • आधार कार्ड
  • बँक पासबुक
  • ७/१२ उतारा, ८ अ उतारा
  • मोबाईल नंबर

अर्ज करण्यासाठी “Kadba Kutti Machine Yojana” वरील कागदपत्रे असणे गरजेचे आहे. तसेच निवड झाल्यानंतर कोटेशन, टेस्ट रिपोर्ट, जीएसटी बिल, बँक स्टेटमेंट इतर माहिती/कागदपत्रे आवश्यक राहतील. निवड झाल्यानंतर पूर्वसंमती पत्र मिळाल्या शिवाय कडबा कुट्टी मशीन यंत्र खरेदी करू नये. पूर्वसंमती पत्र मिळाल्यानंतरच कुट्टी मशीन यंत्र खरेदी करावे.

कडबा कुट्टी मशीन साठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा?

  • ऑनलाईन अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम महाडीबीटी पोर्टल https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/Login/Login वरती नोंदणी/रजिस्ट्रेशन करावे लागते.
    • महाडीबीटी पोर्टल वरती रजिस्ट्रेशन करण्यासाठी अर्जदाराच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणे गरजेचे आहे.
  • त्यानंतर आवश्यक माहिती/ प्रोफाईल माहिती भरावी लागेल.
  • अर्ज करा या बटन वरती क्लिक करावे ⇒ कृषी यांत्रिकीकरण समोरील बाबी निवडा या ऑप्शन वरती क्लिक करा.
  • त्यानंतर खाली दाखवल्याप्रमाणे ऑप्शन निवडा.
    • मुख्य घटक ⇒ कृषी यंत्र औजारांसाठी खरेदीसाठी अर्थ सहाय्य
    • तपशील ⇒ Tractor/पॉवर टिलर चलित योजना
    • एच पी श्रेणी निवडा ⇒ २० बीएचपी पेक्षा कमी
    • यंत्रसामग्री, अवजारे/उपकरणे ⇒ फॉरेज/ग्रास/रेसेद्यू
    • मशीनचा प्रकार ⇒ कडबा कुट्टी (इंजिन/इलेक्ट्रिक ३ बीएचपी पेक्षा/पॉवर टिलर)
  • वरील प्रमाणे पर्याय निवडा, त्यानंतर अटी समोरील चौकोनात क्लिक करा. व जतन करा बटन वरती क्लिक करा.
  • मुख्य पृष्ठ ओपन करा, पुन्हा अर्ज करा या बटन वरती क्लिक करा. ⇒ अर्ज सादर करा या ऑप्शन वरती क्लिक करा.
  • अर्जाचा प्राधान्य क्रम निवडा त्यानंतर अर्ज सादर करा वरती क्लिक करून अर्जाचे शुल्क भरा.
  • अर्जाचे शुल्क भरल्यानंतर आपला अर्ज यशस्वीरीत्या सबमिट होईल.
  • अशा पद्धतीने तुम्ही कडबा कुट्टी मशीनसाठी ऑनलाईन अर्ज करू शकता.

Chaff Cutter Subsidy in Maharashtra Apply Online

कडबा कुट्टी मशीन योजनेसाठी कोणतेही शेतकरी अर्ज करू शकतात. कडबाकुट्टी मशीन योजना या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी अर्जदाराच्या नावे ७/१२ असणे गरजेचे आहे. तसेच “कडबा कुट्टी मशीन योजना 2024” अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती प्रवर्गातील लाभार्थीला कडबा कुट्टी मशीनसाठी ५०% अनुदान दिले जाते. तसेच सर्व साधारण प्रवर्गातील लाभार्थींना ४०% अनुदान दिले जाते. योजने अंतर्गत जास्तीत जास्त २० हजार रुपये पर्यंत अनुदान दिले जाते. अशा पद्धतीने तुम्ही कडबा कुट्टी मशीनसाठी ऑनलाईन अर्ज करू शकता.

कडबा कुट्टी मशीनसाठी कोठे अर्ज करावा लागतो?

महाडीबीटी वेब पोर्टलवर कडबा कुट्टी मशीनसाठी ऑनलाईन अर्ज करता येतो.

योजनेचे स्वरूप कसे आहे, निवड कधी होईल?

लॉटरी पद्धतीने अर्जदारांची योजनेसाठी निवड केली जाते. एकदा का निवड झाली कि अर्जदारास संदेशाने कळविले जाते.