Ladki Bahin Yojana : ‘लाडकी बहीण’ होऊ शकते श्रीमंत, 1500 गुंतवून मिळू शकतील 1 लाख, 23,730 रुपये; जाणून घ्या नेमकं कसं?

Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana 2025 : सर्वांना, सध्या राज्य सरकारतर्फे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना प्रतिमहा 1500 रुपये दिले जात आहेत.

राज्य सरकारने लागू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची (Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana) सध्या सगळीकडे चर्चा आहे. अजूनही पात्र महिलांच्या बँक खात्यावर पैसे पाठवले जात आहेत. दरम्यान, महिलांना या योजनेच्या माध्यमातून सरकार प्रत्येक महिन्यला 1500 रुपये देत आहेत. याच दीड हजार रुपयांच्या मदतीने महिला लखपती होऊ शकतात. 

ही योजना वाचा :- महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना : महिलांना या योजनेतून मिळणार २ लाख ३२ हजार रुपये; इथे पहा कसा घ्यायचा लाभ..,

महिला लखपती कशा होतील? 

प्रत्येक महिन्याला मिळत असलेले हे 1500 रुपये महिलांनी योग्य ठिकाणी गुंतवल्यास त्याचा चांगला फायदा होऊ शकतो. हे पैसे मिळणाऱ्या महिलांपैकी अनेक महिला अशिक्षित किंवा अल्पशिक्षित असू शकतात. पण योग्य मार्गदर्शन घेतल्यास किंवा घरातील सुशिक्षित सदस्याची मदत घेतल्यास महिला हे पैसे चांगल्या ठिकाणी गुंतवू शकतात. याच गुंतवणुकीच्या पर्यायांपैकी एक पर्याय हा म्युच्यूअल फंडाचा आहे. लाकडी बहीण योजनेच्या माध्यमातून मिळत असलेले पैसे महिला एसआयपीद्वारे म्युच्यूअल फंडात गुंतवू शकतात. तसे केल्यास पाच वर्षांत मिळणाऱ्या या 90 हजार रुपयांचे पाच वर्षांत तब्बल 1,23,730 रुपये होऊ शकतात. 

ही योजना वाचा :- अटल पेन्शन योजना सुरू; 210 रुपयामध्ये मिळेल महिन्याला 5000 व वर्षाला 60 हजार रुपये, अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा..,

असे होणार 1,23,730 रुपये

एसआयपीत गुंतवलेल्या पैशांवर साधारण 12 टक्क्याने (वार्षिक) परतावा मिळतो असे गृहित धरले जाते. एसआयी म्हणजेच म्युच्यूअल फंड हा शेअर बाजाराशी निगडीत असतो. त्यामुळे भांडवली बाजारातील चढऊतार लक्षात घेता व्या परताव्याची टक्केवारी कमी-कधीक होऊ शकते. मात्र एसआयपीमध्ये गुंतवलेल्या पैशांवर सरासरी 12 टक्क्यांनी व्याज मिळते असे गृहित धरले जाते. त्यानुसार समजा एखाद्या पात्र महिलेला प्रत्येक महिन्याला 1500 रुपये या प्रमाणे पाच वर्षांत 90 हजार रपये मिळाले आणि या महिलेने आलेल्या या 1500 रुपयांची एसआयपी केली तर पाच वर्षांत या 90 हजार रुपयांचे 1,23,730 रुपये होतील. अशा प्रकारे महिला त्यांना मिळालेल्या या पैशांचे मूल्य आणखी वाढवू शकतात.   

ही योजना वाचा :- प्रधानमंत्री उज्वला योजना : ‘उज्वला’ योजनेच्या लाभार्थ्यांना ३०० रुपयांचे अनुदान मिळणार; इथे वाचा कसा करायचा अर्ज..,

(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

ही योजना वाचा :- लेक लाडकी योजना 2025 : मुलींना मिळणार 1 लाख 1 हजार रुपये, फॉर्म, पात्रता, नोंदणी, कागदपत्रे इथे पहा; असा करा अर्ज..,

ही योजना वाचा :- सुकन्या समृद्धि योजना 2025 : मुलीच्या भविष्याची चिंता सोडा.. सुकन्या समृद्धि योजनेतून व्याजाचेच मिळतील 18 लाख! जाणून घ्या..,

Leave a Comment