Ladki bahin yojana portal closed : लाडकी बहीण योजनेचं पोर्टल बंद असल्याने अनेक नव्या महिलांना हप्ता मिळालेला नाही. जून-जुलैचे मिळून ₹3000 मिळण्याची शक्यता असून चिंता करण्याचं कारण नाही.
‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ राज्यात सुपरहीट ठरली. विधानसभेपूर्वी सुरू झालेल्या या योजनेचा लाभ लाखो महिलांनी घेतला. मात्र, सध्या या योजनेसंदर्भात काही अडथळे समोर येत आहेत. सरकारने काही नवीन निकष लावल्यामुळे काहींची नावे वगळण्यात आली आहेत, तर गेल्या काही महिन्यांपासून लाडकी बहीण योजनेचं पोर्टल बंद आहे. तर, काहींच्या बँक खात्यात जून महिन्याचा हप्ता जमा झालेला नाही.
सध्या या योजनेचं अधिकृत पोर्टल बंद असल्यानं, नव्याने पात्र महिलांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. यामुळे त्या लाभापासून वंचित राहत आहेत. त्याचबरोबर, जून महिन्याचा हप्ता अनेक लाभार्थी महिलांच्या खात्यात अद्याप जमा झालेला नाही. जुलैच्या पहिल्या आठवड्यात काही महिलांना हप्ता मिळाला असला, तरी सगळ्यांनाच मिळालेला नाही.
प्राथमिक माहितीनुसार, जून आणि जुलै महिन्याचे हप्ते मिळून एकत्रित ३,००० रुपये जमा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे लाभार्थी महिलांनी घाबरून जाण्याची गरज नाही. जुलै २०२४ ते मे २०२५ या कालावधीत अनेक लाभार्थी महिलांना एकूण ११ हप्ते म्हणजेच १६,५०० रुपये त्यांच्या खात्यात जमा झाले आहेत. मात्र, पोर्टल बंद असल्यामुळे नव्या लाभार्थींना अर्ज करता येत नाही.
विधानसभा निवडणुकीनंतर पात्र महिलांचे अर्ज तपासले जात आहेत. जे अर्ज नवीन निकषांमध्ये बसत नाहीत, त्यांची नावे वगळण्यात येत आहेत. जर तुमचा हप्ता बँकेत जमा झालेला नसेल आणि नाव यादीतून वगळलं गेलं असेल, असा संशय असल्यास, लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन यादीत आपलं नाव आहे की नाही, तपासा.