अर्ज करा – 9वी 10वी 12वीच्या विद्यार्थ्यांना 75,000 हजार रुपये स्कॉलरशिप (PM Yashasvi Scholarship Yojana)

PM Yashasvi Scholarship 2026: पात्रता निकष

  • अर्जदार विद्यार्थी या भारताचा नागरिक असावा.
  • अर्जदार विद्यार्थ्याकडे भारताचे कायमस्वरूपी रहिवासी प्रमाणपत्र असावे.
  • अर्जदार विद्यार्थी OBC, EBC, DNT प्रवर्गातील असणे आवश्यक आहे.
  • अर्जदार विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न म्हणजे सर्व स्तोत्र मिळून अडीच लाखापेक्षा जास्त नसावे.
  • हे शिष्यवृत्ती प्रामुख्याने इयत्ता नववी ते अकरावीच्या विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आली आहे.
  • अर्जदार विद्यार्थी ज्या शाळेमध्ये शिकत आहे ती शाळा सरकारने या योजनेसाठी निवडलेल्या टॉप क्लास स्कूल या यादीत असावी. (आता ही यादी अधिकृत वेबसाईट वरती उपलब्ध असते)
  • पूर्वी यासाठी प्रवेश प्रक्रिया घेतली जात होती परंतु आता नवीन अपडेट नुसार गुणवैत्याच्या आधारावरती विद्यार्थ्यांची निवड केली जाते.
  • अर्जदार विद्यार्थ्यांचे बँक खाते आधार कार्ड सोबत लिंक असणे अनिवार्य आहे.
  • आणि महत्त्वाचं म्हणजे मुले आणि मुली दोघेही या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

शिष्यवृत्तीची रक्कम (Scholarship Amount): कोणाला किती पैसे मिळणार?

  • जर विद्यार्थी इयत्ता नववी मध्ये शिकत असेल तर अशा विद्यार्थ्यांना प्रत्येक वर्षाला जास्तीत जास्त ₹ ७५,०००/- (पंच्याहत्तर हजार रुपये) पर्यंत शिष्यवृत्ती दिली जाते.
  • आणि जर विद्यार्थी अकरावी मध्ये शिकत असेल तर अशा विद्यार्थ्याला जास्तीत जास्त ₹ १,२५,०००/- (एक लाख पंचवीस हजार रुपये) पर्यंत शिष्यवृत्ती दिली जाते.

Mode of Payment – DBT

  • शिष्यवृत्ती मंजूर होताच शिष्यवृत्तीची रक्कम थेट विद्यार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाते आणि या प्रक्रियेला डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर असे म्हणतात.
  • पैसे मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांचे बँक खाते आधार कार्ड सोबत लिंक असणे महत्त्वाचे आहे.
  • आणि पैसे ट्रान्सफर होण्याच्या प्रक्रियेमध्ये कोणताही व्यक्ती मध्यस्थी नसतो त्यामुळे विद्यार्थ्याला पूर्ण पैसे मिळतात.

PM Yashasvi Scholarship 2026: कागदपत्रांची चेकलिस्ट

  • आधार कार्ड
  • उत्पन्नाचा दाखला
  • जातीचा दाखला
  • इयत्ता ९ वी साठी अर्ज करत असल्यास: ८ वी पास गुणपत्रक.
  • इयत्ता ११ वी साठी अर्ज करत असल्यास: १० वी पास गुणपत्रक.
  • बँक पासबुक 
  • बोनाफाईड प्रमाणपत्र
  • Passport Size Photo
  • रहिवासी दाखला
  • दिव्यांग प्रमाणपत्र

एक महत्वाची टीप: सर्व कागदपत्रे PDF किंवा JPG फॉरमॅटमध्ये (सांगितलेल्या साईजमध्ये) स्कॅन करून ठेवा, जेणेकरून फॉर्म भरताना वेळ वाया जाणार नाही.

PM Yashasvi Scholarship: ऑनलाईन अर्ज कसा करावा? (Step-by-Step Guide)

  1. तुम्हाला जर या स्कॉलरशिप साठी अर्ज करायचा असेल तर सर्वात आधी National Scholarship Portal (NSP) च्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या scholarships.gov.in किंवा योजनेच्या विशिष्ट पोर्टलला yet.nta.ac.in देखील तुम्ही भेट देऊ शकता.
  2. आणि जर मित्रांनो तुम्ही पहिल्यांदा अर्ज करत असाल तर अर्ज करण्यासाठी वेबसाईटच्या होमपेज वरती New Registration या पर्यायावर क्लिक करा.
  3. त्यानंतर येथे तुमचे नाव आधार कार्ड क्रमांक मोबाईल नंबर आणि कॅटेगिरी ची मूलभूत माहिती भरून व्यवस्थित रित्या नोंदणी करा.
  4. नोंदणी पूर्ण झाल्यावर ती तुम्हाला एक Application ID आणि Password मिळेल तो जपून ठेवा.

लॉग-इन करा (Login)

  1. आता तुम्हाला मिळालेला Application ID आणि Password वापरून पोर्टल वरती लॉगिन करा.
  2. आता तुमच्या डॅशबोर्ड वरती प्रधानमंत्री यशस्वी स्कॉलरशिप योजना हा पर्याय दिसेल तो निवडा.
  3. त्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन फॉर्म ओपन होईल त्यामध्ये तुमची वैयक्तिक माहिती शाळेची माहिती पालकांचे उत्पन्न आणि तुमचा पत्ता हा अचूक रित्या भरा.
  4. फॉर्म भरून झाल्यानंतर आपण वर पाहिलेली सर्व आवश्यक कागदपत्रे व्यवस्थितरित्या स्कॅन करून अपलोड करा. आणि महत्त्वाचं म्हणजे कागदपत्रे स्पष्ट दिसत आहे की नाही याची खात्री नक्की करा अन्यथा तुमचा अर्ज रिजेक्ट केला जाऊ शकतो.
  5. सर्व माहिती भरून झाल्यानंतर Preview या बटन वरती क्लिक करा आणि काही चूक असल्यास लगेच दुरुस्त करा.
  6. आता सर्व बरोबर असल्यास submit या बटन वरती क्लिक करा.

महत्त्वाचे म्हणजे अर्ज सबमिट झाल्यावर त्याची Print किंवा PDF सेव्ह करून ठेवा. भविष्यात तुम्हाला याची गरज लागू शकते. तसेच अर्ज करताना तुम्ही जर मोबाईल नंबर वापरत आहात आणि जो तुमच्याकडे असेल तोच द्या कारण अर्जाचे स्टेटस आणि ओटीपी त्याच मोबाईल नंबर वरती येतो.

PM Yashasvi Scholarship 2026: महत्वाचे अपडेट्स (Latest Updates)

महत्वाची टीप: २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी ‘Top Class School’ शिष्यवृत्तीचे अर्ज भरण्याची मुदत १५ नोव्हेंबर २०२५ रोजी संपली आहे (काही ठिकाणी ती वाढवून दिली जाते, त्यामुळे पोर्टल चेक करत राहावे). मात्र, ‘Top Class College Education’ (महाविद्यालयीन विद्यार्थी) साठी अर्जाची मुदत १५ डिसेंबर २०२५ पर्यंत होती. पुढील संधी: ज्यांना यावर्षी अर्ज करता आला नाही, त्यांनी पुढील वर्षी जून-जुलै २०२६ मध्ये नवीन अर्ज सुरू होताच त्वरित अर्ज भरावा.

Help & Contact Details

संपर्क माध्यमतपशील
हेल्पलाइन नंबर (NSP)0120 – 6619540 (सकाळी 8 ते रात्री 8)
ईमेल आयडीhelpdesk@nsp.gov.in
संबंधित विभागसामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय, भारत सरकार
पत्ताशास्त्री भवन, डॉ. राजेंद्र प्रसाद रोड, नवी दिल्ली – 110001

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQs)

पीएम यशस्वी’ योजनेसाठी अर्ज भरण्याची फी (Application Fee) किती आहे?

तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर या योजनेसाठी अर्ज करत असाल तर ही योजना पूर्णपणे मोफत आहे विद्यार्थ्याला अर्ज करण्यासाठी कोणती फी भरावी लागत नाही.

एकाच कुटुंबातील किती विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळू शकतो?

या योजनेकरिता एकाच कुटुंबातील जास्तीत जास्त दोन मुले अर्ज करू शकतात.

जर मी 09 वी किंवा 11 वी नापास झालो, तर शिष्यवृत्ती पुढे चालू राहील का?

नाही स्कॉलरशिप सुरू राहण्याकरिता विद्यार्थी उत्तीर्ण होऊन पुढील वर्गामध्ये जाणे अत्यंत आवश्यक आहे.