Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana E-KYC News :- महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्रातील महिलांच्या सक्षमीकरणाच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे, आणि महत्त्वाचे म्हणजे महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्रातील महिलांसाठी “Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana” जाहीर केली आहे. ही योजना राज्यातील कोट्यावधी महिलांना आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी म्हणून त्यांना सन्मानाचे जीवन जगण्याकरिता एक मोठा आधार देत आहे.,
तसेच या योजनेचा मुख्य हेतू म्हणजे महाराष्ट्र राज्यातील पात्र महिलांना दर महिन्याला 1500 रुपयांची आर्थिक मदत देऊन त्यांचे आरोग्य पोषण तसेच त्यांच्या कौटुंबिक गरजा पूर्ण करण्यास मदत करणे हा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा मुख्य उद्देश आहे आणि यामुळे महिलांचे केवळ जीवनमानच उंचावणार नाही तर त्यांची कुटुंबातील आणि समाजातील भूमिका आणखी मजबूत होईल.
आणि नुकतेच या योजनेमध्ये सरकारने एक नवीन नियम जाहीर केला आहे तो म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा थेट आणि आणि पारदर्शकपणे प्रत्येक पात्र महिलेपर्यंत पोहोचावा याकरिता महाराष्ट्र सरकारने महिलांना E-KYC (इलेक्ट्रॉनिक नो युवर कस्टमर) प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य केले आहे.
E-KYC (इलेक्ट्रॉनिक नो युवर कस्टमर) या प्रक्रियेमुळे महिलेचे आधार कार्ड बँक खाते आणि मोबाईल नंबर एकमेकांशी जोडले जातात म्हणजेच सरकारकडून मिळणारी आर्थिक मदत कोणत्याही अडथळ्याशिवाय तसेच मध्यस्थी शिवाय थेट महिन्याच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाते आणि महत्त्वाचं म्हणजे यामुळे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत पारदर्शकता येते आणि फसवणुकीला काळा देखील बसतो म्हणूनच महाराष्ट्र सरकारने या योजनेचा लाभ घेणाऱ्या पात्र महिलांना E-KYC (इलेक्ट्रॉनिक नो युवर कस्टमर) पूर्ण करणे बंधनकारक केला आहे आणि यासाठी दोन महिन्याचा कालावधी देखील देण्यात आला आहे.
👉 तुमची KYC 100% पूर्ण झाली की नाही हे पाहण्यासाठी :- येथे क्लिक करा
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना (Overview)
| योजना कोणी सुरू केली | महाराष्ट्र शासन |
| लाभार्थी | महाराष्ट्र राज्यातील पात्र महिला |
| मुख्य लाभ | दरमहा ठराविक आर्थिक मदत थेट बँक खात्यात |
| अर्ज पद्धत (E-KYC) | योजनेचा लाभ घेण्यासाठी E-KYC करणे अनिवार्य |
| (E-KYC) प्रक्रिया शेवटची तारीख | शेवटची तारीख पाहण्यासाठी – येथे क्लिक करा |
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना (Overview)

👉 तुमची KYC 100% पूर्ण झाली की नाही हे पाहण्यासाठी :- येथे क्लिक करा
eKYC साठी सर्वात महत्त्वाची कागदपत्रे
- आधार कार्ड (Aadhaar Card): eKYC प्रक्रियेचा संपूर्ण आधारच ‘आधार कार्ड’ आहे. तुमची सर्व माहिती आधार डेटाबेसवरून घेतली जाते.
- आधार-लिंक्ड मोबाईल क्रमांक (Aadhaar-Linked Mobile Number): eKYC प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तुमच्या आधार कार्डशी जोडलेल्या मोबाईल क्रमांकावर एक OTP (One Time Password) येतो. हा OTP टाकल्यानंतरच तुमची ओळख प्रमाणित होते.

👉 तुमची KYC 100% पूर्ण झाली की नाही हे पाहण्यासाठी :- येथे क्लिक करा
‘लाडकी बहीण’ योजनेसाठी अपात्र कोण असेल?
- ज्या महिलेच्या कुटुंबातील कोणीही सदस्य पती किंवा पत्नी जर आयकर भरत असेल तर त्या कुटुंबातील महिलेला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र ठरवण्यात येईल.
- जर अर्जदार महिला स्वतः सरकारी नोकरीवर असेल किंवा तिच्या कुटुंबातील कोणीही सदस्य राज्य सरकार किंवा केंद्र सरकार त्या विभागातील कोणत्याही स्थानिक उपक्रमामध्ये स्वराज्य संस्थेमध्ये कायमस्वरूपी नोकरी पदावर असेल तर अशा महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.
- अर्जदार महिलेच्या कुटुंबातील कोणीही सदस्य माजी खासदार/आमदार असतील तसेच जिल्हा परिषद अध्यक्ष/सदस्य पंचायत समिती अध्यक्ष/सदस्य किंवा इतर कोणत्याही नोंदणीकृत महामंडळामध्ये अध्यक्ष/संचालक असतील तर अशा महिलांना देखील या योजनेतून अपात्र ठरवण्यात आले आहे.
- जर महिलेला कोणत्याही इतर शासकीय योजनेतून उदाहरणार्थ संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळ योजना या योजनांमधून दर महिन्याला पंधराशे रुपयांची रक्कम मिळत असेल तर अशा महिलांना देखील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमधून अपात्र ठरवण्यात येत आहे.
- महिलेच्या घरी जर मोठे व्यवसाय असतील म्हणजेच महिलेच्या कुटुंबातील सदस्य डॉक्टर वकील इंजिनियर चार्टर्ड अकाउंटंट सारख्या नोंदणीकृत व्यवसायामध्ये असतील तर अशा महिलांना देखील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही.
