Mini Rice Mill Scheme 2025 : मिनी राईस मिल (गिरणी) अनुदान योजना सुरू; कसा व कोठे करावा अर्ज इथे पहा सविस्तर..,

Mini Rice Mill Scheme 2025 : सर्वांना नमस्कार , राईस मिल (गिरणी) ही अन्न-प्रक्रिया सुविधा आहे जिथे तांदूळ (unmilled rice) बाजारात विकण्यासाठी तांदूळावर प्रक्रिया केली जाते. संपूर्ण उत्पादन भातशेतीतून खरेदी केले जाते, आधुनिक यंत्रसामग्री आणि धूळमुक्त वातावरणात स्वच्छतेने दळणे आणि प्रक्रिया केली जाते आणि वर्गीकरण मशीनद्वारे साफ केली जाते.

मिनी राईस मिल योजना – Mini Rice Mill Scheme 2025 :

राष्ट्रिय अन्न सुरक्षा अभियान – भात या कर्यक्रमामध्ये राज्यातील 8 जिल्ह्यांचा समावेश आहे, त्यामध्ये नाशिक, पुणे, सातारा, नागपुर, भंडारा, गोंदिया, चंद्रपुर व गडचिरोली या 8 जिल्ह्या मध्ये मिनी राइस मिल ही योजना राबविण्यात येत आहे.

दुर्गम भागामध्ये भात भरडाई केंद्राची(राईस मिल) पूरेशी उपलब्धता नसल्याने शेतकरी यांना भात भर डाई साठी अडचणी निर्माण होतात.

सदर समस्येवर मात करण्यासाठी ग्रामीण भागात विजेवर तसेच विजेशिवाय चालणारे मिनी राइस मिल चा या योजनेत समावेश करण्यात आला आहे.

हे पण वाचा : शिलाई मशीन योजनेचा अर्ज करण्यासाठी :- येथे क्लिक करा

मिनी राईस मिल योजने अंतर्गत अनुदान:

मिनी राइस मिल साठी येणारा प्रत्यक्ष खर्चाच्या कृषि यांत्रिकीकरण उपअभियानच्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे 60 टक्के किंवा कमाल रु. 2 लाख इतके अनुदान या योजनेत देय आहे,

तसेच कृषि यांत्रिकीकरण उपअभियान अंतर्गत सर्व जिल्हांसाठी मिनी राईस मिल साठी अनुदान आहे.

१) अल्प/अत्यल्प/महिला/अजा/अज भूधारक  ६० टक्के किंवा कमाल रुपये २. ४० लाख.

२) बहू भूधारक – ५० टक्के किंवा कमाल रुपये २. ०० लाख.

हे पण वाचा : शिलाई मशीन योजनेचा अर्ज करण्यासाठी :- येथे क्लिक करा

अर्ज कोण करू शकतात:

शेतकरी/महिला गट हे मिनी राईस मिल योजनेसाठी अर्ज करू शकतात.

अर्ज कुठे करावा :

टीप ;- वरील जे 8 जिल्हे दिलेले आहेत त्या जिल्ह्यांमध्ये पुढे मागे ही योजना सुरू असते तुम्ही या 8 जिल्ह्यात असाल किंवा नसाल आणि तरीही तुम्हाला या योजनेचा लाभ हवा असल्यास तुम्हाला अधिक माहितीसाठी तुमच्या तालुका पंचायत समिती किंवा जिल्हा परिषद येथील कृषी अधिकारी कार्यालया मध्ये संपर्क करून तेथे त्यांच्या मार्गदर्शनाखाली अर्ज करावा.

हे पण वाचा : शिलाई मशीन योजनेचा अर्ज करण्यासाठी :- येथे क्लिक करा

Leave a Comment