लाडकी बहीण EKYC: 99% महिलांची हीच चूक! ‘हे’ 2 कागद वेगळे आहेत Divorce certificate for ekyc

परस्पर संमतीने घटस्फोट (Mutual Divorce) मिळवण्याची सविस्तर प्रक्रिया

अर्ज (Petition) दाखल करणे

  • पती-पत्नी यांना दोघांनाही मिळून एका वकिलामार्फत संयुक्त घटस्फोट याचिका तयार करावी लागत असते.
  • ही याचिका तुमच्या भागातील कौटुंबिक न्यायालयामध्ये तुम्हाला दाखल करावी लागते.
  • पण अर्ज करण्यापूर्वी दोघांनाही किमान एक वर्ष किंवा त्याहून अधिक वेगळे राहणे हे कायदेशीर रित्या आवश्यक असते.
  • या अर्जामध्ये alimony तसेच मुलांचा दाबा आणि तुमच्या मालमत्तेची वाटणी यांसारख्या सर्व महत्त्वाच्या बाबींवर दोघांची म्हणजे पती आणि पत्नीचे संमती झालेली आहे हे स्पष्टपणे लिहावे लागते.

अर्ज (Petition) दाखल करणे

  • मित्रांनो याचिका केल्यानंतर काही दिवसांमध्ये पती आणि पत्नी यांना दोघांनाही न्यायालयामध्ये न्यायाधीशांसमोर हजर राहावे लागत असते.
  • न्यायाधीश महोदयदोघांची देखील ओळख पटवत असतात आणि मुख्य म्हणजे हा निर्णय दोघांनी सहकुशीने घेतला आहे का?तसेच कोणत्या दबावाशिवाय घेतला आहे का याची खात्री करत असतात.
  • आता पती आणि पत्नी यांचे दोघांचे देखील जबाब नोंदवून घेतले जातात जर न्यायालयाची खात्री पटली तर ते प्रकरण कूलिंग ऑफ कालावधीसाठी पुढे ढकलले जात असते यालाच आपण firt motion असं म्हणतो.

‘कूलिंग-ऑफ’ कालावधी (6 ते 18 महिने)

  • कूलिंग-ऑफ कालावधी हा कायद्याने दिलेला सक्तीचा थांबवण्याचा कालावधी असतो.
  • firt motionत्या तारखेपासून किमान सहा ते 18 महिने कालावधी असतो.
  • म्हणजेच हा वेळ पती पत्नीला त्यांच्या निर्णयावर पुनर्विचार करण्यासाठी न्यायालयाकडून दिला जातो जर या काळात त्यांना वाटले की परत आपण दोघे एकत्र राहावे तर ते त्यांची न्यायालयातील याचिका मागे घेऊ शकतात. पण काही विशेष प्रकरणांमध्ये जर विभक्त राहण्याचा कालावधी खूप जास्त असेल तर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार न्यायालय हा सहा महिन्याचा कालावधी देखील माफ करू शकतो पण हा एक अपवाद आहे.

अंतिम सुनावणी (Second Motion)

  • मित्रांनो सहा महिन्याचा कूलिंग ऑफ कालावधी संपल्यानंतर दोघांनाही न्यायालयामध्ये पुन्हा अंतिम सुनावणीसाठी अर्ज करावा लागतो.
  • तसेच पती आणि पत्नी यांना दोघांना देखील न्यायालयामध्ये हजर राहावे लागते.
  • याद्वारे ते न्यायालयात सांगतात की सहा महिन्यानंतरही ते त्यांच्या घटस्फोटाच्या निर्णयावर ती अगदी ठाम आहेत आणि त्यांना घटस्फोट मंजूर करण्यात यावा.

न्यायालयाचा अंतिम हुकूमनामा (Decree)

  • मित्रांनो सेकंड मोशनच्या वेळी न्यायालय पुन्हा एकदा दोघांकडून खात्री करते की दोघांची कायमची संमती आहे का आणि सर्व अटी पाडल्या गेल्या आहेत का.
  • न्यायालयाला सर्व खात्री पटल्यानंतर न्यायालय घटस्फोटाचा हुकूमनामा जारी करते.
  • आणि या हुकूमनाम्याद्वारे तुमचा विवाह कायदेशीररित्या संपुष्टामध्ये येतो आणि घटस्फोट अधिकृतपणे मंजूर होतो.

घटस्फोटासाठी कोणती कागदपत्रे लागतात?

  • Marriage Certificate
  • Wedding Invitation Card
  • Marriage Photographs
  • Aadhaar Card
  • PAN Card
  • Proof of Income
  • Bank Statement
  • Birth Certificates of Children
  • Passport Size Photographs
  • Joint Petition

घटस्फोटाची प्रक्रिया ‘ऑनलाइन’ करता येते का?

भारताच्या e-Courts (ई-कोर्ट्स) प्रणालीमुळे (Source: eCourts Services Portal) प्रक्रियेतील काही गोष्टी सोप्या झाल्या आहेत:

  • पती आणि पत्नी हे त्यांच्या वकिलामार्फत घटस्फोटाचा अर्ज ऑनलाईन रित्या दाखल करू शकतात.
  • यासोबतच घटस्फोटासाठी लागणारी सर्व कागदपत्रे त्यांना स्कॅन करून अपलोड करता येतात आणि यासाठी कोर्टाची ऑनलाईन फी सुद्धा भरावी लागत असते.
  • यामुळे अर्ज दाखल करण्यासाठी कोणताही वेळ वाया जात नाही आणि सर्व प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने अगदी सुरळीत होते.
  • तसेच तुम्ही ऑनलाईन पद्धतीने तुमच्या केसची स्थिती देखील तपासू शकता हा ऑनलाइन सेवेचा सर्वात मोठा आणि मुख्य वापर आहे.
  • तुम्हाला मिळालेला CNR नंबर तसेच केस नंबर आणि अगदी तुमच्या नावाने तुम्ही तुमची केस कुठपर्यंत आली आहे तसेच पुढील तारीख कधी आहे हे सर्व ECourt Services च्या वेबसाईटवर किंवा ॲपच्या माध्यमातून तपासू शकता.

न्यायालयाचे आदेश (Court Orders) आणि हुकूमनामा (Decree) डाउनलोड करणे

  • पती आणि पत्नी यांचा घटस्फोट मंजूर झाल्यानंतर न्यायालयाचा अंतिम घटस्फोटाचा हुकूमनामा’ (Divorce Decree) तुम्ही eCourts पोर्टलवरून डाउनलोड करू शकता.
  • हा हुकूमनामा (Decree) हाच तुमचा घटस्फोट झाल्याचा मुख्य कायदेशीर दस्तऐवज असतो.

note: ‘घटस्फोट प्रमाणपत्र’ (Certificate) हे नंतर या हुकूमनाम्याच्या आधारे स्थानिक नगरपालिका किंवा विवाह निबंधक कार्यालयातून मिळते. ते प्रमाणपत्र ऑनलाइन मिळण्याची प्रक्रिया प्रत्येक राज्याच्या पोर्टलवर अवलंबून असते, पण ‘हुकूमनामा’ हा न्यायालयाकडून ऑनलाइन मिळतो.

प्रक्रिया (Process)ऑनलाइन (Online)ऑफलाइन (Offline)
अर्ज/याचिका दाखल करणे (Filing)होय (e-Filing)नाही
केसची स्थिती तपासणे (Case Status)होय (eCourts Portal)नाही
न्यायाधीशासमोर हजर राहणे (Appearance)नाहीहोय (सक्तीचे)
जबाब नोंदवणे/संमती देणे (Statements)नाहीहोय (सक्तीचे)
अंतिम हुकूमनामा (Decree) मिळवणेहोय (Download)होय (प्रत्यक्ष प्रत)

घटस्फोट मिळवण्यासाठी किती वेळ आणि खर्च लागतो?

मित्रांनो घटस्पोट मिळवण्याकरिता घटस्फोटाचा एकूण खर्च हा दोन भागांमध्ये मुख्यता विभागलेला असतो एक म्हणजे कोर्टाची फी आणि दुसरी म्हणजे वकिलाची फी.

  • आता कोर्ट फी अतिशय नाममात्र असते कौटुंबिक न्यायालयाच्या अर्जावर विशिष्ट रकमेचा उदाहरणार्थ 100 ते 500 रुपयापर्यंतचा कोर्ट फी स्टेप लावावा लागतो. यासोबतच प्रतिज्ञापत्र इत्यादींसाठी किरकोळ खर्च येतो म्हणजे असं समजायचं की एकूण खर्च सहसा हजार ते अडीच हजारापर्यंत जातो.
  • पण यामध्ये वकिलाचा खर्च हा मुख्य आणि सर्वात बदलणारा भाग आहे परस्पर संमतीच्या घटस्फोटासाठी वकील सहसा पॅकेज फी घेतात त्यामध्ये पहिला अर्ज आणि दुसरा अर्ज अशा दोन सुनावण्यासाठी वेगवेगळी ती घेतली जाते आता तुम्ही जर छोटी शहरे किंवा तालुक्याच्या ठिकाणी राहत असाल तर तुमच्याकडून अंदाजे १५००० ते ३० हजार रुपयांपर्यंतची वकील महोदय घेऊ शकतात. आणि तुम्ही जर मेट्रो शहरे म्हणजेच दिल्ली मुंबई या ठिकाणी राहत असाल तर तुमच्याकडून अंदाजे 25000 ते 60,000 हजार रुपया पर्यंतचे फी किंवा काही प्रकरणासाठी त्याहून अधिक फी घेतली जाते.

घटस्फोटाचा हुकूमनामा मिळाल्यानंतर काय करावे?

मित्रांनो तुम्हाला मिळालेला हुकूमनामा हा अत्यंत महत्त्वाचा दस्तऐवज आहे तो नेहमी जपून ठेवा तुम्ही त्याच कोर्टातून तुमच्या हुकुम धाब्याच्या काही सर्टिफिकेट प्रति काढू शकता. कारण सर्व सरकारी कार्यालयामध्ये मूळ प्रत पाहता येत नाही किंवा ते सरकारी कार्यालय साधी झेरॉक्स स्वीकारत नाहीत त्यांना कोर्टाचा शिक्का आणि सही असलेली सर्टिफिकेट प्रत लागते.

‘हुकूमनामा’ (Decree) कुठे वापरावा लागतो?

मित्रांनो आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की घटस्फोट प्रमाणपत्र हे काही वेगळे नसून हाच हुकूमनामा तुमचा घटस्फोट झाल्याचा अंतिम कायदेशीर पुरावा असतो आणि याच पुराव्याच्या आधारे तुम्ही तुमची सर्व सरकारी कागदपत्रे तसेच आर्थिक कागदपत्रे याच्यावरील नावे बदलू शकता.

प्रमुख ठिकाणे जिथे तुम्हाला हा हुकूमनामा दाखवावा लागेल:

  • जर पत्नीला तिचे माहेरचे आडनाव लावायचे असेल तर हा हुकूमनामा नाव बदलण्याच्या प्रक्रियेत एक मुख्य पुरावा असतो.
  • या पुराव्याच्या आधारे महिला आधार कार्ड वरील न बदलू शकते तसेच पॅन कार्ड वरील नाव सुद्धा बदलू शकते आणि यासोबतच पासपोर्ट रेशन कार्ड आणि इतर सरकारी कागदपत्रावरील नावे अगदी सहजरित्या बदलू शकते.
  • हा पुरावा बँकिंगच्या आर्थिक व्यवहारांमध्ये सुद्धा महत्त्वाचा मानला जातो म्हणजेच EKYC मध्ये वैवाहिक स्थिती बदलण्याकरिता तसेच नॉमिनी बदलण्याकरिता आणि यासोबतच जर पती आणि पत्नीचे जॉईंट अकाउंट असेल तर ते जॉईंट अकाउंट बंद करून एकाच व्यक्तीच्या नावावर बँक अकाउंट करण्यासाठी याचा वापर केला जातो.

महिलांनो सध्या महाराष्ट्र राज्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना EKYC करणे अनिवार्य झाले आहे आणि यामध्ये या घटस्फोट प्रमाणपत्राचा वापर अत्यंत जास्त प्रमाणात होणार आहे कारण ज्या महिलांचे घटस्फोट झाले आहेत त्यांना सरकारने वेबसाईट मध्ये एक नवीन पर्याय उपलब्ध करून दिला आहे तो म्हणजे तुम्ही घटस्फोट सर्टिफिकेट अपलोड करून देखील तुमची केवायसी कम्प्लीट करू शकता म्हणूनच केवायसी पूर्ण करण्यासाठी तसेच इतर तुमचे आर्थिक व्यवहार अगदी सुरळीत करण्यासाठी हे प्रमाणपत्र अगदी महत्त्वाचे आहे.

घटस्फोट प्रमाणपत्र (Divorce Certificate) मिळवणे

तर काही राज्यांमध्ये तुम्ही तुमच्या न्यायालयाचा हुकूमनामा तुमच्या स्थानिक महानगरपालिका किंवा विवाहित निबंधक कार्यालयामध्ये जमा करू शकता त्याच्या आधारे ते त्यांच्या रेकॉर्डमध्ये घटस्फोटाची नोंद करतात आणि तुम्हाला घटस्फोट प्रमाणपत्र देत असतात हा एक सोपा पुरावा असतो प्रत्येक ठिकाणी न्यायालयाचा दहा ते पंधरा पाणी सविस्तर हुकूमनामा यामध्ये तुमची सर्व वैयक्तिक माहिती तसेच तुमच्या मालमत्तेची संवेदन माहिती असते तर हे हुकूमनामा दस्तऐवज दाखवण्याऐवजी तुम्ही हे फक्त एक पानाचे प्रमाणपत्र दाखवू शकता.

थोडक्यात: तुमचा ‘हुकूमनामा’ (Decree) हाच मुख्य दस्तऐवज आहे. तो वापरून तुमची सर्व सरकारी आणि आर्थिक कागदपत्रे ‘अपडेट’ (Update) करणे, हीच घटस्फोटानंतरची सर्वात महत्त्वाची प्रक्रिया आहे.

निष्कर्ष: वकिलाचा सल्ला का महत्त्वाचा आहे?

मित्रांनो आम्ही या लेखामार्फत तुम्हाला घटस्फोटाची कायदेशीर प्रक्रिया तसेच त्यासाठी लागणारी कागदपत्रे आणि अंदाजे वेळ याबद्दल सविस्तर माहिती दिली ही माहिती तुम्हाला या प्रक्रियेची एक स्पष्ट रुपरेषा देण्याकरिता होते पण एक गोष्ट लक्षात घेणे सर्वात महत्त्वाचे आहे की प्रत्येक घटस्फोटाचे प्रकरण हे वेगळे असते तुमची कौटुंबिक परिस्थिती आर्थिक व्यवहार मालमत्तेचे तपशील आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मुलांशी संबंधित बाबी या पूर्णपणे तुमच्या वैयक्तिक असतात तसेच इंटरनेटवरील माहिती तुम्हाला ज्ञान देऊ शकते पण तुमच्या विशिष्ट परिस्थितीला लागू होणारा सल्ला देऊ शकत नाही.

यासाठी तुम्हाला एका अनुभवी वकिलाचा सल्ला घ्यावा लागतो कायद्यामध्ये अनेक सूक्ष्म बारकावे असतात कागदपत्रांमधील एक छोटीशी चूक किंवा अटीमधील अस्पष्टता तुमच्या भविष्यासाठी एक मोठी कायदेशीर किंवा आर्थिक अडचण देखील निर्माण करू शकते त्यामुळे एक अनुभवी वकील हे सुनिश्चित करतो की, (अगदी परस्पर संमतीने घटस्फोट घेतला तरी) तुमच्या सर्व अटी, विशेषतः पोटगी (Alimony) आणि मालमत्ता वाटप, या कायदेशीररित्या ‘बिनचूक’ (Error-free) आणि ‘फूलप्रूफ’ (Full-proof) आहेत. तो तुमचे हक्क सुरक्षित करतो. वकील तुम्हाला केवळ प्रक्रिया सांगत नाही तर केससाठी सर्वोत्तम आणि जलद मार्ग कोणता असू शकतो याचे देखील मार्गदर्शन करतो म्हणूनच अंतिम निर्णय घेण्यापूर्वी कोणत्याही कागदपत्रांवर सही करण्यापूर्वी तुमचा पहिला आणि सर्वात महत्त्वाचा टप्पा हा एका अनुभवी घटस्फोट वकिलाशी प्रत्यक्ष बोलणे हा असला पाहिजे कारण हा खर्च नसून तुमच्या सुरक्षित आणि कायदेशीर दृष्ट्या स्पष्ट भविष्यासाठी केलेलीमहत्वाची गुंतवणूक आहे. “ही माहिती केवळ शिक्षणासाठी असून, याला कायदेशीर सल्ला समजू नये.”