NPS Vatsalya Scheme 2024 : या योजनेला देशभरातून पहिल्याच दिवशी जोरदार प्रतिसाद मिळाला. मुलांचे भविष्य सुरक्षित करणाऱ्या या योजनेविषयी पालकांमध्ये उत्सुकता दिसून आली. या योजनेत पहिल्याच दिवशी मोठा प्रतिसाद दिसून आला. 18 सप्टेंबर 2024 रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी या योजनेचा शुभारंभ केला होता.
आई-वडील जर मुलांच्या नावे लवकर या योजनेत गुंतवणूक करतील तर त्यांना कम्पाऊंडिंगाचा जोरदार फायदा होईल. या योजनेचे PFRDA व्यवस्थापन करत आहे. या योजनेची घोषणा 2024-25 केंद्रीय अर्थसंकल्पात करण्यात आली होती.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नुकतंच ‘एनपीएस वात्सल्य’ या नवीन योजनेचे उद्घाटन केले. २०२४ च्या अर्थसंकल्पात सरकारने या योजनेची घोषणा केली होती, ज्यामुळे पालकांना आपल्या मुलांचे भवितव्य सुरक्षित करण्यासाठी गुंतवणूक करण्याची सुवर्ण संधी मिळणार आहे.
या योजनेच्या अंतर्गत वयाच्या १८ वर्षांपर्यंत मुलांची खाती उघडली जाऊ शकतात आणि पुढील काळात या खात्याचे रूपांतर नियमित पेन्शन योजनेत होईल. ही योजना पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरण (पीएफआरडीए) द्वारे राबवली जाणार आहे.
एनपीएस वात्सल्य योजनेच्या अटी –
‘एनपीएस वात्सल्य’ योजनेअंतर्गत १८ वर्षांपर्यंतची सर्व मुले पात्र आहेत. खाते केवळ मुलांच्या नावाने उघडता येईल, परंतु गुंतवणुकीची जबाबदारी पालकांची असेल. यामुळे पालकांना त्यांच्या मुलांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी प्रोत्साहन मिळेल. जवळपास सर्व बँका, पोस्ट ऑफिस आणि पेन्शन फंडांमध्ये पॉइंट ऑफ प्रेझेन्सद्वारे या खात्याचे उघडणे शक्य आहे. ई-एनपीएस प्लॅटफॉर्मवर ऑनलाइन खाते उघडण्याची सुविधा उपलब्ध आहे, ज्यामुळे प्रक्रिया अधिक सोपी आणि जलद होईल.
गुंतवणूक रक्कम
या खात्याचे उघडणे कमीत कमी १००० रुपयांनी शक्य आहे आणि गुंतवणुकीसाठी कोणतीही कमाल मर्यादा नाही. त्यामुळे पालकांना त्यांच्या आवडीनुसार आणि आर्थिक क्षमतेनुसार अधिक रक्कम गुंतवण्याची मुभा मिळते. खात्यात जमा केलेल्या पैशावर चक्रवाढ व्याज मिळेल, ज्यामुळे योजनेचा आर्थिक लाभ वाढतो.
रक्कम काढणे
या योजनेमध्ये तीन वर्षांच्या लॉक-इन कालावधीनंतर, २५ टक्के रक्कम विशेष परिस्थितीत, जसे की शिक्षण, आजार किंवा अपंगत्व यासाठी काढता येईल. हे पालक आणि मुलांसाठी अत्यंत उपयुक्त आहे, कारण यामुळे आर्थिक संकटांच्या काळात आवश्यक रक्कम उपलब्ध होऊ शकते.
रक्कम काढण्याची मर्यादा
मुलाचे वय १८ वर्षांचे होईपर्यंत, जास्तीत जास्त तीन वेळा यातील रक्कम काढता येईल. १८ वर्षांपर्यंत मूल या योजनेतून बाहेर पडता येणार नाही, ज्यामुळे बचतीचा एक स्थिर प्लॅन तयार केला जातो आणि मुलांचे भविष्य सुरक्षित राहते.
NPS Vatsalya योजनेसाठी कसा करणार अर्ज –
आई-वडील हे कोणतीही सरकारी बँक, टपाल खाते, पेन्शन फंड वा ई-एनपीएस प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून एनपीएस वात्सल्य योजनेत सहभागी होऊ शकतो. ICICI Bank ने मुंबईतील सेवा केंद्रावर या योजनेची सुरुवात केली आहे. नवीन खात्यांची नोंद केली आणि तरुण ग्राहकांसाठी प्रतिकात्मक PRAN कार्ड दिले. ई-एनपीएस पोर्टलच्या माध्यमातून गुंतवणूक करता येते.
अधिक माहितीसाठी SBI च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन योजनेची माहिती पाहण्यासाठी :- येथे क्लिक करा
NPS Vatsalya Yojana : या योजनेच्या माध्यमातून, सरकारने पालकांच्या आर्थिक सुरक्षेसाठी एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. ‘एनपीएस वात्सल्य’ योजनेच्या अंमलबजावणीने भारतीय समाजात आर्थिक जागरूकता वाढेल आणि मुलांच्या भविष्याची दिशा निश्चित करण्यात मदत होईल. ही योजना निश्चितच पालकांना आर्थिक सुरक्षा आणि यशस्वी भविष्याचे आश्वासन देईल.