Ladki Bahin Yojana : लाडकी बहिण योजना अर्ज मंजूर तरीही पैसे आले नाही; हे अर्ज बँकेत सादर करा, लगेच पैसे खात्यात जमा होणार..,

Ladki Bahin Yojana : लाडकी बहिण योजना अर्ज मंजूर तरीही पैसे बँकेत जमा झाले नसतील तर पहा संपूर्ण माहिती. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना अंतर्गत महिलांना दरमहा १५०० रुपये मिळत आहेत. यातील पहिल्या टप्प्यातील आणि दुसऱ्या टप्प्यातील ज्या महिलांनी ऑनलाईन अर्ज सादर केले होते त्यांच्या बँक खात्यामध्ये हे पैसे जमा सुद्धा झालेले आहेत.

ऑनलाईन अर्ज केल्यानंतर तुम्हाला जर मंजुरीचा संदेश आला असेल तर तुमच्या बँक खात्यामध्ये हे पैसे जमा होणे अपेक्षित आहे.

परंतु अनेक महिलांना माझी लाडकी बहिण योजनेचा अर्ज मंजूर होऊनही अजून त्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा झालेले नाहीत.

तुम्ही देखील मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा अर्ज सादर केला असेल आणि तुमचा अर्ज मंजूर होऊनही तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा झाले नसेल तर ते न होण्याचे कोणते कारण आहे या संदर्भात आपण या ठिकाणी माहिती जाणून घेणार आहोत.

“मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण” या योजनेंतर्गत राज्यातील सर्व पात्र महिला लाभार्थ्यांना माहे सप्टेंबर, २०२४ मध्ये या योजनेंतर्गत नोंदणी सुरु ठेवण्यास मान्यता देण्यात येत आहे. तथापि, या योजनेंतर्गत नोंदणीबाबतच्या कार्यवाहीसंदर्भात वेळोवेळी आवश्यक त्या सूचना देण्यात येतील.”

अर्ज करण्याची शेवटची तारीख: ३१ जुलै २०२४  ३० सप्टेंबर २०२४ पर्यंत मुदत वाढ.

अर्ज मंजूर तरीही जमा झाले नाहीत पैसे हे आहे कारण

अनेक महिलांना माझी लाडकी बहिण योजनेचे अर्ज मंजूर झाल्याचे संदेश आलेले आहेत असे असतांना देखील अद्याप त्यांच्या बँक खात्यामध्ये माझी लाडकी बहिण योजनेचे पैसे जमा न झाल्याने त्यांना चिंता लागलेली आहे.

पैसे जमा न होण्याचे कारण म्हणजे तुमच्या बँक खात्याला आधार सीडिंग नसणे हे देखील एक कारण असू शकते.

त्यानंतर दुसरे कारण म्हणजे तुमच्या बँक खात्याला NPCI (National payment corporation of India ) लिंक नसणे होय.

बँक खात्याला NPCI mapping असेल तर अशावेळी शासकीय स्तरावरून दिले जाणारे अनुदान थेट बँक खात्यामध्ये जमा होते.

त्यामुळे तुम्हाला तुमच्या बँक खात्याला हा NPCI mapping form लिंक करणे गरजेचे आहे.

खालील लिंकवर क्लिक करून अर्ज डाउनलोड करून घ्या आणि तुमच्या बँक शाखेमध्ये जमा करून द्या.

NPCI form मध्ये खालील माहिती भरावी लागणार आहे.

  • बँकेचे नाव.
  • बँक शाखेचे नाव.
  • तुमचा खाते क्रमांक.
  • खातेदार यांची सही.
  • खातेदाराचे नाव.
  • खातेदाराचा मोबाईल नंबर इमेल आयडी या संदर्भातील माहिती.

अशा पद्दतीने तुम्ही NPCI form बँकेत सादर करून तुमच्या बँक खात्याला आधार लिंक करू शकता व लाडकी बहिण योजनेचे पैसे मिळवू शकता.

मोबाईलवरून शोधा कोणत्या बँक खात्यात गेले आहेत पैसे

बऱ्याच वेळेस अनेक व्यक्तींचे एकापेक्षा अनेक बँक खाती असतात. शासकीय स्तरावरून दिले जाणारे अनुदान हे आधार लिंक खात्यामध्ये जमा होते.

तुमचे कितीही बँक खाती असतील तरी कोणत्यातरी एकाच खात्याला आधार नंबर लिंक असतो.

आपला आधार नंबर नेमका कोणत्या बँक खात्याला लिंक आहे हे जाणून घेण्यासाठी खालील व्हिडीओ पहा आणि त्या पद्धतीने तुमचे बँक आधार लिंकिंग स्टेट्स अगदी तुमच्या मोबाईलवरून चेक करून घ्या जेणे करून तुम्हाला कळेल कि तुमचा आधार नंबर कोणत्या बँक खात्याला लिंक आहे.

व्हिडीओ पाहण्यासाठी :- येथे क्लिक करा

लक्षात घ्या कि तुमच्या आधारला मोबाईल नंबर लिंक करणे, बँक खात्याला आधार लिंक करणे आणि बँक खात्याला npci mapping form लिंक  करणे या वेगवेगळ्या बाबी आहेत.

त्यामुळे केवळ आधारला मोबाईल लिंक असून जमत नाही किंवा बँकेला आधार नंबर लिंक असून जमत नाही तर वरती सांगितलेल्या प्रमाणे तिन्ही बाबी जर लिंक असतील तरच तुमच्या बँक खात्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचे पैसे जमा होऊ शकतात.

अजूनही करता येईल अर्ज

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेसाठी तुम्ही पात्र असाल आणि तुमचा अर्ज सादर करण्याचा बाकी असेल तर तुम्ही आता सप्टेंबर महिना संपण्यापूर्वी अर्ज सादर करू शकता.

माझी लाडकी बहिण योजनेचे अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ ऑगस्ट हि देण्यात आली होती. त्यानंतर शासनाने परत एक जी आर निर्गमित करून मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख वाढवून दिली आहे.

तुम्ही अजूनही तुमचा अर्ज सादर केला नसेल तर आता लगेच अर्ज सादर करून द्या जेणे करून तुम्हाला देखील या योजनेच लाभ मिळू शकेल.

अर्ज करणे अगदी सोपे आहे. तुम्ही तुमच्या मोबाईलवरून देखील मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेसाठी ऑनलाईन अर्ज सादर करू शकता. तुम्हाला जर माहित नसेल कि हा अर्ज सादर कसा  करावा लागतो तर त्यासाठी खालील माहिती पहा.

योजनेसाठी पात्रता:
  • महिला महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणे आवश्यक.
  • विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या, निराधार महिला.
  • वयाची किमान २१ वर्ष पूर्ण व कमाल ६० वर्ष मर्यादा.
  • अर्ज करणाऱ्या महिलांचे बँक खाते असणे आवश्‍यक.
  • अर्जदार महिलेच्या कुटुंबांचे एकत्रित वार्षिक उत्पन्न २ लाख ५० हजारांपेक्षा जास्त नसावे.
  • अन्य विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे दीड हजार रुपयांपेक्षा जास्त लाभ घेतला नसेल.
  • ट्रॅक्टर वगळून चारचाकी वाहन नावावर नसेल, अशा महिला.
आवश्यक कागदपत्रे:
  • ऑनलाइन संकेतस्थळावर अथवा प्रत्यक्ष अर्ज करावा.
  • आधार कार्ड आवश्‍यक.
  • राज्याचे अधिवास प्रमाणपत्र अथवा राज्यातील जन्म दाखला.
  • बँक खात्याच्या पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत.
  • पासपोर्ट आकाराचा फोटो, रेशनकार्ड.
  • योजनेच्या अटी-शर्तींचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र.
  • अर्ज दाखल करताना अर्जदार महिला प्रत्यक्ष उपस्थित राहणे आवश्‍यक.
अर्ज भरण्याची सुविधा:
  • अंगणवाडी केंद्रे येथे येथे जाऊन अंगणवाडी सेविकेच्या माध्यमातून अर्ज करता येतो , इतर कुठेही आत्ता अर्ज करून दिला जात नाही याची नोंद घ्यावी.

हेल्पलाइन टोल फ्री संपर्क क्रमांक : १८१ (महिला व बाल विकास विभाग, महाराष्ट्र)

Leave a Comment