माझी कन्या भाग्यश्री योजना : लेकीच्या जन्मानंतर ५०,००० मिळणार; १८ वर्षांपर्यंत प्रत्येक महिन्याला जमा होणार पैसे; इथे पहा लाभ कसा घ्यायचा?

Majhi Kanya Bhagyashree Yojana 2024 : सर्वांना नमस्कार, केंद्र सरकार आणि राज्य सरकारे हे दोघेही वेगवेगळ्या योजना राबवतात. या योजनांमध्ये विमा, पेन्शन, रेशन, घर, वीज, रोजगार यासह इतर अनेक फायदेशीर आणि कल्याणकारी योजनांचा समावेश आहे. एवढेच नाही तर देशातील मुलींसाठी विशेषत: अनेक योजना राबविल्या गेल्या आहेत.

त्यातील एक म्हणजे ‘माझी कन्या भाग्यश्री योजना’. या योजनेंतर्गत मुलींच्या जन्मावर शासनाकडून कुटुंबांना आर्थिक मदत दिली जाते. यातच तुमची इच्छा असल्यास, तुम्ही तुमची या योजनेसाठी लागणारी पात्रता तपासून या योजनेत सहभागी होऊ शकता. आताच आपण माझी कन्या भाग्यश्री योजनेबद्दल अधिक माहिती जाणून घेणार आहोत…

महाराष्ट्र सरकारची मुलींसाठी खास माझी कन्या भाग्यश्री योजना राबवली आहे. या योजनेत मुलींच्या जन्मापासून त्या १८ वर्षांच्या होईपर्यंत आर्थिक मदत केली जाते.तुमच्या मुलीलाही मिळू शकतात 50 हजार रुपये, जाणून घ्या काय आहे ‘माझी कन्या भाग्यश्री योजना’ – केंद्र सरकारसोबतच राज्य सरकारनेही मुलींसाठी खास योजना राबवली आहे. महाराष्ट्र शासनाने माझी कन्या भाग्यश्री योजना राबवली आहे. या योजनेअंतर्गत मुलीच्या जन्मानंतर ५०,००० रुपये दिले जातात.

माझी कन्या भाग्यश्री योजना २०१६ साली सुरु केली होती. मुलींचा जन्मदर वाढावा आणि तसेच त्यांना शिक्षणासाठी आर्थिक मदत मिळावी, या उद्देशातून ही योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेत दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील मुलींना पैसे दिले जातात. मुलीचा जन्म झाल्यापासून ते ती १८ वर्षाची होईपर्यंत आर्थिक मदत केली जाते.

माझी कन्या भाग्यश्री योजना ही सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत सुरु करण्यात आली आहे.सुकन्या समृद्धी योजनेच्या सर्व अटी माझी कन्या भाग्यश्री योजनेत लागू करण्यात आल्या आहेत.

📑 माझी कन्या भाग्यश्री योजना सुधारित शासन निर्णय (GR) पाहण्यासाठी :- येथे क्लिक करा

👉 माझी कन्या भाग्यश्री योजनेत लाभ घेण्यासाठी अर्ज नमूना (फॉर्म) डाऊनलोड करण्यासाठी :- येथे क्लिक करा

माझी कन्या भाग्यश्री योजनेत लाभ घेण्यासाठी अर्जदार मुलगी महाराष्ट्राची रहिवासी असणे गरजेचे आहे. योजनेत आई आणि मुलीच्या नावाने जॉइंट अकाउंट उघडले जाते. या योजनेत १ लाखांचा अपघात विमा आणि ५००० रुपयांचा ओव्हरड्राफ्ट दिला जातो. दोन मुली असतील तर या योजनेत लाभ घेऊ शकतात. या योजनेत मिळणारे पैसे मुलींच्या शिक्षणासाठी वापरता येतील. या योजनेत मुलींच्या आई वडिलांनी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केल्यानंतर हे पैसे मिळणार आहेत.(Majhi Kanya Bhagyashree yojana)

या योजनेत पिवळ्या आणि केशरी रेशन कार्डधारकांना मुलीच्या जन्मानंतर पाच हजार रुपये दिले जातात.मुलगी पहिलीत गेल्यावर सहा हजार रुपये, मुलगी सहावीत गेल्यावर सात हजार रुपये दिले जातात. मुलगी अकरावीत गेल्यावर ८००० रुपये दिले जातेत. मुलीचे वय १८ वर्ष पूर्ण झाल्यानंतर तिला ७५००० रुपये दिले जातात. म्हणजेच मुलीला एकूण १ लाख १ हाजर रुपये दिले जातात.

या योजनेत अर्ज करण्यासाठी तुम्हाला आधार कार्ड, बँक पासबुक, मोबाईल नंबर, पासपोर्ट साइज फोटो, पत्ता या गोष्टी आवश्यक आहे. याचसोबत तुमच्या उत्पन्नाचा दाखलादेखील आवश्यक आहे. या योजनेत एका घरातील फक्त २ मुलींनाच पैसे मिळणार आहे. माझी कन्या भाग्यश्री योजनेत नोंदणी करण्यासाठी महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या. या वेबसाइटवरुन तुम्हाला योजनेचा फॉर्म डाउनलोड करावा लागेल. त्यानंतर हा फॉर्म महिला व बाल विकास मंत्रालयाकडे जमा करावी लागणार आहे. (Majhi Kanya Bhagyashree yojana Application Process)

📑 माझी कन्या भाग्यश्री योजना सुधारित शासन निर्णय (GR) पाहण्यासाठी :- येथे क्लिक करा

👉 माझी कन्या भाग्यश्री योजनेत लाभ घेण्यासाठी अर्ज नमूना (फॉर्म) डाऊनलोड करण्यासाठी :- येथे क्लिक करा

योजनेचे फायदे आणि पात्रता

या माझी कन्या भाग्यश्री योजनेंतर्गत मुलीच्या जन्मावर शासनाकडून ५० हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. कुटुंबातील दोन मुलींना हा लाभ मिळू शकतो, परंतु दोनपेक्षा जास्त मुली असल्यास योजनेचा लाभ मिळणार नाही. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही महाराष्ट्र राज्याचे कायमचे रहिवासी असणे अनिवार्य आहे. तसे असल्यास तुम्ही या योजनेत अर्ज करू शकता.

  • अर्जासोबत जोडावयाच्या कागदपत्रांची यादी (Documents):
  • लाभार्थी मुलींचे आधार कार्ड 
  •  कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया प्रमाणपत्र
  • उत्पन्नाचा दाखला
  • रेशनिंग कार्ड
  • सावित्रीबाई फुले योजनेचा लाभ न घेतल्याचे प्रमाणपत्र

📑 माझी कन्या भाग्यश्री योजना सुधारित शासन निर्णय (GR) पाहण्यासाठी :- येथे क्लिक करा

👉 माझी कन्या भाग्यश्री योजनेत लाभ घेण्यासाठी अर्ज नमूना (फॉर्म) डाऊनलोड करण्यासाठी :- येथे क्लिक करा

अर्ज कसा करावा?

  • तुम्हालाही या माझी कन्या भाग्यश्री योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्यासाठी अर्ज करावा लागेल.
  • अर्ज करण्यासाठी सर्वातआधी तुम्हाला महाराष्ट्र सरकारच्या शासन विभागाच्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल. (Utility News in Marathi)
  • वेबसाइटला भेट दिल्यानंतर तुम्हाला येथून अर्ज डाउनलोड करावा लागेल.
  • त्यानंतर तुम्हाला फॉर्म भरावा लागेल आणि विचारलेली सर्व माहिती बरोबर टाकावी लागेल.
  • यानंतर, तुम्हाला या भरलेल्या फॉर्मसोबत विनंती केलेल्या कागदपत्राची प्रत जोडावी लागेल.
  • आता तुम्हाला फॉर्म आणि कागदपत्रे महिला आणि बाल विकास मंत्रालयाकडे जमा करावी लागतील.
  • यानंतर तुमच्या अर्जाची छाननी केली जाईल आणि सर्वकाही बरोबर असल्यास तुमच्या मुलीच्या नावे ५०,००० रुपयांची आर्थिक मदत केली जाईल.


Leave a Comment