Ladaki Bahin Yojana : लाडक्या बहिनींनो! ‘ही’ माहिती आताच वाचा, नाहीतर लाडक्या बहीण योजनेसाठी ठराल अपात्र..❌

लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ वितरणाचा दुसरा टप्पा सुरु : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या प्रलंबित हप्त्याचा लाभ वितरणाच्या दुसरा टप्प्याची (Ladki Bahin Yojana 2nd phase benefit distribution) प्रक्रिया सुरू झाली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत 31 जुलैपर्यंत मंजूर करण्यात आलेल्या अर्जानुसार दि. 17 ऑगस्ट पर्यंत लाभ वितरण करण्यात आले आहे.

ई- केवायसी (आधार सिडींग) अभावी प्रलंबित अर्ज व नव्याने मंजूर करण्यात आलेल्या अर्जानुसार लाभ वितरणाचा दुसरा टप्पा (Ladki Bahin Yojana 2nd phase benefit distribution) 31 व 5 ऑगस्ट पर्यंत होणार आहे, तरी सर्व लाभार्थी महिलांनी त्यांचे बँक खात्याची आधार सिडींग करुन ई – केवायसी प्रक्रीया तातडीने पूर्ण करण्याचे आवाहन शासनामार्फत केले आहे.

Ladaki Bahin Yojana Latest News : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून राज्य सरकारने महिलांना दरमहा १५०० रुपये देण्याची घोषणा केली. आतापर्यंत जवळपास दीड कोटींहून अधिक महिलांना या योजनेचा लाभ मिळाल्याचं सांगण्यात येत आहे. काही महिलांच्या खात्यात अद्यापही या योजनेचे पैसे जमा झाले नाहीत. यामागे काही कारण आहेत. ज्या महिला या योजनेसाठी अपात्र ठरल्या आहेत, त्यामागे नेमकी कोणती कारणे आहेत, याबाबत आम्ही तुम्हाला सविस्तर माहिती सांगणार आहोत.


लाडकी बहीण योजनेसाठी या महिला ठरतील अपात्र

1)ज्या महिलांच्या कुटुंबाचे एकत्रित (Annual Income) वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त असेल. 
2) ज्या कुटुंबातील महिला सदस्य आयकर (Income Tax) भरतात.
3) कुटुंबातील सदस्य नियमित, कायम, कर्मचारी कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ किंवा भारत सरकार, राज्य सरकारच्या (Maharashtra Government) स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवा निवृत्तीनंतरचे वेतन घेत आहेत.
5) लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर भागातील आर्थिक योजनांद्वारे लाभ घेतला असेल.
6) ज्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी आमदार- खासदार आहे.
7) ज्या कुटुंबातील सदस्यांमध्ये संयुक्तपणे पाच एकर पेक्षा जास्त शेतजमीन आहे.
8) ज्याच्याकडे चार चाकी वाहन आहे. यामध्ये ट्रॅक्टरचा समावेश नाही. 

आधारकार्ड संबंधीत महत्त्वाची माहिती खालीलप्रमाणे

1) लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी आधारकार्डसोबत बँक खातं लिंक होणं आवश्यक आहे.
2) या योजनेच्या माध्यमातून सर्व लाभार्थी महिलांना बँक खात्यात डीबीटी माध्यमाद्वारे आर्थिक सहायत्ता रक्कम पाठवण्यात येईल.
3) लाडकी  बहीण योजना आधार कार्ड लिंकच्या माध्यमातून मिळणारी रक्कमेतून महिला गुंतवणूकही करु शकतात.
4) राज्यातील २१ ते ६५ वयोगटातील महिलांसाठी लाडकी बहीण योजना लागू करण्यात आली आहे.
5) आधार कार्डशी लिंक असलेल्या बँक खात्यात या योजनेचे पैसे जमा होतील.
6) आधार कार्डसोबत बँक खातं लिंक केलं आहे की नाही, याबाबत तुम्हाला माहित नसेल, तर UIDAI च्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन हे तपासून घ्या

हेल्पलाइन टोल फ्री संपर्क क्रमांक : १८१ (महिला व बाल विकास विभाग, महाराष्ट्र)

या योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार कार्डला बँक खात्याशी लिंक करणं आवश्यक आहे. त्यामुळे ज्या महिलांनी या योजनेच्या अंतर्गत अर्ज केलं आहे, त्यांनी आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे की नाही, हे तपासून पाहावं. जर लाडकी बहीण योजनेसाठी आधारकार्ड लिंक नसेल, तर तातडीनं आधार कार्ड लिंक करुन घ्या. कारण सरकारकडून देण्यात येणारी रक्कम थेट महिलांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. 

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी 31 ऑगस्टपर्यंतची मुदत ही अंतिम नसून अर्जाची प्रक्रिया निरंतर चालणार आहे, अशी माहिती महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली होती. त्यामुळे अर्ज करण्याची आता कोणतीही शेवटची तारीख देण्यात आली नाही. तुम्हाला आता कधीही अर्ज करता येणार आहेत. त्यामुळे महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे.  

तसेच  31 जुलै नंतर अर्ज केलेल्या महिलांच्या अर्जाची जिल्हास्तरावर पडताळणी सूरू आहे. जिल्हास्तरावर मान्यता प्राप्त अर्जाचा डेटा महिला व बाल विकास विभागाकडे येताच ती यादी बँककडे पाठवली जाणार आहेत.ही सगळी प्रक्रिया युद्ध पातळीवर सूरू असल्याची माहिती अदिती तटकरे यांनी एक्सवर दिली होती.

Ladaki Bahin Yojana – त्यामुळे आता महिलांच्या अर्जाची पडताळणी युद्धपातळीवर सूरू झाली आहे. या काळात महिलांना अर्ज मंजूर झाल्याचे मेसेज येणार आहेत. या मेसेजनंतर सप्टेंबर महिन्यात महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत. त्यामुळे महिलांनी आपला अर्ज मंजूर होतोय का? याकडे लक्ष ठेवणे गरजेचे आहे.,

Leave a Comment