Sauchalay Online Registration 2024 : नमस्कार मित्रांनो, ग्रामीण भागात शौचालय संबधित विविध योजना राबविल्या जात आहे. बऱ्याच कुटुंबाना शौचालय अनुदान मिळाले आहेत. परंतु जे कुटुंब शौचालय लाभापासून वंचित असतील अशा व्यक्ती शौचालयासाठी ऑनलाईन “Sauchalay Online Registration” अर्ज करू शकतील.
स्वच्छ भारत अभियान (ग्रा.) अंतर्गत दुसऱ्या टप्प्यात राज्यातील ग्रामीण भागातील वैयक्तिक शौचालय नसलेल्या पात्र कुटुंबांना वैयक्तिक शौचालयासाठी ऑनलाईन प्रणालीद्वारे अर्ज करण्याची सुविधा पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने सुरु केली आहे.
या योजनेअंतर्गत राज्यातील नागरिकांना स्वतःचा शौचालय बांधण्यासाठी 12000/- रुपयांचे आर्थिक सहाय्य्य केले जाते यामध्ये केंद्र सरकारचा 75% वाटा (9000/- रुपये) व राज्य शासनाचा 25% (3000/- रुपये) असतो.
Free Toilet Scheme 2024 | शौचालय अनुदान योजना
काही नागरिक नदीच्या किनाऱ्यावर शौचास बसतात त्यामुळे सर्व घाण नदीत जाते व नदीचे पाणी दूषित होते व तेच पाणी नागरिक पिण्यासाठी वापरतात व दूषित पाणी प्यायल्यामुळे आजाराला बळी पडतात त्यामुळे ग्रामीण भागातील आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबांच्या या समस्यांचा विचार करून त्यांची या सर्व समस्यांपासून सुटका करून त्यांना स्वतःचे शौचालय बांधण्यासाठी आर्थिक सहाय्य्य करण्याच्या उद्देशाने तसेच स्वच्छ भारत मिशन अंतर्गत देशाला व राज्याला स्वच्छ बनविण्यासाठी तसेच नागरिकांना खुल्यावर शौचास बसण्यापासून मुक्त करण्यासाठी राज्यात शौचालय अनुदान योजना सुरु करण्याचा एक महत्वपूर्ण निर्णय घेतला.
या योजनेअंतर्गत लाभार्थी कटुंबाला स्वतःचे वैयक्तिक शौचालय बांधण्यासाठी 12000/- रुपयांचे आर्थिक सहाय्य्य केले जाते व लाभाची रक्कम लाभार्थी कुटुंबाच्या बँक खात्यात जमा केली जाते.
ग्रामीण भागातील बहुतांश कुटुंबे हि दारिद्र्य रेषेखाली स्वतःचे जीवन जगत असतात व त्यांच्याजवळ उत्पन्नाचा तसेच रोजगाराचा स्थायी स्रोत उपलब्ध नसल्या कारणामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती कमजोर असते त्यामुळे अशी आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबे स्वतःचे शौचालय बांधण्यासाठी असमर्थ असतात व ते खुल्यावर शौचास बसतात व खुल्यावर शौचास बसल्यावर परिसरात घाण निर्माण होते व सर्वत्र दुर्गंधी पसरते व माशा, कीटक यांचा प्रादुर्भाव होतो व परिणामी परिसरात रोगराई पसरते व माणसे आजाराला बळी पडतात.
या योजनेचा मुख्य उद्देश राज्यातील नागरिकांना स्वतःचे शौचालय बांधण्यासाठी 12 हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य करून नागरिकांना उघड्यावर शौचास बसण्यापासून मुक्त करणे व स्वच्छतेची जाणीव निर्माण करणे.
शौचालयासाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा तसेच यासाठी पात्रता काय असेल याची आम्ही सविस्तर माहिती या लेखात दिलेली आहे.
घरगुती शौचालय असो किंवा सामुदायिक शौचालय बांधताना भूजल आणि जलस्त्रोत दुषित होणार नाहीत याची काळजी घेतली पाहिजे.
स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) फेज-II
स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) [SBM(G)] चा दुसरा टप्पा, ग्रामीण भारतामध्ये उघड्यावर शौचास मुक्त (ODF) स्थिती आणि घन व द्रव कचरा व्यवस्थापन (SLWM) टिकवण्यावर लक्ष केंद्रित करेल.
कोणीही मागे राहू नये आणि प्रत्येकजण शौचालय वापरतो याची खात्री करण्यासाठी हा कार्यक्रम कार्य करेल. SBM(G) फेज-II 2020-21 ते 2024-25 पर्यंत मिशन मोडमध्ये राबविण्यात येईल.
भारत सरकारने 2 ऑक्टोबर 2014 रोजी सार्वत्रिक स्वच्छता कव्हरेज प्राप्त करण्यासाठी, स्वच्छता सुधारण्यासाठी आणि 2 ऑक्टोबर 2019 पर्यंत भारतात उघड्यावर शौचास जाणारे निर्मूलन करण्याच्या प्रयत्नांना गती देण्यासाठी स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) लाँच केले.
देशव्यापी मोहीम उघड्यावर निर्मूलन करण्याच्या उद्देशाने एक जन आंदोलन होते. 2014 ते 2019 या कालावधीत मोठ्या प्रमाणावर वर्तन बदल, घरगुती आणि सामुदायिक मालकीच्या शौचालयांचे बांधकाम आणि शौचालयाच्या वापरावर लक्ष ठेवण्यासाठी एक जबाबदार यंत्रणा स्थापन करून शौच करणे.
मिशन अंतर्गत, भारतातील सर्व गावे, राज्ये/केंद्रशासित प्रदेशांनी महात्मा गांधींच्या 150 व्या जयंती 2 ऑक्टोबर 2019 पर्यंत स्वतःला ODF घोषित केले.
महाराष्ट्र शौचालय अनुदान योजना SBM(G) फेज-II चे उद्दिष्टे
- गावे, ग्रामपंचायती, ब्लॉक, जिल्हे आणि राज्यांची ODF स्थिती राखणे
- लोक बांधलेल्या शौचालयांचा सतत वापर करतात आणि सुरक्षित आणि आरोग्यदायी वर्तन करतात याची खात्री करणे
- ग्रामीण भागात एकूणच स्वच्छतेसाठी गावांना SLWM व्यवस्थेची उपलब्धता असल्याची खात्री करणे
- ग्रामीण भागातील सामान्य जीवनमानात सुधारणा घडवून आणणे
शौचालय अनुदानासाठी खालील व्यक्ती पात्र असतील? (sauchalay anudan yojana eligibility)
- सर्व दारिद्र्यरेषे खालील कुटुंब (BPL)
- दारिद्र्यरेषे खालील कुटुंब (APL) : यामध्ये घरकुल असलेले भूमिहीन मजूर, अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती, लहान व अत्यल्प भूसुधार शेतकरी, शाररीक दृष्ट्या अपंग असलेली व्यक्ती, महिला प्रमुख कुटुंब इ. योजनेचा लाभ घेऊ शकतात.
शौचालयासाठी किती अनुदान मिळेल? (toilet subsidy in maharashtra)
ज्या कुटुंबांना शौचालय अनुदान लाभ मिळाला नाही अशा कुटुंबांना १२००० रु. अनुदान असेल.
वैयक्तिक शौचालय ऑनलाईन अर्ज? (how to apply for toilet subsidy in maharashtra)
जे कुटुंब वैयक्तिक शौचालय लाभास पात्र असतील ते ऑनलाईन अर्ज करू शकतात. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खालील स्टेप फॉलो करा.
अ.क्र | प्रकार | वेबसाईट |
१) | योजना | केंद्र शासन |
२) | लाभार्थी व्यक्ती | APL & BPL लाभार्थी |
३) | अर्जाची प्रक्रिया | ऑनलाईन/Online |
४) | मुख्य संकेस्थळ | https://sbm.gov.in/ |
sbm.gov.in online registration
वेबसाईट : ttps://sbm.gov.in/sbm_dbt/secure/login.aspx
किंवा
नोंदणी करिता : https://sbm.gov.in/SBM_DBT/Secure/DBT/DBT_Registration.aspx
- सर्वात आधी तुम्हाला नोंदणी करावी लागेल. नोंदणी करण्यासाठी नोंदणी वेबसाईट चा वापर करावा.
- नोंदणी करीता आपला मोबाईल नंबर,संपूर्ण नाव,रहिवाशी पत्ता,राज्य इ. थोडक्यात माहिती द्यावी लागेल.
- नंतर CAPTCHA कोड भरावा लागेल. नंतर Submit बटन वरती क्लिक करा.
- आपल्या समोर पॉप-अप मध्ये एक मेसेज पाहायला मिळेल. कि आपला पासवर्ड मोबाईल नंबर वरती पाठविला आहे.परंतु मित्रांनो हा पासवर्ड तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबरचे शेवटचे चार (४) अंक टाकायचे आहेत.(ग्रामपंचायत योजनांची यादी पहा)
- पुन्हा साईन-इन या पेज वरती तुम्हाला यायचं आहे. येथे तुम्ही मोबाईल नंबर आणि मोबाईल नंबरचे शेवटचे ४ अंक पासवर्ड म्हणून टाकायचे आहेत. खालील कोड भरून Sign In वरती क्लिक करा.
- पुन्हा एक नवीन पेज सुरु होईल. यामध्ये जुना पासवर्ड टाकून तुम्हाला नवीन पासवर्ड बनवावा लागेल.
- New Application वरती क्लिक करा.
- Section A :
- आपले राज्य,जिल्हा,तालुका,गाव,वस्ती निवडा.
- Section B : वैयक्तिक माहिती.
- आधार कार्डनुसार नाव.
- आधार कार्ड नंबर भरा.
- Verify Aadhaar Number वरती क्लिक करा.
- वडिलांचे नाव,APL/BPL,Sub Category,मोबाईल नंबर,ई-मेल,पत्ता इ.माहिती भरा.
- Section C : बँकेची माहिती
- सर्वात आधी IFSC कोड भरा, पासबुक वरील नाव, बँकेची शाखा/पत्ता,खाते नंबर भरा.
- Scans/स्कॅन केलेले बँक पासबुक अपलोड करा.
- Apply बटन वरती क्लिक करा.
- आपल्याला एक Application नंबर मिळेल. हा नंबर लिहून घ्या किंवा प्रिंट करून ठेवा.
- Application नंबर वरून आपण केलेल्या अर्जाची सद्यस्थिती तपासू शकतो.
टीप – अधिक माहितीसाठी ग्रामपंचायत व पंचायत समिति येथे संपर्क करा.
शौचालय असून योजना कोणत्या राज्यासाठी लागू आहे?
शौचालय अनुदान योजना महाराष्ट्र राज्यासाठी लागू आहे.
शौचालय असून योजनेचे लाभार्थी कोण आहेत?
राज्यातील दारिद्र्य रेषेखालील कुटुंब
राज्यातील दारिद्र्य रेषेवरील कुटुंब
अनुसूचित जातीतील कुटुंब
अनुसूचित जमातीतील कुटुंब
भूमिहीन कुटुंब
शारीरिक दृष्टया अपंग व्यक्तीचे कुटुंब
अल्प व माध्यम भूधारक शेतकरी
कुटुंबातील प्रमुख स्त्रिया असलेले कुटुंब
शबरी घरकुल योजनेचे लाभार्थी कुटुंब
घरकुल योजनेचे लाभार्थी कुटुंब
शौचालय अनुदान योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया काय आहे?
शौचालय अनुदान योजनेअंतर्गत ऑनलाईन तसेच ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येतो.