MSSC Bharti 2024 : MSSC ( Maharashtra State Security Corporation) is going to recruit interested and eligible candidates for the various posts of “Security Supervisory Officer”. There are total of 29 vacancies are available. The job location for this recruitment is Mumbai. Applicants need to apply through Offline Mode.
MSSC Recruitment 2024 : सर्वांना नमस्कार, महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ मुख्यालय मुंबई अंतर्गत “सुरक्षा पर्यवेक्षक अधिकारी” पदांच्या एकूण 29 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 ऑक्टोबर 2024 आहे.
Maharashtra State Security Corporation Recruitment 2024
● भरती विभाग व प्रकार : ही एक निम सरकारी नोकरी असून – महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ मुख्यालय मुंबई अंतर्गत “सुरक्षा पर्यवेक्षक अधिकारी” पदांच्या एकूण 29 रिक्त जागा भरण्यासाठी ही भरती राबवली जात आहे
● पदाचे नाव : सुरक्षा पर्यवेक्षक अधिकारी
● पद संख्या : एकूण 29 जागा
२. वय :- दि. ३०.०९.२०२४ रोजी 61 वर्षापेक्षा अधिक नसावे.
३. महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ किमान आवश्यक पात्रता :-
- नमुद पदांसाठी महाराष्ट्र राज्य पोलीस दलातून किंवा राज्य राखीव पोलीस बलातून पोलीस निरीक्षक / सहा. पोलीस निरीक्षक (फक्त महामुंबई मेट्रोसाठी) (सशस्त्र / निःशस्त्र) या पदावरून सेवानिवृत्त झालेले अधिकारी.
- किमान शैक्षणिक अर्हता : मान्यताप्राप्त विद्यापिठातून कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण.
- वर नमुद पदांसाठी त्या-त्या भागात राहत असलेले व त्याभागात पोलीस खात्यात असताना नोकरी केलेले उमेदवार यांना प्राधान्य देण्यात येईल..
. वेतन :- रू. ४५,०००/- (सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक) ४
वेतन :- रू. ३५,०००/- (सेवानिवृत्त सहा. पोलीस निरीक्षक / पोलीस उप निरीक्षक)
५. सुरक्षा पर्यवेक्षकीय अधिकारी SSO (सेवानिवृत्त PI / API) या पदाची अधिकार, कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या
१. आस्थापनामध्ये नियुक्त केलेले महामंडळाचे सुरक्षा कर्मी यांच्यावर दैनंदिन पर्यवेक्षण व नियंत्रण करून आस्थापनेची सुरक्षा व संरक्षणाची जबाबदारी पार पाडणे.
२. आस्थापनेस असलेले संभाव्य धोके यानुसार सुरक्षा कार्यक्षमपणे काम करून घेणे, कमी यांना कायम सतर्क ठेवणे व त्यांच्याकडून
३. उत्कृष्ट काम करणारे सुरक्षा कर्मी यांना प्रोत्साहन देणेकामी प्रशंस्तीपत्र / बक्षीसे देण्याबाबत मुख्यालयास अहवाल सादर करणे,
४. कर्तव्यात कसुरी करणारे सुरक्षा कर्मी यांचे कसुरी अहवाल चौकशीअंती कार्यवाहीसाठी मुख्यालयास सादर करणे,
५. सुरक्षा कर्मीची दैनंदिन हजेरी घेणे व त्याची HRMS प्रणालीमध्ये नोंदी घेणे.
६. हत्यारी सुरक्षा रक्षक यांच्याकडील हत्यारांची देखभाल दुरूस्ती विषयक आर्मोरर कडून कामे करून घेणे.
७. आस्थापनेकडून सुरक्षा शुल्क वेळेत वसुल करण्याबाबत कार्यवाही करणे, प्रलंबित देयके संदर्भात उपस्थित अडी अडचणी याबाबत संबधीत आस्थापना आणि महामंडळाचे मुख्यालय यांच्याशी समन्वय साधून प्रलंबित देयक वसुलीचे काम करणे.
८. त्याचप्रमाणे महामंडळाचे मुख्यालयाकडून सोपविण्यात आलेले अनुषंगिक कामकाज करणे.
९. मा. व्यवस्थापकीय संचालक व इतर वरिष्ठ अधिकारी यांनी प्रसंगोपात दिलेले आदेशानुसार कामे करणे,
ब) – महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ भरती अर्ज सादर करण्याची पध्दत :-
१. इच्छुक व पात्र उमेदवार यांनी यासोबतच्या विहित नमुन्यातील आपला अर्ज महामंडळास खालील पत्यावर प्रत्यक्ष हजर राहून / पोस्टाने पाठविण्यात यावेत.
२. अर्ज सादर करण्याचा पत्ता :-
पत्ता :- पोलीस महासंचालक तथा व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ, मुंबई. सेंटर – १, ३२ मजला, वर्ल्ड ट्रेड सेंटर, कफ परेड, मुंबई- ४०० ००५, दूरध्वनी: (०२२) ६९९६५५५५, फॅक्स: (०२२) ६९९६५५९९.
अर्ज सादर करण्याचा कालावधी व मुदत :-
दि. २६.०९.२०२४ ते दि. ११.१०.२०२४ रोजी वेळ १८.०० वाजेपर्यंत.
क) – मुलाखतीसाठी हजर रहावयाचे ठिकाण व दुरध्वनी क्र. :- पोलीस महासंचालक तथा व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ, मुंबई.
सेंटर – १, ३२ मजला, वर्ल्ड ट्रेड सेंटर, कफ परेड, मुंबई- ४०० ००५. दूरध्वनी: (०२२) ६९९६५५५५, फॅक्स: (०२२) ६९९६५५९९.
📑PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
✅ अधिकृत वेबसाईट | mahasecurity.gov.in |
👉 अर्जाचा नमूना | येथे क्लिक करा |
ड) – महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ मुलाखतीवेळी उमेदवारांनी सादर करावयाची कागदपत्रे
- १. वैयक्तिक माहिती (BIO-DATA)
- २. शैक्षणिक कागदपत्रे
- ३. सेवानिवृत्त प्रमाणपत्र / सेवानिवृत्ती ओळखपत्र
- ४. निवृत्ती वेतन पुस्तिकेची प्रत
- ५. फोटो / पॅन कार्ड / आधार कार्ड
- ६. मागील पाच वर्षाचे ACR
📑PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
✅ अधिकृत वेबसाईट | mahasecurity.gov.in |
👉 अर्जाचा नमूना | येथे क्लिक करा |
इ) – महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ इतर महत्वाच्या सुचना :-
१. उमेदवारांनी सोबतच्या विहित केलेल्या नमुन्यात त्यांचे अर्ज BIO-DATA पोस्टाने किंवा प्रत्यक्ष कार्यालयात हजर राहून सादर करावेत.
२. उमेदवारांच्या प्राप्त कागदपत्रानुसार मुलाखतीसाठी बोलाविण्यात येणाऱ्या उमेदवारांची यादी तयार
करण्यात येईल. किमान अर्हता प्राप्त उमेदवारांना मुलाखतीची वेळ दिनांक याबाबत भ्रमणध्वनीव्दारे कळविण्यात येईल,
३. मुलाखतीसाठी उमेदवारांना स्वखर्चाने हजर राहावे लागेल.
४. मुलाखतीसाठी येताना सेवानिवृत्ती ओळखपत्र, पेन्शन पुस्तिका व शैक्षणिक अर्हता विषयक सर्व कागदपत्राच्या मुळ प्रती, BIO-DATA व त्याच्या ०२ छायांकित प्रती आणाव्यात.
५. मुलाखत, अनुभव इ. वर आधारित उमेदवारांची नामिकासुची तयार करण्यात येईल आणि महामंडळात उपलब्ध जागेनुसार या सुचीमधील गुणानुक्रम विचारात घेऊन नियुक्ती दिली जाईल.
६. निवडलेल्या उमेदवारास महामंडळाच्या अटी व शर्तीसह नियुक्ती पत्र दिले जाईल.
७. दिली जाणारी नियुक्ती ही करार पध्दतीने ११ महिन्यासाठी असेल व महामंडळाची आवश्यकता आणि प्रस्तुत कर्मचाऱ्यांची क्षमता, आत्मसात केलेले ज्ञान व इतर निकष यानुसार पुनर्नियुक्ती दिली जाईल.
८. प्रस्तुत जाहिरातीत नमुद करण्यात आलेली पदसंख्या यामध्ये वाढ / घट होण्याची शक्यता आहे.
९. सदर निवड प्रक्रिया कोणत्याही वेळी / कोणत्याही कारणास्तव / कोणत्याही टप्प्यावर / पुर्णतः किंवा अंशतः रद्द करण्याचा / फेरबदल करण्याचा अधिकार महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ, मुंबई यांचेकडे राखून ठेवण्यात आलेला आहे.
१०. उमेदवारांच्या नेमणुकीबाबत अंतिम निर्णय महामंडळाचा असेल
📑PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
✅ अधिकृत वेबसाईट | mahasecurity.gov.in |
👉 अर्जाचा नमूना | येथे क्लिक करा |
How To Apply For MSSC Recruitment 2024
- वरील पदांकरीता अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करायचा आहे.
- अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या संबंधित पत्त्यावर सादर करावा.
- अर्जा सोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडने आवश्यक आहे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 ऑक्टोबर 2024आहे.
- देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.